Tuesday, 13 May 2025

अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपने आपल्या 'केयर चॅम्पियन्स' ना सन्मानित करून साजरा केला आंतरराष्ट्रीय नर्स दिन~ प्रस्तुत केली एक इंटरॅक्टिव्ह इंस्टॉलेशन ग्रॅटिट्यूड वॉल ज्यावर प्रदर्शित करण्यात आल्या आहेत केयर चॅम्पियन्सच्या सन्मान गाथा ~

अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपने आपल्या 'केयर चॅम्पियन्स' ना सन्मानित करून साजरा केला आंतरराष्ट्रीय नर्स दिन
~ प्रस्तुत केली एक इंटरॅक्टिव्ह इंस्टॉलेशन ग्रॅटिट्यूड वॉल ज्यावर प्रदर्शित करण्यात आल्या आहेत केयर चॅम्पियन्सच्या सन्मान गाथा ~

राष्ट्रीय, १3 मे २०२५: अपोलो हॉस्पिटल्सने आंतरराष्ट्रीय नर्स दिनाच्या निमित्ताने जगभरातील आरोग्य सेवा संस्थांच्या सहयोगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले ज्यामध्ये नर्सिंगमधील उत्कृष्ट कामगिरीला सन्मानित करण्याबरोबरीनेच जागतिक आरोग्य व्यवस्था आणि आर्थिक लवचिकता कायम राखण्यामध्ये नर्सेसच्या महत्त्वपूर्ण भूमिकेला अधोरेखित करण्यावर देखील भर दिला गेला. आंतरराष्ट्रीय नर्स दिवस नर्सिंग कर्मचाऱ्यांचे समर्पण, कौशल्ये आणि करुणा भावनेने करण्यात येणाऱ्या सेवेवर प्रकाश टाकतो, यावेळी अपोलो हॉस्पिटल्स नेटवर्कच्या युनिट्सनी एका आठवडाभराच्या कार्यक्रमांच्या शृंखलेचे आयोजन केले होते, यामध्ये विशेष भोजन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि एका इंटरॅक्टिव्ह इंस्टॉलेशन ग्रॅटिट्यूड वॉलचे अनावरण करण्यात आले.

इंटरॅक्टिव्ह ग्रॅटिट्यूड वॉल हा विशेष डिझाईन करण्यात आलेला प्लॅटफॉर्म आहे ज्यावर सहकर्मचारी, रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांनी नर्सिंग कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांविषयी आभार व्यक्त केले. प्रोत्साहनपर संदेशांपासून देखभालीशी संबंधित विविध प्रसंगांपर्यंत, ही वॉल कृतज्ञतेचे एक शाश्वत प्रतीक बनली आहे. नर्सेसनी संपूर्ण दिवसभर थांबून-थांबून हे भावपूर्ण संदेश वाचले, एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रशंसा आणि पाठिंब्याने त्यांना भारावून टाकले.

आंतरराष्ट्रीय नर्स दिन २०२५ चे महत्त्व सांगताना, अपोलो हॉस्पिटल्सच्या डायरेक्टर - स्ट्रॅटेजी, श्रीमती सिंदूरी रेड्डी म्हणाल्या, "आंतरराष्ट्रीय नर्स दिनी, आम्ही आमच्या नर्सेसच्या दृढ समर्पणाला वंदन करतो, नर्सेस आरोग्य सेवा इकोसिस्टिमच्या एक महत्त्वपूर्ण स्तंभ आहेत. अपोलो हॉस्पिटल्समध्ये आम्ही असे मानतो की, आमच्या नर्सेस देखभाल आरोग्य प्रणाली निर्माण करण्यासाठी मौल्यवान आहेत. त्यांची सुरक्षा आणि कल्याण सर्वात महत्त्वाचे आहे आणि 'द पिंक बूक' आमच्या नर्सिंग टीम्ससाठी सुरक्षित व सहायक वातावरण तयार करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. आम्ही एक भविष्य निर्माण करत आहोत, जिथे नर्सेस सदैव यशस्वी होतील आणि प्रत्येक रुग्णाला असामान्य देखभाल मिळू शकेल."

