Tuesday, 13 August 2019

'युवा सिंगर्स' साजरा करणार, 'एक नंबर' आठवडा!!!

'युवा सिंगर एक नंबर' हा कार्यक्रम ७ ऑगस्टपासून झी युवा वाहिनीवर सुरू झाला आहे. कथाबाह्य कार्यक्रमांच्या यादीत या आणखी एका दमदार कार्यक्रमाची भर पडली आहे. कथाबाह्य प्रकारांमध्ये थोडासा विराम वाहिनीने घेतला होता, परंतु त्यांचे पुनरागमन अत्यंत धमाकेदार झाले आहे. पहिल्या आठवड्यातच लोकांची मने जिंकणारा हा 'एक नंबर' कार्यक्रम, स्वातंत्र्य दिन आणि नारळीपौर्णिमेच्या मुहूर्तावर, एक खास भाग सर्वांसाठी घेऊन येणार आहे. नारळीपौर्णिमा व कोळी बांधव यांचे एकमेकांशी असलेले नाते अतूट आहे; हेच नातं या आठवड्यातील 'युवा सिंगर'च्या सेटवर पाहायला मिळणार आहे. अनिमेश ठाकूर एक जोशपूर्ण कोळीगीत सादर करणार आहे. जल्लोषपूर्ण वातावरणात, वैभव मांगले आणि मृण्मयी देशपांडे यांचे पाय थिरकले नाहीत, तरच नवल! पहिल्या भागातच त्यांच्या नृत्याची झलक, प्रेक्षकांनी पाहिली होती. या कोळीगीतावर सुद्धा हे दोघे त्यांच्या नृत्याचा जलवा दाखवताना दिसतील. 
नारळी पौर्णिमा यंदा स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर आली आहे. त्यामुळे साहजिकपणे, ज्याप्रकारे नारळीपौर्णिमा साजरी केली जाणार आहे, त्याचप्रमाणे भारताचा स्वातंत्र्यदिन सुद्धा सेटवर साजरा होईल. स्पर्धक 'ने मजसी ने' हे गाणे या मंचावर सादर करतील. सावरकरांनी लिहिलेल्या या गीताच्या सादरीकरणातून, देशप्रेमाची भावना जागृत करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. याशिवाय इतर देशभक्तीपर गीते स्पर्धकांकडून सादर केली जातील. परीक्षक वैभव मांगले स्वतः सुद्धा या मंचावर आपली गायनकला सादर करताना पाहायला मिळतील. संपूर्णपणे रोमांचपूर्ण वातावरणाचा शेवट, अंतिम १६ स्पर्धकांच्या निवडीने झालेला पाहायला मिळेल. या १६ स्पर्धकांची वाटचाल पुढे सुरू राहण्यासाठी त्यांच्या हाती, 'गुरुकिल्ली' असेल. देशभक्ती, मजामस्ती व आनंद अशा सगळ्याच गोष्टींचा संगम साधणारा 'युवा सिंगर, एक नंबर'चा हा आठवडा अजिबातच चुकवू नका. पाहायला विसरू नका, ३रा व चौथा भाग बुधवार आणि गुरुवार, रात्री ९ वाजता, फक्त आपल्या लाडक्या 'झी युवा'वर!!! 

No comments:

Post a Comment