Friday, 9 May 2025

सरु’‘सरु’ – एका गावातील मुलीची मोठ्या शहरातील स्वप्ने आणि जिद्दीची कहाणी


झी टीव्हीवरील नवीन मालिका सरु’ आपली स्वप्ने पूर्ण करण्याचे धाडस करणाऱ्या एका तरुणीच्या प्रेरणादायक प्रवासाला जीवंत करत आहे ~

महत्त्वाकांक्षाजिद्द आणि अडथळ्यांवर मात करून यश मिळवण्याच्या या भावस्पर्शी कथेमध्ये शगुन पांडे आणि अनुष्का मर्चंडेसोबत मोहक मटकर 'सरु'च्या भूमिकेत आहे ~

 

8 मे 2025, मुंबई: जेव्हा एखादी गावातील मुलगी समाजाने घालून दिलेल्या मर्यादांपलीकडे स्वप्न पाहण्याचे धाडस करतेतेव्हा काय होतेजेव्हा तिची मुळे तिला थांबवण्याचा प्रयत्न करतातपण तिची महत्त्वाकांक्षा तिला उंच भरारी घ्यायला प्रवृत्त करते? आपल्या प्रभावी कथाकथनासाठी प्रसिद्ध असलेली झी टीव्ही वाहिनी एक नवीन मालिका सादर करत आहे – सरु – जी तुम्हाला खोलवर प्रेरणा देईल. राजस्थानातील खारेस गावातल्या एका जिद्दी तरुणी – सरुच्या प्रवासाची ही कथा असून तिच्या उच्च शिक्षणाच्या स्वप्नांना समाजाकडून वारंवार दडपण्याचा प्रयत्न होतो. प्रेक्षक तिच्यासोबत एका अशा प्रवासावर निघतील जिथे ती स्वतःच्या स्वप्नांसाठी झगडते. गावात मर्यादित संधीआणि तिच्या बाहेर जाण्याबद्दलची तिच्या आईची अनिच्छा – अशा परिस्थितीत सरुचे मुंबईला कॉलेजसाठी येणे हे तिच्या आयुष्यातील एक मोठे वळण ठरते. भावनिक चढउतारअडचणीआणि स्वतःच्या ओळखीचा शोध – या सगळ्यांनी परिपूर्ण असा हा टप्पा तिला खर्‍या अर्थाने घडवतो. शशि सुमीत प्रॉडक्शन्स प्रा. लि. निर्मित ही ‘सरु’ ही मालिका 12 मे 2025 पासून दररोज संध्याकाळी 7:30 वाजता झी टीव्हीवर प्रसारित होणार आहे आणि प्रेक्षकांना घेऊन जाणार आहे ग्रामीण राजस्थानापासून ते मुंबईच्या गजबजलेल्या शहरी जीवनाच्या प्रवासापर्यंत.

मुख्य भूमिकेत मोहक मटकरचे पदार्पण होत असून तिच्या माध्यमातून आपल्याला भेटतेय सरु’ – एक काटेकोरआत्मविश्वासू आणि स्वाभिमानी तरुणीजिचे तिच्या मूल्यांशी घट्ट नाते आहे. ती नीतिमान आणि धीट असली तरी आतून अजूनही थोडीशी भावुक आहे – पण कोणत्याही आव्हानामुळे कधीही हार मानत नाही.

सरु ही कबड्डी चॅम्पियन आहे आणि जिल्हाधिकारी होण्याचे तिचे स्वप्न आहे – स्वतःसाठी उज्वल भविष्य घडवण्याच्या ध्येयाने ती झपाटलेली आहे. सरुच्या प्रवासात संघर्ष आणि अनिश्चिततेची एक नवी पातळी आणते अनुष्का मर्चंडेद्वारा साकारलेली 'अनिका'नेहमी लक्षवेधी असण्याचा हट्टगोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या नाही तर त्याकडे अहंकाराने पाहण्याची वृत्ती – अशा अनिकाला सरु अजिबात आवडत नाही. सरुला खाली खेचण्याची एकही संधी ती दवडत नाही.

