Showing posts with label 'झी टॉकीज'. Show all posts
Showing posts with label 'झी टॉकीज'. Show all posts

Saturday, 21 March 2020

सामाजिक जबाबदारी ओळखून, घरी थांबणाऱ्या मंडळींसाठी 'झी टॉकीज' ठरणार मनोरंजनाचा सोबती

मराठी सिनेमा म्हटलंकी सिनेमागृहप्राईम टाइम या शब्दांच्या बरोबरीने आठवतेती म्हणजे 'झी टॉकीजही मराठी चित्रपट वाहिनी!! प्रेक्षकांची ही अत्यंत लाडकी अशी वाहिनीदर्जेदार मराठी चित्रपटांची मेजवानी नेहमीच घेऊन येतेसंपूर्ण जगभरातील मंडळी कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहेतया स्थितीत सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून सिनेमागृहदेखील बंद करण्यात आली आहेतसामाजिक भान राखणे गरजेचे आहेमहाराष्ट्रातील मंडळी याची काळजी घेत आहेतअशा परिस्थितीमध्ये प्रेक्षकांना हवे असणारे मनोरंजन 'झी टॉकीजही वाहिनी घेऊन येत आहेगुढी पाडव्याच्या निमित्तानेएव्हरग्रीन मराठी चित्रपटांचा खजिना 'झी टॉकीज'वर असणार आहे.  'झपाटलेलाहे चित्रपट 'झी टॉकीजवाहिनीवर पाहायला मिळणार आहेतआजच्या काळात सुद्धा हे चित्रपट हसवून हसवून लोटपोट करतातया दोन चित्रपटांच्या बरोबरीने 'नशीबवानहा आणखी एक उत्कृष्ट चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळेलअति लोभ केल्यामुळे काय परिस्थिती उद्भवू शकते हे या चित्रपटातून शिकायला मिळतेभाऊ कदमच्या उत्तम अभिनयाची झलक सुद्धा या सिनेमात पाहायला मिळेलआजही प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणारा, 'अशी ही बनवाबनवीहा एव्हरग्रीन मराठी चित्रपट पाहण्याची संधी सुद्धा मिळणार आहेसचिन पिळगावकरांचे दिग्दर्शनलक्ष्या आणि अशोक सराफ यांचा दर्जेदार अभिनयआणि विनोदाचा महापूर अशी या चित्रपटाची भट्टी जमून आली आहेअनेक वर्षे लोटलीतरी आजही या चित्रपटाची जादू कमी झालेली नाहीहीच जादू पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहेही बनवाबनवी करून झालीकी दादा कोंडके 'झी टॉकीज'वर अवतरणार आहेतते 'पळवापळवीघेऊनदादांच्या विनोदी ढंगाची मजा अनुभवण्याची ही संधी सुद्धा प्रेक्षक दवडणार नाहीतया धमाकेदार दिवसाचा शेवट होईलतो 'ट्रिपल सीटया सिनेमानेचॉकलेट हिरो अंकुश चौधरी याची या सिनेमात उडणारी तारांबळ पाहताना भरपूर मनोरंजन होतेकोरोनापासून बचावाकरिता घरी थांबणाऱ्या प्रेक्षकांसाठीपाडव्याच्या मुहूर्तावर मनोरंजनाचा धमाका 'झी टॉकीजघेऊन येणार आहे.

Monday, 9 March 2020

स्त्रियांचा तिरस्कार करणाऱ्या दांडेकरांना पुरून उरली पल्लवी!!!


'झी टॉकीज' ही मराठी चित्रपट वाहिनी 'गोल गोल गरा गरा' हा टॉकीज ओरिजिनल चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. या सिनेमातील दादा दांडेकर यांच्या घरी स्त्रियांना प्रवेश नाही. याच दांडेकर कुटुंबातील बाळच्या प्रेमात पडलेली प्राची आणि आपलं हे प्रेम मिळवण्याची तिची धडपड, रविवारी १५ मार्चला 'झी टॉकीज'वर पाहायला मिळेल. प्राचीची भूमिका साकारणारी अभिनेत्री पल्लवी पाटील हिच्याशी मारलेल्या या दिलखुलास गप्पा
१. 'गोल गोल गरा गरा'मधील तुझ्या भूमिकेविषयी आम्हाला काय सांगशील?या चित्रपटात मी प्राची ही भूमिका साकारत आहे. तिचं आपल्या प्रियकरावर खूप प्रेम आहे. मुंबईत लहानाची मोठी झालेली, स्वतःच्या पायावर उभी असलेली ही मुलगी अलिबागच्या एका मुलाच्या प्रेमात पडते. आपल्या बाबांची लाडकी प्राची, खूप भावनिक आणि मोठी स्वप्नं पाहणारी आहे. तिच्या प्रियकराच्या घरी मुली आलेल्या चालत नाहीत, हे तिला कळल्यावर ती काय शक्कल लढवते हे चित्रपट पाहताना तुमच्या लक्षात येईल.अतुल काळे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. त्यांनी मला ही भूमिका साकारण्यासाठी खूप मार्गदर्शन केले आहे. अभिनयात सहजपणा आला पाहिजे, यासाठी मी प्रयत्न केला आहे. त्यामुळे माझी भूमिका प्रेक्षकांना पसंत पडेल, अशी आशा आहे.  

