२० जून २०२५
महाराष्ट्र वीज निर्मिती महामंडळाची उपकंपनी महात्मा फुले रिन्यूएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड (महापीआरईआयटी) (महाप्रीट) आणि युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर प्रोजेक्ट सर्विसेस (यूएनओपीएस)द्वारे संचालित आंतरराष्ट्रीय संस्था सस्टेनेबल एनर्जी फॉर ऑल (एसईफॉर ऑल) यांनी सहयोग करत सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली आहे, ज्याअंतर्गत महाराष्ट्र राज्यात ऊर्जा र्काक्षमता (ईई) अंमलबजावणीला गती देण्यात येईल. या उपक्रमात अलायन्स फॉर एन एनर्जी एफिशिएंट इकॉनॉमी (एईईई) टेक्निकल भागीदार म्हणून काम करेल.
महाप्रीट महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत राज्य पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग (पीएसयू) महात्मा फुल बॅकवर्ड क्लास डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एमपीबीसीडीसी)ची पूर्णत: मालकीची उपकंपनी आहे. ही कंपनी सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रित करत नवीकरणीय ऊर्जा व पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.
हा सहयोग राज्यभरात ऊर्जा कार्यक्षमतेची अंमलबजावणी करण्याप्रती योगदान देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे, ज्यामुळे महाराष्ट्राचा शुद्ध ऊर्जा वाढवण्याप्रती व्हिजन २०३० आणि २०३० पर्यंत ऊर्जा कार्यक्षमता दुप्पट करण्याच्या उद्दिष्टाला पाठिंबा मिळेल. हा सहयोग महानगरपालिका इमारती आणि पाणी पंपिंग प्रणालींमध्ये ऊर्जा कार्यक्षमता वाढवणे आणि ऊर्जा-केंद्रित एमएसएमईसाठी स्टीम-अॅज-अ-सर्व्हिस व्यवसाय मॉडेलवर लक्ष केंद्रित करेल.
याप्रसंगीत मत व्यक्त करत महाप्रीटचे व्यवस्थापकीय संचालक आयएएस® श्री. बिपिन श्रीमली म्हणाले, “महाप्रीट राज्यामध्ये शुद्ध ऊर्जा परिवर्तनाला गती देण्यामध्ये अग्रस्थानी आहे. ऊर्जा कार्यक्षमतेला गती दिल्याने हवामान-स्थिर विकासासाठी नियोजन करणे, ऊर्जा वापर कमी करणे, उत्सर्जन कमी करणे आणि भावी विकास व्यक्ती- व पृथ्वी-साठी अनुकूल असण्याची खात्री घेणे शक्य होईल. एमएसएमईंमधील नाविन्यपूर्ण हस्तक्षेप ऊर्जा बचतीच्या पलीकडे जाऊन ऑपरेशनल विश्वासार्हता, पर्यावरणीय अनुपालन आणि खर्च बचतीसाठी साहयभूत ठरतील.''
“भारत आपल्या हवामान आणि ऊर्जा सुरक्षेच्या उद्दिष्टांसाठी प्रयत्नशील असताना ऊर्जा कार्यक्षमतेवर प्रबळ उप-राष्ट्रीय कृतीच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष करता येऊ शकत नाही. सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये ऊर्जा कार्यक्षमतेची गुंतवणूक अनलॉक करण्यासाठी, नवीन व्यवसाय मॉडेल्सचा शोध घेण्यासाठी आणि प्रत्यक्षात मापन करता येणारा परिणाम देण्यासाठी आणि स्थानिक संस्थांना बळकटी देण्यासाठी महाप्रीटसोबतचा सहयोग मॉडेल म्हणून सेवा देईल,'' असे एसईफॉर ऑलच्या एनर्जी ट्रान्झिशनचे संचालक ब्रायन डीन म्हणाले.
“भारतातील इमारती क्षेत्र ऊर्जेच्या मागणीत प्रमुख योगदानकर्ता म्हणून वेगाने उदयास येत आहे, जे प्रामुख्याने थर्मल आरामाच्या वाढत्या गरजांसह कार्यान्वित आहे. महानगरपालिका इमारती आणि जल पंपिंग यंत्रणा कार्यक्षमता सुधारण्यासाठी उच्च-प्रभावी संधी देते,'' असे एईईईचे रिसर्च अँड प्रोग्राम्सचे वरिष्ठ संचालक प्रमोद कुमार सिंग म्हणाले. “सुव्यवस्थित रेट्रोफिट प्रोग्राम उर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो, तसेच ऑपरेटिंग खर्च कमी करू शकतो आणि हवामान कृतीमध्ये सरकारी नेतृत्व निदर्शनास आणू शकतो.''
हा सामंजस्य करार एकीकृत, डेटा-संचालित व मापनीय ऊर्जा कार्यक्षमता सोल्यूशन्स वितरित करण्याप्रती सहयोगात्मक प्रयत्न आहे, जे महाराष्ट्राच्या हवामान व शाश्वतता ध्येयांना पाठ
No comments:
Post a Comment