Thursday 27 July 2023

पहिल्या क्षणापासून बाळाची सुरक्षा करण्याचे प्रत्येक आईचे सर्वात मोठे प्रॉमिस पूर्ण करण्यात मदत करण्यासाठी जॉन्सन्स® बेबी बांधील


#Motherspromise - भारतभरातील १५००० पेक्षा जास्त माताआपल्या बाळांना १ प्रॉमिस करतात 

जीवापाड प्रेमसमर्पण आणि अढळ प्रॉमिसेस यांच्यासह करावयाची एक सुंदर वाटचाल म्हणजे पालकत्व. आईबाबा होणार असल्याची चाहूल लागतेत्या क्षणापासूनच पालकांच्या बाळासोबतच्या गहिऱ्या नात्याची सुरुवात होतेजन्माच्या पहिल्या दिवसापासूनच बाळाच्या त्वचेचे नेहमी संरक्षण करण्याचे व संपूर्ण कल्याण साध्य करण्याचे प्रॉमिस त्याचवेळी दिले जाते. बाळाच्या त्वचेची देखभाल करण्यासाठीची उत्पादने सादर करणारी आघाडीचा ब्रँड म्हणून जॉन्सन्स® बेबी ने आपल्या सर्वात नवीन 'प्रॉमिसपहले पल से' कॅम्पेनमध्ये प्रत्येक पालकाच्या सर्वात महत्त्वाच्या बांधिलकीचा सन्मान केला आहे.

गेल्या अनेक पिढ्यांपासून पालकांसोबत घनिष्ठ नाते जोडून असलेला ब्रँड म्हणून जॉन्सन्स® बेबी बाळाच्या त्वचेचे पहिल्या दिवसापासून संरक्षण करण्यात मदत करण्यासाठी बांधील आहे. बाळाच्या त्वचेचे रक्षण, मदत करण्यासाठी जॉन्सन्स® बेबी ने प्रत्येक आई व बाबांची साथ देण्याचे ठरवले आहे. बाळांसाठी सर्वात सुरक्षित उत्पादने तयार करणे जॉन्सन्स® बेबी चे मिशन आहे. आपल्या कित्येक दशकांच्या ज्ञान व विज्ञानाचा उपयोग करून फक्त 'बेबी सेफअर्थात बाळासाठी सुरक्षित इंग्रिडियन्टससह बाळाच्या कोमल त्वचेचे संरक्षण करण्यात मदत करण्यासाठी सक्षम असल्याची तपासणी करण्यात आलेले फॉर्म्युलेशन्स त्यांनी तयार केले आहेत. त्यांची सर्व उत्पादने काटेकोर शास्त्रीय संशोधन करून आणि बालरोगतज्ञ व त्वचारोगतज्ञांनी तपासून घेतलेल्या फॉर्म्युल्यांसह तयार केली जातात.

'प्रॉमिसपहले पल से' या ब्रँडच्या सर्वात नवीन मार्केटिंग कॅम्पेनमध्ये 'फक्त आणि फक्त बाळांसाठी सुरक्षित इंग्रिडियन्टससह डिझाईन करण्यात आलेलीउत्पादने ही अढळ वचनबद्धता दर्शवण्यात आली आहे.  बाळांच्या कोमल त्वचेचे पहिल्या दिवसापासून रक्षण करण्यात मदत करण्यासाठी ब्रँड बांधील असल्याचे या कॅम्पेनमधून अधोरेखित करण्यात आले आहे.

या कॅम्पेनच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या एका अतिशय सुरेख व आकर्षक जाहिरातीमध्ये दर्शकांना नवे आईबाबा व त्यांचे बाळ यांच्या सुंदर जगाची सफर घडवण्यात आली आहे. बाळासाठी आणि बाळाच्या आजूबाजूला फक्त सर्वोत्तम गोष्टीच असाव्यात हे प्रॉमिस या जाहिरातीचा प्रमुख मुद्दा आहे. बाळाला फक्त सर्वोत्कृष्ट गोष्टीच दिल्या जाव्यात आणि बाळाच्या त्वचेचे रक्षण करण्याचे प्रॉमिस पूर्ण करण्यात आईबाबा जे छोटे पण जागरूक निर्णय घेतात ते देखील या फिल्ममध्ये दाखवले गेले आहे.

केनव्यूचे बिझनेस युनिट हेड व व्हीपी मार्केटिंग श्री. मनोज गाडगीळ यांनी ब्रँडचे प्रॉमिस अधोरेखित करत सांगितले"या कॅम्पेनच्या आधी जॉन्सन्स® बेबी ने देशभरातील विविध भागांमधीलवेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या १५,००० हुन जास्त मातांशी संपर्क करून त्या आपल्या बाळांना काय प्रॉमिस देतात ते जाणून घेतले. बाळाचे रक्षण करण्याचे प्रॉमिस देशातील प्रत्येक भागातीलप्रत्येक संस्कृतीतील मातांनी आपल्या बाळांना दिले आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेतजॉन्सन्स® बेबी ने त्यांचे हे मौल्यवान प्रॉमिस पूर्ण करण्यात मदत करण्याची बांधिलकी स्वीकारली आहे.

बाळाला सर्व काही सर्वोत्तम दिले जावे यासाठी जॉन्सन्स® बेबी ने गेली अनेक वर्षे पालकांना सहयोग प्रदान केला आहे. बाळाच्या त्वचेला सर्वात पहिल्यांदा स्पर्श करणाऱ्या उत्पादनांचा ब्रँड म्हणून आम्ही आमची जबाबदारी जाणतो. प्रत्येक आईबाबांना प्रत्येक नव्या पिढीला दिलेले आमचे प्रॉमिस पूर्ण करण्यासाठी सुरक्षा स्टँडर्ड्सपेक्षा सरसफक्त आणि फक्त बेबी सेफ इंग्रिडियन्टसने डिझाईन केलेली उत्पादने निर्माण करण्यावर आम्ही आमचे लक्ष केंद्रित करतो."

डीडीबी मुद्रा ग्रुपचे एक्झिक्युटिव्ह क्रिएटिव्ह डायरेक्टर गॉडविन डिमेलो यांनी सांगितले, "बाळाचा जन्म प्रत्येक आईबाबांच्या मनात आशा जागवतो की ते त्यांच्या लहानग्यासाठी सकारात्मकतेने भरलेले जग निर्माण करू शकतातअसे जग जिथे सर्व काही फक्त चांगलेच असेल. आमचे हे निरीक्षण आम्ही आईच्या पहिल्या दिवसाच्या प्रॉमिसच्या इमोशनल हुकमार्फत दर्शकांपर्यंत पोहोचवले आहे. आईला तिचे प्रॉमिस पूर्ण करण्यात मदत करण्याची जॉन्सन्स® बेबी ची भूमिका देखील दर्शकांसमोर मांडण्यात आम्हाला यामुळे मदत झाली आहे."

'प्रॉमिसपहले पल सेहे कॅम्पेन २५ जुलैपासून सर्व प्रमुख टेलिव्हिजन चॅनेल्सडिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि सोशल मीडिया नेटवर्क्सवर प्रसारित केले जाणार आहे.

टीव्हीसीसाठी लिंक

मराठीhttps://www.youtube.com/watch?v=tAfQjwliwlg

इंग्रजीhttps://www.youtube.com/watch?v=1nAm35ijKls

No comments:

Post a Comment