२. तुझ्या भूमिकेत आणि पल्लवीच्या आयुष्यात काही साम्य आहे का?कुठलीही नवी गोष्ट करत असताना, प्राची ज्याप्रकारे स्वतःला त्यात झोकून देते, त्याचप्रमाणे मला सुद्धा नव्या गोष्टी करताना त्यात पूर्णपणे स्वतःला वाहून घेतलेलं आवडतं. त्यामुळे पल्लवी आणि प्राची यांच्यात साम्य आहे, हे नक्की! कुठलीही नवी भूमिका साकारत असताना, आपल्यात आणि त्या भूमिकेत काय साम्य आहे, ते समजून घेण्याचा प्रयत्न कलाकार करत असतो. मी एखादी भूमिका करत असेन, त्यावेळी रोजच्या आयुष्यात सुद्धा त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करते. 
३. स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक देणाऱ्या पुरुषांविषयी तुझे काय मत आहे?अशा व्यक्तीला पुरुषच नाही, तर माणूस असण्याचा दर्जा सुद्धा मी देणार नाही. आदर देण्याबद्दल म्हणाल, तर पुरुषांनी स्त्रियांना योग्य आदर द्यायला हवा, असं आपण नेहमी म्हणत असतो. पण, तीच गोष्ट स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा लागू होते. प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला योग्य तो आदर द्यायलाच हवा. आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुषांकडून अशा घटना जास्त प्रमाणात घडतात ही गोष्ट खरी आहे. स्त्रियांना आपण देत असलेली वागणूक चुकीची आहे, ती थांबली पाहिजे हे त्या पुरुषांनी समजून घेतलं पाहिजे. जेव्हा ती पुरुषमंडळी ते समजून घेतील, त्यांना ही जाणीव करून देणाऱ्या व्यक्ती सगळ्यांच्या आयुष्यात असतील, त्याचवेळी समाजातील ही परिस्थिती बदलू शकेल.
४. सहकलाकारांसोबत काम करण्याच्या अनुभवाविषयी थोडं सांग.सगळ्या टीमसोबत काम करण्याचा अनुभव भन्नाट होता. गिरीश ओक, सुशांत शेलार, उदय टिकेकर, अभय राणे, प्रतीक देशमुख अशा छान कलाकारांसोबत मी काम केलं. या अभिनेत्यांसह आमचे दिद्गर्शक अतुल काळे यांच्यासह काम करायला सुद्धा खूप मजा आली. सगळ्याच जणांनी मला छान समजून घेतलं. गिरीश सर आणि उदय टिकेकर यांच्यासोबत मी पहिल्यांदाच काम करत होते; त्यांच्यासोबत मजा करत करत काम करायचा अनुभव घेता आला.सगळ्यांनी खूप धमाल करून काम केलेलं असल्याने हा चित्रपट छान जमून आलाय असं मी नक्की म्हणेन.
५. शूटिंगदरम्यानचा एखादा किस्सा किंवा एखादी आठवण आम्हाला सांगशील का?मी म्हणाले त्याप्रमाणे आम्ही खूपच मजा केलेली आहे. त्यामुळे बऱ्याच गमतीजमती घडलेल्या आहेत. विनोदी भूमिका साकारणं मला खूप आवडतं, पण अशा प्रकारच्या भूमिका करण्याची संधी अजून फारशी मिळालेली नाही. 'गोल गोल गरा गरा'च्या निमित्ताने ही संधी मला मिळाली.माझा सहकलाकार ज्यावेळी खूप उत्तमरित्या काम करत असेल, त्यावेळी मी प्रेक्षक बनून जाते. कलाकार म्हणून उभी असूनही, मी प्रेक्षकांप्रमाणे त्यांचा अभिनय अनुभवत असते. या चित्रपटातील सगळेच कलाकार उत्तम आहेत. त्यामुळे असं बऱ्याचदा घडलं, की मी माझं हसणं आवरू शकले नाही. एखादा सीन शूट करत असताना मला मधेच हसायला आल्यामुळे, बऱ्याचदा तो प्रसंग पुन्हा चित्रित करावा लागलेला आहे.
६. 'झी टॉकीज' आता टॉकीज ओरिजिनल ही थीम घेऊन आलेले आहे. स्वनिर्मित चित्रपट ही वाहिनी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. याविषयी तुझे मत काय आहे?आजवर खूप चित्रपट पाहण्याची संधी 'झी टॉकीज'ने प्रेक्षकांना दिलेली आहे. आता टॉकीज ओरिजिनलच्या माध्यमातून, ही वाहिनी स्वनिर्मित चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. अशाच दर्जेदार कलाकृती 'झी टॉकीज'कडून नेहमी घडत राहू देत, आणि सगळ्यांनाच उत्तम चित्रपट पाहण्याची संधी वर्षानुवर्षे मिळत राहू दे. अशीच एक भन्नाट कलाकृती असलेला 'गोल गोल गरा गरा' हा चित्रपट रविवार १५ मार्च रोजी, 'झी टॉकीज'वर पाहायला विसरू नका.

