_*भारतीय विशेषज्ञांनी नुकतीच सहमती दर्शवली आहे आणि तज्ञांच्या इनपुट्समधून समजले आहे की, भारतातील बाळांमध्ये एटॉपिक डर्मायटिस चे प्रमाण खूप जास्त आहे, जवळपास २० ते ३९% बाळांना हा त्रास सहन करावा लागतो*_
राष्ट्रीय, १3 जून २०२५: सेन्सिटिव त्वचेच्या बाबतीत जागरूकता वाढवण्यासाठी कटिबद्ध आणि रेव्हेन्यूनुसार जगातील सर्वात मोठी ग्राहक आरोग्य कंपनी केनव्यूने इंडियन अकॅडेमी ऑफ पीडियाट्रिक्स (आयएपी) दिल्लीच्या सहयोगाने 'ओट नेचर लॅब' चे आयोजन केले होते. लहान बाळांच्या सेन्सिटिव त्वचेसाठी पुराव्यांवर आधारित देखभाल रोजच्या रोज दिली जाण्याचे महत्त्व आणि या गंभीर आरोग्य स्थितींवर उपाययोजना म्हणून कोलाइडल ओटवर आधारित त्वचा देखभालीच्या भूमिकेबाबत यावेळी माहिती दिली गेली.
सेन्सिटिव त्वचेचा छुपा प्रभाव
एटॉपिक डर्मायटिस(एडी), एक्झिमा जेरॉसिस आणि डायपर डर्मायटिस यासारखे सेन्सिटिव त्वचेचे त्रास वाढत आहेत. जगभरात मोठ्यांपेक्षा लहान बाळांना एटॉपिक डर्मायटिसमुळे दुपटीने जास्त त्रास होतो. मागील दशकामध्ये शहरीकरण, प्रदूषण आणि हवामानातील बदल, तापमान व आर्द्रता वाढल्यामुळे भारतातील लहान बाळांमध्ये सेन्सिटिव त्वचेचे त्रास वाढत आहेत. भारतीय विशेषज्ञांनी नुकतीच दर्शवलेली सहमती आणि आयएपीच्या इनपुट्सनुसार, एटॉपिक डर्मायटिसने त्रस्त भारतीय मुलांची संख्या २० ते ३९% नी वाढली आहे.
आजच्या काळात पीडियाट्रिक ओपीडीमध्ये जवळपास ३०% बाळे ही त्वचेशी संबंधित तक्रारींसाठी आणली जातात . त्यांच्यासाठी एटॉपिक डर्मायटिसवरील उपचारांमध्ये मदतीसाठी लवकरात लवकर उपाययोजना करण्याची गरज असते. तरीही नवजात बाळे आणि लहान बाळांच्या त्वचेची काळजी घेण्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही, त्याचा थेट परिणाम बाळाच्या एकूण जीवन गुणवत्तेवर आणि कुटुंबाच्या आनंदावर होतो.
'ओट नेचर लॅब'मध्ये भारतातील प्रमुख पीडियाट्रिशियन, डर्मेटोलॉजिस्ट आणि हेल्थकेयर प्रोफेशनल्सच्या उपस्थितीत, पीडियाट्रिक स्किन केयर सायन्स आणि बाळांच्या सेन्सिटिव त्वचेवरील उपचारांमध्ये कोलाइडल ओटमीलच्या प्रमुख भूमिकेबाबत सर्वात नवीन वैज्ञानिक संशोधन, वास्तविक अनुभव आणि पुराव्यांवर आधारित प्रथांवर प्रकाश टाकण्यात आला.
कोलाइडल ओटवर आधारित एमोलिएंट्सवर वाढत्या क्लिनिकल विश्वासाबाबत विशेषज्ञांनी सहमती दर्शवली. आराम मिळवून देण्यासाठी, त्वचेवरील संरक्षक आवरण ठीक करण्यासाठी आणि मॉइश्चराइज करण्यासाठी सेन्सिटिव त्वचेवरील उपचारांमध्ये याच्या सकारात्मक परिणामांबाबत देखील त्यांनी माहिती दिली. त्यांनी बाळांच्या सेन्सिटिव्हिटी प्रोफाइलनुसार व्यापक उपाययोजना महत्त्वाच्या असल्याचे सांगितले, ज्यामध्ये फॉर्म्युलेशनबरोबरीनेच योग्य सामग्री निवडण्याचा देखील समावेश असतो.
