अनेक दर्जेदार मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येणारी उत्कृष्ट मराठी वाहिनी, 'झी युवा' ही सगळ्यांची लाडकी वाहिनी आहे. उत्तमोत्तम मालिकांच्या बरोबरीनेच, अप्रतिम अशा कथाबाह्य कार्यक्रमांची मेजवानी सुद्धा 'झी युवा' वाहिनीवर अनुभवायला मिळते. 'युवा सिंगर एक नंबर' हा गाण्यांचा कार्यक्रम नुकताच संपन्न झालेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरातून प्रतिभावंत गायक या स्पर्धेत सहभागी झाले होते. या 'एक नंबर' स्पर्धेचा शेवट सुद्धा तितकाच धमाकेदार झाला.
एम. एच. फोकने या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. अनिमेश ठाकूर, पूजा-पल्लवी, दर्शन-दुर्वांकुर, जगदीश चव्हाण, ओंकार कानिटकर या अंतिम फेरीतील स्पर्धकांना मागे टाकत एम. एच. फोकने 'एक नंबर' स्थान पटकावत यश मिळवले. 'युवा सिंगर्स'मध्ये अव्वल क्रमांक पटकवणाऱ्या या गटाने मानचिन्हासह २ लाख ६० हजार रुपयांचा धनादेशाचे बक्षीस मिळवले. स्पर्धेतील सगळ्याच सादरीकरणांमधून प्रेक्षकांची आणि परीक्षकांची मने जिंकण्यात एम. एच. फोकला यश मिळाले होते. स्पर्धा जिंकण्याच्या शर्यतीत सुरुवातीपासूनच ते प्रमुख दावेदार होते. ओंकार कानिटकर आणि दर्शन-दुर्वांकुर यांनी अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले. दोन्ही उपविजेत्यांनाही मानचिन्ह व धनादेश अशी पारितोषिके देण्यात आली. परीक्षक वैभव मांगले आणि सावनी शेंडे यांच्यासह शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची सोहळ्यातील उपस्थिती प्रार्थनीय ठरली. अष्टपैलू अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिच्या उत्कृष्ट निवेदनामुळे सोहळ्याची रंगत अधिक वाढली.
No comments:
Post a Comment