अपोलो हॉस्पिटल्सच्या ग्रुप डायरेक्टर, नर्सिंग कॅप्टन (डॉ) उषा बॅनर्जी यांनी सांगितले, "आमच्या नर्सेस, आमचे भविष्य. नर्सेसची देखभाल अर्थव्यवस्थेला मजबूत बनवते.' ही या वर्षीची थीम अपोलो हॉस्पिटल्समध्ये आमच्या मिशनसोबत अतिशय खोलवर जुळणारी आहे. नर्सेस आमच्या आरोग्य सेवा प्रणालीचे हृदय आहेत आणि आम्ही त्यांचे कल्याण सर्वात जास्त महत्त्वाचे मानतो. आज आम्ही आमच्या नर्सेसच्या अमूल्य योगदानाला सन्मानित करत आहोत आणि त्यांचे निरंतर समर्थन व विकासासाठी आमच्या वचनबद्धतेला अधिक मजबूत करत आहोत."

अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये नर्सिंगच्या रीजनल डायरेक्टर, डॉ स्नेहा वैद्य आणि सिनियर नर्सिंग सुपरिंटेंडेंट श्रीमती रुपाली वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण आठवडाभराच्या कार्यक्रमांचे आयोजन अतिशय यशस्वीपणे करण्यात आले. यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आणि शैक्षणिक उपक्रम होतो, केस सादरीकरण, पॅनल चर्चा, प्रश्नमंजुषा आणि ट्रेझर  हंट यांचा समावेश होता. नर्सिंग टीम्समध्ये प्रोफेशनल विकास, एकजूट आणि कल्याण यांना प्रोत्साहन देत, आरोग्य सेवा प्रणालीमध्ये नर्सेसचे समर्पण आणि महत्त्वपूर्ण भूमिका यांचा सन्मान करणे हा या कार्यक्रमांचा उद्देश होता.

हा कार्यक्रम नर्सेससाठी आपले क्लिनिकल ज्ञान, सर्जनशीलता आणि सहयोगाची भावना प्रदर्शित करण्यासाठी एक गतिशील मंच बनला. या कार्यक्रमामध्ये आमच्या नर्सिंग टीम्सची एकजूट, समर्पण आणि असामान्य प्रतिभा दर्शवली गेली, रुग्णांना दयाळू भावनेने, उच्च दर्जाची देखभाल प्रदान करण्यात त्यांच्या महत्त्वाच्या भूमिकेला बळ मिळाले.

डॉ स्नेहा वैद्य म्हणाल्या, "नर्सेस म्हणजे रुग्णांच्या देखभाल प्रणालीचे हृदय आहेत आणि हे आयोजन त्यांची अतूट वचनबद्धता, कौशल्ये आणि भावना यांना सन्मानित करण्यासाठी करण्यात आले होते. या आयोजनाने आरोग्य सेवा समुदायांमध्ये नर्सेसचे अमूल्य योगदान अधोरेखित केले. त्यांना इतकी ऊर्जा आणि उत्साहाने एकत्र येताना पाहणे प्रेरणादायी होते."

या कार्यक्रमांमध्ये विविध युनिट्सच्या नर्सेस एकत्र आल्या, त्यामुळे एकजुटीची भावना, उत्कृष्टतेप्रती कटिबद्धता आणि प्रोफेशनल सामंजस्य यांना बळ मिळाले. सर्वांचे आभार मानून आणि प्रशंसा करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली, त्यामुळे नर्सिंग टीम्समध्ये अभिमान व प्रेरणा जागृत झाली.

कार्यक्रम संपल्यानंतर देखील काही दिवस ग्रॅटिट्यूड वॉल हॉस्पिटल्सच्या प्रांगणांमध्ये प्रदर्शित होत राहील, आणि लोकांवर, समुदायांवर नर्सिंग प्रोफेशनचा जो प्रभाव पडतो त्याची आठवण देत राहील. 

उद्याचे आरोग्य आजच्या नर्सेसच्या बळावर अवलंबून आहे. अपोलो हॉस्पिटल्सला गर्व आहे की ते जगाला निरोगी बनवण्यासाठी दयाळू भावनेने जगाची सेवा करण्यासाठी त्यांच्यासोबत उभे आहेत.

No comments:

Post a Comment