Monday, 25 August 2025

ब्राह्मण सेवा मंडळा’च्या शतकमहोत्सवी गणेशोत्सवात ‘प्रिय भाई… एक कविता हवी आहे’, ‘संकर्षण via स्पृहा, आणि पद्मश्री माणिक वर्मा यांच्या सुमधुर गीतांवर आधारित ‘हसले मनी चांदणे’ विशेष आकर्षण!


मुक्ता बर्वे, स्पृहा जोशी, संकर्षण कऱ्हाडे यांचे सादरीकरण तर अभिनेत्री वंदना गुप्ते, राणी वर्मा यांची विशेष उपस्थिती.

 

मुंबई, (सां. प्रतिनिधी) : ब्राह्मण सेवा मंडळाचा यंदाचा शतकमहोत्सवी गणेशोत्सव असल्यामुळे तो संस्मरणीय राहावा म्हणून, अत्यंत वेगळ्या प्रकारे साजरा करण्याचे संस्थेने ठरविलेले आहे. धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांसोबतच श्रीं च्या आगमनाचा सोहळा, श्री गणेश याग, श्री गणेश अथर्वशीर्ष सहस्त्रावर्तन, महाप्रसाद व श्रींच्या विसर्जन सोहळ्याची पारंपारिक अशी भव्य मिरवणूक इत्यादी कार्यक्रम योजिले आहेत.

 

'ब्राह्मण सेवा मंडळा’च्या शतकमहोत्सवी गणेशोत्सवाचे औचित्य साधत ‘प्रिय भाई एक कविता हवी आहे’ हा पु.ल. देशपांडे आणि सुनीताबाई यांच्याशी जोडलेले कविता - प्रेमातून उलगडणारे संवाद आणि शोध टिपण असा अत्यंत वेगळा काव्यमय नाट्यप्रयोग अभिनेत्री  मुक्ता बर्वे अत्यंत मुलायम आणि प्रभावी अभिनयाद्वारे सादर करणार आहेत. कथा-काव्य, रेखाचित्रे, संगीत, गायन आणि समृद्ध वातावरण रसिकांना एक विलक्षण अनुभव देणार आहे. मुक्ता बर्वे यांच्यासोबत या कार्यक्रमात अमित वझे, मानसी वझे, निनाद सोलापूरकर, जयदीप वैद्य, अंजली मराठे यांची सोबत असणार आहे. दि. २९ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८ वा. हा विशेष कार्यक्रम सादर होईल. दुसरा अत्यंत वेगळा कार्यक्रम सादर करण्यासाठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि अभिनेत्री स्पृहा जोशी या लोकप्रिय जोडीचा ‘संकर्षण via स्पृहा’ हा मराठी साहित्य - मनोरंजनाचा कार्यक्रम सादर होईल. कवितांपासून गाणी, किस्से, आठवणी आणि खास गप्पांची मैफिल ते सादर करतील. त्यांच्याबरोबर सहकलाकार म्हणून विनय चौलकऱे आणि गांधीर जोग यांची साथ असणार आहे. १ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८ वा. हा कार्यक्रम सादर होईल. त्याबरोबरीने पद्मश्री माणिक वर्मा जन्मशताब्दी निमित्ताने माणिक वर्मा यांच्या सुमधुर गीतांवर आधारित ‘हसले मनी चांदणे’ हा कार्यक्रम सादर होईल. माणिक वर्मा यांच्या कन्या वंदना गुप्ते, राणी वर्मा आणि इतर सदस्य उपस्थित राहणार आहेत. दि. ३ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८ वा. हा कार्यक्रम सादर होणार आहे. या व्यतिरिक्त दि. ३० ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८ वा. ‘ऑपरेशन सिंदूर – नव्या भारताचा सामर्थ्याविष्कार’. वक्ते : मा. ले. ज. विनायक पाटणकर (नि.) व मा. ले. ज. एस. एस. हसबनीस (नि.), मुलाखतकार : जेष्ठ पत्रकार उदय निरगुडकर. दि. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८ वा. ‘उकलुया हस्तरेखांचे गूढ’- वक्ते : प्रद्योत पेंढारकर, मुलाखतकार : सर्वेश देशपांडे. दि. ५ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८ वा. वारकरी कीर्तन – ह.भ.प. श्री. जगन्नाथ महाराज पाटील. अश्या अत्यंत वेगळ्या कार्यक्रमांचा आस्वाद गणेशभक्त रसिकांना 'ब्राह्मण सेवा मंडळा'च्या सांस्कृतिक मंचाने उपलब्ध करून दिले आहे. रसिकांना हे सर्व कार्यक्रम विनामूल्य पहाता येणार असून काही रांगा आरक्षित असणार आहेत. हे सर्व कार्यक्रम 'ब्राह्मण सेवा मंडळ', भवानी शंकर रोड, दादर (प), मुंबई २००२८ येथे सादर होतील.

 

ब्राह्मण सेवा मंडळाची स्थापना दि. १० डिसेंबर १९१६ रोजी झाली. तथापि पहिला श्री गणेशोत्सव ११ ते २० सप्टेंबर १९२६ रोजी ‘मुकुंद मॅन्शन’ मध्ये संपन्न झाला. स्थापनेपासूनच मंडळामध्ये अनेक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन केले गेले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये  श्री. राम मराठे, श्रीमती. जयमाला शिलेदार, तर्कतीर्थ श्री. लक्ष्मणशास्त्री जोशी, डॉ. प्रभा अत्रे, प्रा. वसंत बापट, श्री. वि. दा. करंदीकर, श्री. मंगेश पाडगावकर, श्री. सच्चिदानंद शेवडे, श्री. रामदास कामत, श्रीमती. आशा खाडिलकर, श्री. चारुदत्त आफळे, श्री. दिलीप प्रभावळकर, श्री. प्रशांत दामले, श्री. राहुल देशपांडे, श्री. कौशल इनामदार इत्यादी अनेक कलाकारांनी, व्याख्यात्यांनी आणि मान्यवरांनी आपल्या कलेचे सादरीकरण येथे केले

No comments:

Post a Comment