Thursday, 12 September 2019

'झी टॉकीज'वर अवतरणार सौ. शशी देवधर!!!

        'झी टॉकीज' वाहिनीवर कुठल्या सिनेमाचा प्रीमियर होणार, याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. उत्साही प्रेक्षकांचा रसभंग होणार नाही याची काळजी नेहमीच ही वाहिनी घेत असते. येत्या रविवारी म्हणजेच, १५ सप्टेंबर रोजी अशाच एक उत्कृष्ट सिनेमाचा 'वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर' झी टॉकीजवर रंगणार आहे. मराठी चित्रपटांच्या या सर्वोत्तम वाहिनीवर दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता 'सौ. शशी देवधर' हा चित्रपट प्रेक्षकांना बघायला मिळेल. आपल्या विखुरलेल्या आयुष्याची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका स्त्रीची ही कहाणी आहे.
 महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर, अजिंक्य देव आणि तुषार दळवी यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. अजिंक्य वर्तक (अजिंक्य देव) यांच्या कारमुळे अपघात झाल्यावर स्वतःची ओळख विसरलेल्या शुभदाची ही कहाणी अमोल शेटगे यांनी दिग्दर्शित केली आहे. या कठीण प्रसंगात पोलिसांच्या मदतीने ती कशी वाट काढते याभोवती संपूर्ण कथानक फिरते. अपघाताच्या आघातातून शुद्धीत आल्यावर शशी देवधर (तुषार दळवी) आपले पती असल्याचं शुभदा सांगते. पण, तिने सांगितलेल्या पत्त्यावर पोचल्यावर पोलिसांना असं लक्षात येतं, की तिच्या कुटुंबीयांपैकी कुणीही तिथे राहत नाही. खचून गेलेल्या आणि निराधार झालेल्या शुभदाला अजिंक्य आपल्या घरी घेऊन जायचा निर्णय घेतो. या साऱ्या गोष्टी घडत असतानाच, दुसरीच एक व्यक्ती आपण शुभदाचे पती असल्याचे सांगत पोलिसांना येऊन भेटते. तिचे खरे नाव शुभदा नसून नीलिमा आहे, हे सर्वांना कळल्यावर सुरु होतो तो पुढचा प्रवास! स्वतः मानसोपचार तज्ज्ञ असलेले डॉ. अजिंक्य वर्तक या परिस्थितीत तिच्यावर उपचार करायचा निर्णय घेतात.
        अर्थात, तिचे हे आजारपण खरे आहे का? ती नक्की शुभदा आहे की नीलिमा? या सगळ्यात तिचा काही कट तर नाही ना? यात उल्लेखित शशी देवधर नक्की कोण आहेत? हे सर्व जाणून घेण्यासाठी येत्या रविवारी सौ. शशी देवधर हा सिनेमा पाहावा लागेल. तेव्हा पाहायला विसरू नका, एका रोमांचक चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर, १५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता, फक्त आपल्या लाडक्या 'झी टॉकीज' वर!!!