यात शगुन पांडे वेद बिर्ला या नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे – एक सुसंस्कृतविनम्र आणि सच्च्या मूल्यांवर चालणारा तरुण जो कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून सन्मान प्राप्त करतो. एक समर्पित मुलगा आणि आपल्या वहिनीसाठी खंबीर आधारस्तंभ असलेल्या वेदचे तिच्याशी अतूट मैत्री आणि विश्वासाचे नाते शेअर करतो. स्वतःच्या नैतिक तत्त्वांवर ठाम असलेला वेद परिस्थिती प्रतिकूल असली तरीही नेहमी योग्य गोष्टीसाठी उभा राहतो. सरु तिची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी झगडत असताना तिचा मुंबईतला प्रवास वेद आणि अनिकासोबत कसा आकार घेतो हे पाहणे प्रेक्षकांसाठी निश्चितच रोचक ठरेल. ही मालिका नाट्यप्रेरणा आणि भावना यांचा सुरेख मिलाफ सादर करते.

प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींना सरुच्या जगाची झलक दाखवण्यासाठी मालिकेच्या मुंबईतील लॉन्च कार्यक्रमात राजस्थानातील एका कठपुतळी कलाकारांच्या संघाकडून खास परफॉर्मन्स सादर करण्यात आला. त्यांच्या मनस्पर्शी सादरीकरणाने सरुचा प्रवास जिवंत केलाप्रेक्षकांना मालिकेच्या सांस्कृतिक मुळांशी जोडले आणि सगळ्यांमध्ये मालिकेच्या प्रीमिअरची उत्सुकता आणखी वाढवली.

झी टीव्हीचे चीफ चॅनल ऑफिसरमंगेश कुलकर्णी म्हणाले, "झी टीव्हीवर आम्ही अशी कथानके सादर करण्यास कटिबद्ध आहोत जी केवळ प्रेक्षकांना गुंतवून ठेवत नाहीततर त्यांच्या आकांक्षांशीही खोलवर नाते जोडतात. सरु’ ही मालिका एका गावातील मुलीच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याच्या धाडसाची व समाजाच्या बंधनांना आव्हान देणारी एक ताजी आणि प्रेरणादायक कथा सादर करते. ही मालिका केवळ आपल्या मर्यादांच्या बाहेर पाऊल टाकण्याचा भावनिक प्रवास मांडत नाहीतर गुंतागुंतीच्या व्यक्तिरेखा आणि त्यांच्या नातेसंबंधांचाही सखोल वेध घेते. शशि आणि सुमीत मित्तल या दूरदृष्टी असलेल्या जोडीसोबत काम करत आम्ही अशी एक कहाणी सादर करत आहोत जी आमच्या वैविध्यपूर्ण कॉन्टेन्टचे प्रतीक ठरेल आणि सर्व पिढ्यांमधील प्रेक्षकांशी भावनिक बंध निर्माण करु शकेल."

झीचे चीफ कंटेंट ऑफिसरराघवेंद्र हुन्सूर म्हणाले, "झीमध्ये आमचे ध्येय हे असे कथानक तयार करणे आहे जे आपल्या विभिन्न प्रेक्षकवर्गाशी खोलवर नाते जोडते. सरु’ ही मालिका या दृष्टिकोनाचे मूर्त स्वरूप आहे  कारण ती राजस्थानाच्या ग्रामीण भागातून आलेल्या एका सतरुणीचा प्रवास मांडतेजी समाजाच्या बंधनांपलीकडे जाऊन स्वप्ने पाहण्याचे धाडस करते. या मालिकेच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीची समृद्धी आणि तिच्या स्वतःच्या महत्त्वाकांक्षा व जिद्दीचा शोध हा प्रेक्षकांना एक अशी कथा देतो जी खरी आणि तेवढीच प्रेरणादायकही आहे. आम्हांला विश्वास आहे की 'सरुही मालिका प्रेक्षकांचे केवळ मनोरंजन करणार नाही तर देशभरातील कुटुंबांमध्ये अर्थपूर्ण चर्चा घडवून आणेल."

निर्माते शशी आणि सुमीत मित्तल म्हणाले, शशी सुमीत प्रॉडक्शन्स आणि झी टीव्ही यांच्यात अनेक वर्षांपासूनचे संबंध आहेत आणि या कालावधीत आम्ही अनेक यशस्वी प्रकल्प केले आहेत. प्रत्येक वेळी आम्ही एकत्र काम केल्यावर काहीतरी खास निर्माण झालं आहे. आमचा नवीन प्रोजेक्ट ‘सरू’ अशाच एका गावातील मुलीची प्रेरणादायक कथा सांगतोजी रूढी-परंपरांना मागे टाकून स्वतःचा मार्ग बनवते. तिचा हा प्रवास प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत आणि विश्वास आहे की ही गोष्ट प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भावेल आणि त्यांचं प्रेम व आदर मिळवेल.”