आयएपी दिल्लीचे अध्यक्ष डॉ पंकज गर्ग म्हणाले, "बाळांच्या सेन्सिटिव त्वचेचे त्रास वाढत असल्यामुळे पीडियाट्रिक कम्युनिटी आणि आईवडील यांची जागरूकता वाढवण्याची तात्काळ आवश्यकता आहे. इंडियन अकॅडेमी ऑफ पीडियाट्रिक्स (आयएपी) ने सेन्सिटिव त्वचेवर अधिक चांगले उपाय करण्यासाठी मानकीकृत निर्देश लागू केले आहेत, यामध्ये कोमल देखभाल, त्रासदायक आणि त्वचेवर कठोर उत्पादने टाळणे, तसेच सेरामाइड्स, लिपिड आणि नैसर्गिक कोलाइड ओटमीलयुक्त एमोलिएंटचा नियमितपणे उपयोग करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे हे बाळांच्या सेन्सिटिव त्वचेच्या उपचारांचा आधारस्तंभ बनले आहे. आम्ही केनव्यूचे कौतुक करू इच्छितो की, त्यांनी बाळांच्या त्वचेच्या आरोग्याच्या बाबतीत जागरूकता वाढवण्यासाठी विज्ञान आणि शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले आहेत."
पीडियाट्रिक आणि डर्मेटोलॉजिकल दृष्टिकोनातून केस स्टडीजवर प्रकाश टाकताना, अनुभवी पीडियाट्रिशियन डॉ अरुण वाधवा आणि डॉ शैली कपूर यांनी सेन्सिटिव त्वचेच्या आजारांवरील उपचारांमध्ये व्यावहारिक आव्हाने आणि संपूर्ण उपचार यासारख्या यशस्वी उपचारांचे वर्णन केले, जे स्टिरॉइडची आवश्यकता कमी करण्यात मदत करतात, ज्यामुळे बाळाच्या जीवन गुणवत्तेवर प्रभाव पडतो.
या सत्राचे सूत्रसंचालन डॉ. ए. आर. सोमशेखर यांनी केले. प्रसिद्ध डर्मेटोलॉजिस्ट डॉ. संजीव कंधारी आणि डॉ. शैली कपूर, प्रसिद्ध पीडियाट्रिक ऍलर्जीस्ट डॉ. नीरज गुप्ता आणि अनुभवी बालरोगतज्ज्ञ डॉ. अरुण वाधवा यांच्यासमवेत त्यांनी कोलाइडल ओटचा समावेश बाळांच्या दैनंदिन स्किनकेअर दिनचर्येत, क्लिनिकमध्ये आणि घरी करण्याच्या सर्वोत्तम पद्धतींची माहिती दिली.
या वर्षाच्या सुरुवातीला, केनव्यू इंडियाने बाळांच्या सेन्सिटिव त्वचेच्या उपचारांमध्ये कोलाइडल ओट्स-आधारित त्वचेच्या देखभालीच्या भूमिकेवर भारतातील पहिली मानकीकृत सहमती शिफारसी लॉन्च केल्या. बाळांमध्ये सेन्सिटिव त्वचेच्या स्थितीवरील उपचारांसाठी निओनॅटोलॉजिस्ट, पीडियाट्रिशियन, ऍलर्जी विशेषज्ञ आणि त्वचा विशेषज्ञांना मार्गदर्शन प्रदान करणे हा याचा उद्देश होता. भारतीय बालरोग अकॅडेमी (आयएपी) द्वारे विशेषज्ञ इनपुट्स आणि समीक्षेसह सहमती पॅनलने मॉइश्चरायजरच्या लाभांविषयी माहिती दिली, विशेष पद्धतीने त्वचेला प्रभावीरित्या हायड्रेट करण्यासाठी, त्वचेवरील संरक्षक आवरण ठीक करण्यात मदत करण्यासाठी आणि सेन्सिटिव त्वचेच्या विविध स्थितींपासून आराम मिळवून देण्यासाठी कोलाइडल ओटमीलच्या लाभांवर प्रकाश टाकला. अशा प्रकारच्या इमोलिएंट्सचा दीर्घकाळपर्यंत उपयोग केल्याने फ्लेयर अप कमी करण्यात आणि खासकरून एडी असलेल्या मुलांमध्ये कॉर्टीकॉस्टिरॉइड्सची गरज कमी करण्यात मदत मिळू शकते.
