Showing posts with label 'युवा सिंगर्स'. Show all posts
Showing posts with label 'युवा सिंगर्स'. Show all posts

Thursday, 14 November 2019

एम. एच. फोक ठरले 'युवा सिंगर्स'मध्ये 'एक नंबर'!!!!

अनेक दर्जेदार मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येणारी उत्कृष्ट मराठी वाहिनी, 'झी युवाही सगळ्यांची लाडकी वाहिनी आहेउत्तमोत्तम मालिकांच्या बरोबरीनेचअप्रतिम अशा कथाबाह्य कार्यक्रमांची मेजवानी सुद्धा 'झी युवावाहिनीवर अनुभवायला मिळते. 'युवा सिंगर एक नंबरहा गाण्यांचा कार्यक्रम नुकताच संपन्न झालेला आहेसंपूर्ण महाराष्ट्रभरातून प्रतिभावंत गायक या स्पर्धेत सहभागी झाले होतेया 'एक नंबरस्पर्धेचा शेवट सुद्धा तितकाच धमाकेदार झाला.
एमएचफोकने या स्पर्धेचे विजेतेपद मिळवलेअनिमेश ठाकूरपूजा-पल्लवीदर्शन-दुर्वांकुरजगदीश चव्हाणओंकार कानिटकर या अंतिम फेरीतील स्पर्धकांना मागे टाकत एमएचफोकने 'एक नंबरस्थान पटकावत यश मिळवले. 'युवा सिंगर्स'मध्ये अव्वल क्रमांक पटकवणाऱ्या या गटाने मानचिन्हासह  लाख ६० हजार रुपयांचा धनादेशाचे बक्षीस मिळवलेस्पर्धेतील सगळ्याच सादरीकरणांमधून प्रेक्षकांची आणि परीक्षकांची मने जिंकण्यात एमएचफोकला यश मिळाले होतेस्पर्धा जिंकण्याच्या शर्यतीत सुरुवातीपासूनच ते प्रमुख दावेदार होतेओंकार कानिटकर आणि दर्शन-दुर्वांकुर यांनी अनुक्रमे दुसऱ्या  तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवलेदोन्ही उपविजेत्यांनाही मानचिन्ह  धनादेश अशी पारितोषिके देण्यात आलीपरीक्षक वैभव मांगले आणि सावनी शेंडे यांच्यासह शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची सोहळ्यातील उपस्थिती प्रार्थनीय ठरलीअष्टपैलू अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिच्या उत्कृष्ट निवेदनामुळे सोहळ्याची रंगत अधिक वाढली.

Tuesday, 13 August 2019

'युवा सिंगर्स' साजरा करणार, 'एक नंबर' आठवडा!!!

'युवा सिंगर एक नंबर' हा कार्यक्रम ७ ऑगस्टपासून झी युवा वाहिनीवर सुरू झाला आहे. कथाबाह्य कार्यक्रमांच्या यादीत या आणखी एका दमदार कार्यक्रमाची भर पडली आहे. कथाबाह्य प्रकारांमध्ये थोडासा विराम वाहिनीने घेतला होता, परंतु त्यांचे पुनरागमन अत्यंत धमाकेदार झाले आहे. पहिल्या आठवड्यातच लोकांची मने जिंकणारा हा 'एक नंबर' कार्यक्रम, स्वातंत्र्य दिन आणि नारळीपौर्णिमेच्या मुहूर्तावर, एक खास भाग सर्वांसाठी घेऊन येणार आहे. नारळीपौर्णिमा व कोळी बांधव यांचे एकमेकांशी असलेले नाते अतूट आहे; हेच नातं या आठवड्यातील 'युवा सिंगर'च्या सेटवर पाहायला मिळणार आहे. अनिमेश ठाकूर एक जोशपूर्ण कोळीगीत सादर करणार आहे. जल्लोषपूर्ण वातावरणात, वैभव मांगले आणि मृण्मयी देशपांडे यांचे पाय थिरकले नाहीत, तरच नवल! पहिल्या भागातच त्यांच्या नृत्याची झलक, प्रेक्षकांनी पाहिली होती. या कोळीगीतावर सुद्धा हे दोघे त्यांच्या नृत्याचा जलवा दाखवताना दिसतील. 
नारळी पौर्णिमा यंदा स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर आली आहे. त्यामुळे साहजिकपणे, ज्याप्रकारे नारळीपौर्णिमा साजरी केली जाणार आहे, त्याचप्रमाणे भारताचा स्वातंत्र्यदिन सुद्धा सेटवर साजरा होईल. स्पर्धक 'ने मजसी ने' हे गाणे या मंचावर सादर करतील. सावरकरांनी लिहिलेल्या या गीताच्या सादरीकरणातून, देशप्रेमाची भावना जागृत करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. याशिवाय इतर देशभक्तीपर गीते स्पर्धकांकडून सादर केली जातील. परीक्षक वैभव मांगले स्वतः सुद्धा या मंचावर आपली गायनकला सादर करताना पाहायला मिळतील. संपूर्णपणे रोमांचपूर्ण वातावरणाचा शेवट, अंतिम १६ स्पर्धकांच्या निवडीने झालेला पाहायला मिळेल. या १६ स्पर्धकांची वाटचाल पुढे सुरू राहण्यासाठी त्यांच्या हाती, 'गुरुकिल्ली' असेल. देशभक्ती, मजामस्ती व आनंद अशा सगळ्याच गोष्टींचा संगम साधणारा 'युवा सिंगर, एक नंबर'चा हा आठवडा अजिबातच चुकवू नका. पाहायला विसरू नका, ३रा व चौथा भाग बुधवार आणि गुरुवार, रात्री ९ वाजता, फक्त आपल्या लाडक्या 'झी युवा'वर!!!