मुंबई ३० जून, २०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये शिव आणि वीणाची मैत्री, त्यांचे एकमेकांवरचे रुसवे फुगवे, त्यांची भांडण,शिवने तिला मनविण्यासाठी केलेल्या युक्त्या, बनवलेले “हार्टस” हे सगळेच प्रेक्षकांमध्ये आणि घरच्या सदस्यांमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत...नुकताच हीना आणि शिवने खुदा जाने आणि पेहेला पेहेला प्यार है या गाण्यावर रोमँटिक डान्स केला... जो डान्स सुरु असताना रुपाली वीणाला म्हणाली बाहेर शिव हिनासोबत डान्स करतो आहे आणि ते बघण्यासाठी वीणा बाहेर आली... आणि त्यामुळे वीणाचा गैरसमज होऊ नये म्हणून त्याने डान्स करण्यास नकार दिला... पण हीनाचे म्हणणे पडले माझा अपमान करू नकोस मी परत डान्स करणार नाही तुझ्यासोबत, याच विषयावरून वैशालीने शिवला विचारले तू इतका का घाबरतोस ? लग्न केला आहेस का ? इतक तर बायकोला पण कोणी घाबरत नाही, विश्वास हवा नात्यात शिव... तर, हीना देखील शिववर खूपच चिडली... ती स्पेशल आहे तर तिच्यासोबत डान्स कर मला नको सांगूस डान्स करायला... तूच मला सांगितलस डान्स करायला म्हणून मी केला... नेहा आणि टीमने शिवला हिनाची माफी मागायला सांगितली...आणि शिवने हीनाची माफी मागितली सुध्दा...
तर, ग्रुपमध्ये बसले असताना माधव आणि शिवमध्ये देखील वाद झाला... माधव शिवसोबत महत्वाचं बोलत असतना शिवचे त्याच्या बोलण्याकडे लक्ष नसल्याने माधवला राग आला आणि तो तिथून निघून गेला... त्याचे असे म्हणणे होते शिवने त्याची बाहेर जाऊन माफी मागावी आणि यावरूनच शिवला राग अनावर झाला... घरामध्ये पहिल्यांदाच शिवला इतका राग आला... रागात येऊन त्याने पाण्याचा जार आणि कॉफी मग देखील फोडला... प्रत्येक गोष्टीवरून का माफी मागायची मी प्रेमाने सांभाळतो आहे ना? मी सगळ ऐकून देखील घेतल...सगळ मिटल देखील मग का माफी हवी आहे...हा मुद्दा शिवने मांडला...
शिव आणि वीणा दोघेही घरामध्ये वेगवेगळ्या गटामध्ये आहेत आणि त्यामुळे शिवला नेहेमीच अभिजीत केळकर आणि वैशाली कडून सल्ले मिळत असतात, तर वीणाला रुपाली आणि किशोरी कडून... अभिजीत केळकर आणि ग्रुपचे असे म्हणणे आहे कि,वीणा शिवचा फायदा करून घेत आहे... तर वीणाला असे सांगण्यात येत आहे कि,तू आपल्या ग्रुपच्या गोष्टी त्याला सांगू नकोस... हे सगळे असले तरी देखील त्यांच्यातील केमिस्ट्री दिवसेंदिवस खुलत चालली आहे. त्यामुळं खेळावर परिणाम होत असल्याचं या दोघांच्याही गटामधील सदस्यांच्या लक्षात आलंय. त्यामुळं दोघांनाही ते आपापल्या परीनं समजावण्याचा प्रयत्न करत होते. पण,एकमेकांसाठी हे दोघेही एकदम स्पेशल बनले असून हे नात कायम असचं राहील असे या दोघांचे म्हणणे आहे... आता या दोन ग्रुपमध्ये शिव आणि वीणा त्यांचं मैत्रीच नात कस टिकवून ठेवतील हे बघूया...