केनव्यूमध्ये बिझनेस युनिट, इसेन्शियल हेल्थ अँड स्किन हेल्थ व मार्केटिंगचे उपाध्यक्ष श्री मनोज गाडगीळ यांनी सांगितले, "केनव्यूमध्ये आम्ही दैनंदिन देखभाल प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत. सेन्सिटिव त्वचेच्या स्थिती, खासकरून बाळांमध्ये, असल्याने बाळांबरोबरीने त्यांच्या कुटुंबाच्या एकूण आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. असे असले तरीही, सेन्सिटिव त्वचेच्या स्थिती आणि त्यांच्यावरील आवश्यक उपायांबाबत जागरूकता खूप कमी आहे. गेल्या काही वर्षांपासून एविनो बेबी सेन्सिटिव त्वचेच्या स्थितीबाबत जागरूकता वाढवण्यासाठी कटिबद्ध आहे. ओट्सच्या प्रभावाबाबत आमची 'ओट नेचर लॅब', अशा प्रकारचा पहिला जागतिक वैज्ञानिक शोध हा बाळांमध्ये सेन्सिटिव त्वचेच्या स्थितीबाबत जागरूकतेला मजबूत करण्याच्या दिशेने उचलण्यात आलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. वैज्ञानिक संवाद आणि शोधांच्या माध्यमातून, आम्ही अनेक दशकांपासून ओट्स विज्ञानासंदर्भातील आमच्या अनुभवांना जास्तीत जास्त आरोग्य तज्ञ आणि मातांपर्यंत पोहोचवत आहोत आणि त्यांना वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करण्यात आलेल्या उपाययोजना देत आहोत."
केनव्यूमध्ये बेबी अँड विमेन्स हेल्थ रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे रिजनल हेड डॉ दिलीप त्रिपाठी यांनी सांगितले, "अनेक पिढ्यांपासून केनव्यू सेन्सिटिव स्थितींवरील उपचारांसाठी कोलाइडल ओटमीलबाबत विज्ञानाला प्रेरणा देत आहे, जेणेकरून बेबीच्या त्वचेला पोषण आणि सुरक्षा प्रदान करण्यात मदत मिळू शकेल. सेन्सिटिव त्वचेसाठीच्या अनेक सामग्री फक्त मॉइश्चराइज करतात, तर ओट्स शुष्क, खाज येणाऱ्या त्वचेला आराम मिळवून देते आणि त्वचेचे नैसर्गिक सेरामाइड संतुलन व मायक्रोबायोम पुन्हा मिळवून देण्यात मदत करते. आम्ही बाळांच्या एकूण आरोग्य परिणामांना अधिक चांगले बनवण्यासाठी या स्थितींवरील उपचारांबाबत जागरूकता वाढवण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण, विज्ञानावर आधारित उपाय प्रदान करण्यासाठी पीडियाट्रिशियन व डर्मेटोलॉजिस्टसोबत मिळून काम करण्यासाठी कटिबद्ध आहोत."
'ओट नेचर लॅब' सायन्टिफिक इमर्शनला मातांपर्यंत पोहोचवले गेले, यामध्ये त्यांना ओट्सचे गुण प्रत्यक्ष अनुभवता आले. एविनो बेबीचा सामग्री वारसा ते उत्कृष्टता डेमोपर्यंत आणि ट्रिपल ओट कॉम्प्लेक्सच्या प्रभावाबाबत जाणून घेण्यापर्यंत डीआयवाय उत्पादने कार्यशाळांमध्ये भाग घेण्यापर्यंत, मातांनी बेबीच्या सेन्सिटिव त्वचेच्या स्थितीची सर्वोत्तम देखभाल करण्याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी ब्रँड आणि त्यांच्या मेडिकली तयार उत्पादन शृंखलेसोबत काम केले.
No comments:
Post a Comment