सौंदर्य हे एखाद्याचे जग कसे बदलवू शकते, यावर एका हृदयस्पर्शी लघुपटाचे सादरीकर
व्हिडिओची लिंक: Birla Opus Paints | Celebrating Colours of India | Mumbai
मुंबई: आदित्य बिर्ला ग्रुपच्या ग्रासीम इंडस्ट्रीज अंतर्गत येणाऱ्या बिर्ला ओपस पेंटने त्यांच्या ‘दुनियेत रंग भरूया’ या ब्रीदवाक्यावर आधारीत एक नवे ब्रँड कँपेन सुरु केले आहे. भारतातील ऐतिहासिक वारसांना या मोहिमेअंतर्गत पुनर्जीवित करण्यात येईल. गेटवे ऑफ इंडिया या स्थळापासून मोहिमेची सुरुवात होईल. रंगांच्या माध्यमातून अभिमान, सौंदर्य आणि परिवर्तनाची भावना देशभरात कशी जागृत होऊ शकते, हे यातून दिसून येईल.
संस्थेच्या ‘ओपस बॉय’ या यशस्वी अभियानाच्या धर्तीवर नवी जाहिरात मोहीम सुरु करण्यात आली आहे. ‘दुनियेत रंग भरूया’ हा याच मालिकेचा पुढील टप्पा आहे. रंगांमध्ये केवळ ठिकाणाचे रुप नव्हे तर विचार आणि दृष्टीकोन बदलण्याची ताकद असते, हेच यातून दाखवण्यात आले आहे.
अॅनिमेटेड पद्धतीने बनवलेल्या हृदयस्पर्शी लघुपटात ‘ओपस बॉय’ जगाला रंग देऊन आनंद पसरवण्याचा प्रयत्न करतो. रंगांच्या माध्यमातून होणाऱ्या परिवर्तनाचा विचार याद्वारे आणखी खोलवर रुजवला जाईल. याअंतर्गत भारतातील प्रसिद्ध स्मारकांना नव्या रुपात दाखवले जाईल. सौंदर्य हे आश्चर्यकारक रितीने विचार आणि कथांना जन्म देऊ शकते, हे यातून दिसेल. ही आपली स्मारके अत्यंत भव्य आणि ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाची आहेत. तरीही ‘‘दुनियेत रंग भरूया’ या तत्त्वाज्ञानावर आधारीत मोहीमेमुळे स्मारकांची कलात्मक पुनर्कल्पना केली जाईल. याद्वारे या परिचित स्मारकांकडे आणखी वेगळ्या रंगीत आणि नव्या दृष्टीने पाहण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
बिर्ला ओपस पेंट्सचे सीईओ रक्षित हरगावे हे चित्रपटाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना म्हणाले, “आमच्या मागील कँपेनला मिळालेल्या दमदार प्रतिसादानंतर आता हे नवे कँपेन सादर करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. भारतातील वारसा स्थळांना विविध रंग आणि सुंदर नक्षीकामाद्वारे बदलण्याची शक्यता यातून अधोरेखित होते. रंगांचा प्रभाव आणि एखादे स्थळ सुंदर बनवण्याच्या आमच्या कटिबद्धतेला या चित्रपटाद्वारे बळ मिळेल. तसेच यातून देशभक्ती आणि देशाभिमानाची भावना बळकट होईल.”
बिर्ला ओपस पेंट्सचे मार्केटिंग हेड इंद्रप्रीत सिंग पुढे म्हणाले, ‘दुनियेत रंग भरूया’ या कँपेनच्या माध्यमातून नेहमीच रंगांच्या सखोल प्रभावावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या नव्या मोहिमेद्वारे आम्ही हा विचार राष्ट्रीय स्तरावर घेऊन जात आहोत. राष्ट्रीय वारसा स्थळे आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांवर आम्ही रंगांची क्षमता दाखवून नवी आशेची कथा लिहिण्याचे उद्दिष्ट आम्ही समोर ठेवले आहे. यामुळे प्रत्येक भारतीयाला त्यांच्या सभोवतालचे सौंदर्य आणि रंगांच्या परिवर्तनात्मक बदलाची आठवण करून दिली जाईल. ”
लिओ इंडियाचे चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर सचिन कांबळे म्हणाले, “यापूर्वीच्या लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटानंतर बिर्ला ओपसच्या या नव्या चित्रपटाने ‘दुनियेत रंग भरूया’ या विचाराला अधिक बळकटी मिळाली आहे. याअंतर्गत आम्ही 3D फिल्म अॅनिमेशनचा वापर करून एक समृद्ध आणि आकर्षक अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे. भारतातील सर्वात प्रतिष्ठित दृश्यांमधून एकाची निवड करत त्या पार्श्वभूमीवर चित्रपटाचा सेट तयार करण्यात आला. ही स्मारके भव्य आणि कालातीत असल्यामुळे रंगांची परिवर्तन ताकद वापरून जगाची पुनर्कल्पना करण्याकरिता प्रेक्षकांना प्रेरणा देता येते. यासाठी ही दृश्ये पार्श्वभूमी म्हणून वापरण्यात आली आहेत. ”
या नव्या कँपेनची संकल्पना लिओ इंडिया आणि झोम्बी स्टुडिओ, ब्राझील यांनी सादर केली. टीव्ही, डिजिटल मीडिया, होर्डिंग्स, प्रींट आणि रेडिओ यांसारख्या विविध माध्यमांद्वारे हे कँपेन राबवले जात आहे. जेणेकरून देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचून ही मोहीम अधिक व्यापक करता येईल. हा लघुपट गेटवे ऑफ इंडिया येथील एका ओळखीच्या दृश्याने सुरु होतो. स्मारकाची भुरळ पाडत एक छायाचित्रकार लोकांना स्वत:चे फोटो काढण्यासाठी आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र त्याला फार यश मिळत नाही. हे पाहून तरुण ओपस बॉय बदल घडवून आणण्यासाठी प्रेरित होतो. ओपसच्या स्पर्शाने स्मारक विविधरंग आणि ढंगात उजळून निघते. पाहणाऱ्यांना मोहित करते. त्यामुळे स्मारकाचे सौंदर्य न्याहाळण्याची इच्छा पुन्हा जागृत होते. या बदलामुळे केवळ स्मारकच नव्हे तर छायाचित्रकारालाही आनंद आणि नवा उद्देश मिळवून देते. सौंदर्य केवळ भिंतीच नव्हे तर कुणाचेही जग बदलू शकते, हेच यातून दाखवून देण्यात आले आहे.
चित्रपटाची लिंक:
एजन्सी क्रेडिट्स:
ग्राहक: बिर्ला ओपस पेंट्स
क्रिएटिव्ह एजन्सी: लिओ बर्नेट इंडिया
प्रॉडक्शन हाऊस: झोम्बी स्टुडिओ, ब्राझील
No comments:
Post a Comment