मोहक मटकर म्हणाली, "‘सरुचे’ माझ्या हृदयात एक खास स्थान आहे कारण हे माझे पहिले मुख्य पात्र आहे आणि जेव्हा मी या मालिकेची पटकथा वाचली तेव्हाच मला माहित होते की ही ती कथा आहे जिचा मला भाग बनायचे आहे! सरु ही फक्त एक मालिका किंवा एक पात्र नाही तर ती जिद्द आणि ठाम विश्वासाचे प्रतीक आहेया सामर्थ्यशाली भूमिकेसाठी झी टीव्हीने माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी त्यांची अतिशय आभारी आहे आणि तिची कथा जिवंत करताना मला अभिमान वाटतो. आता मला आशा आहे की सरु आणि तिच्या आव्हानात्मक प्रवासातून मी इतरांना त्यांचा आवाज शोधण्यासाठी प्रेरित करू शकते."

शगुन पांडे म्हणाला, "‘सरु’ ही अशी एक मालिका आहे जी विरोध असूनही स्वप्नांचा पाठपुरावा करणे किती महत्त्वाचे आहे हे सांगते आणि मला आशा आहे जशी आम्हांला आवडली तशीच ही कथा प्रेक्षकांनाही आवडेल. एक व्यक्ती म्हणून मलाही ही मालिका परिभाषित करते आणि मला हिचा भाग होण्याचा आनंद आहे. माझे पात्र वेद प्रेक्षकांसाठी एक आश्चर्य ठरेल कारण ते मी यापूर्वी साकारलेल्या कोणत्याही पात्रापेक्षा वेगळे आहे आणि यामुळे मला माझ्या अभिनय कौशल्यांना एका नवीन उंचीवर नेता येईलमी त्याच्या नैतिकतेवर ठाम असलेल्या वचनबद्धतेवर आकर्षित झालो आणि मी त्याची कथा प्रेक्षकांशी शेअर करण्यासाठी उत्सुक आहे."

अनुष्का मर्चंडे म्हणाली, "दुसऱ्या प्रोमोनंतर आम्हाला मिळालेले प्रचंड प्रेम आणि पाठिंबा पाहून खरंच सगळ्या मेहनतीचे आणि संघर्षाचे चीज झाल्यासारखे वाटले. मी या मालिकेसाठी साइन केल्यापासूनच मला खात्री होती की सरु अशा कठीण गोष्टींवर चर्चा सुरू करेल ज्या सामान्यपणे दुर्लक्षित होतात – विशेषतः अडथळ्यांनाही न जुमानता आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याविषयी. आणि मला अभिमान वाटतो की हे घडताना दिसतंय! माझ्या 'अनिकाया पात्रावर मिळणाऱ्या प्रशंसेबद्दल मी खूप आभारी आहे. अनिका ही अशी एक व्यक्ती आहे जी सरुच्या प्रवासात वारंवार अडथळा आणायचा प्रयत्न करतेकारण तिच्या स्वत:च्या असुरक्षा आणि इच्छांमुळे ती प्रेरित होते. तिचे आणि सरुचे संघर्षमय नाते प्रेक्षकांना नक्कीच त्या टोकाच्या क्षणांपर्यंत खेचून नेईल."

सरुच्या प्रेरणादायी प्रवासाला सुरुवात होत असताना तिच्यासमोर अनेक अडचणीगैरसोयीच्या प्रसंगांची मालिका आणि मोठ्या शहरात स्वतःचे स्थान शोधण्याचे आव्हान उभे राहील. ती या सगळ्या अडथळ्यांवर मात करून आपल्या स्वप्नांना वास्तवात आणेल का?

तुमच्या कॅलेंडरवर नोंद करा — ‘सरु’ 12 मे 2025 पासून झी टीव्हीवर प्रीमिअर होत आहे आणि सोमवार ते रविवार दररोज संध्याकाळी 7:30 वाजता प्रसारित होईल


No comments:

Post a Comment