दक्षिणेकडील सिनेमांमधील प्रसि द्ध अभिनेत्री दीप्ती सती हिने लकी या सिनेमातून मराठी सिनेसृ ष्टीत पदार्पण केले आहे. येत्या रविवारी १० नोव्हेंबरला हा चि त्रपट 'झी टॉकीज'वर पाहाण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल् या या अभिनेत्रीशी, 'वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर'च् या निमित्ताने मारलेल्या गप्पा;
१. चित्रपटातील भूमिकेचे तुझ्या शी काही साधर्म्य आहे का?
चित्रपटात मी 'जिया'ची भूमिका क रते आहे. जिया ही एक सालस, निरा गस आणि गुणी मुलगी आहे. तिचा सहृ दयी स्वभाव आणि कुठल्याही गोष् टीविषयी ठाम मत असण्याची वृत्ती हे गुण उत्तम आहेत. स्त्री-पु रुष समानतेविषयी तिचे मत सकारा त्मक आहे. शिवाय सोशल मीडिया हा तिच्या आयुष्यातील अविभाज्य घट क आहे. थोडक्यात सांगायचं झालं, तरं आजच्या काळातील कुठल्याही मुलीची प्रतिमा आपल्याला जिया मध्ये पाहायला मिळते. त्यामुळे जिया आणि माझ्यात साम्य आहे, असं मी नक्कीच म्हणेन.
२. मराठी सिनेसृष्टीतील एक उत् कृष्ट दिग्दर्शक संजय जाधव यां च्यासोबत, लकीच्या निमित्ताने तू पहिल्यांदाच काम केलेस. हा अनु भव कसा होता?
मराठीत पदार्पण करत असतानाच सं जय जाधवसारख्या दिग्दर्शकासोबत काम करायला मिळालं याचा मला खूप आनंद आहे. दिग्दर्शक आणि माणूस म्हणूनही तो अगदीच कूल आहे. त् याच्यासोबत काम करत असताना मनात कुठलीही धाकधूक नसते. मनात असे ल ते स्पष्टपणे बोलता येत असल् याने काम उतरित्या होतं. चित् रपटात त्याला कुठल्याही कलाकारा कडून काय अपेक्षित आहे, कुठलाही प्रसंग प्रेक्षकांपर्यंत कसा यो ग्यप्रकारे पोचवता येईल हे त्या ला नेमकं ठरू असतं. ते समजावण् याची त्याची हातोटी सुद्धा उत् तम आहे. त्याच्यासोबत नेहमी काम करायला मिळावं अशी अशा मी नक् कीच ठेवली आहे.
३. सहकलाकारांसोबत काम करण्याचा तुझा अनुभव नेमका कसा होता?
मी मगाशी म्हणाले त्याप्रमाणे, संजय जाधव सारखा दिगर्शक मिळण् यासाठी भाग्य लागतं. सेटवरील वा तावरण खेळीमेळीचं असल्याने सगळ् याच कलाकारांशी माझी उत्तम गट् टी जमली. कलाकारांशी मैत्री झा ल्यावर काम करायची मजा वेगळी अस ते. केवळ कलाकारच नाही, तर टी ममधील इतर सगळ्यांशी सुद्धा छान नातं निर्माण झालं होतं. चित् रपटाची संपूर्ण टीम, एखाद्या कु टुंबाप्रमाणे एकत्र काम करत हो ती. ज्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करायची असते, त्यांच्यासोबतच इ तरांशी सुद्धा समन्वय असणं गरजे चं ठरतं. हा अनुभव या चित्रपटा च्या निमित्ताने घेता आला.
४. चित्रीकरणादरम्यानची एखादी आ ठवण आम्हाला सांगशील का?
अभयला या चित्रपटात एक विवस्त्र प्रसंग चित्रित करायचा होता. म लादेखील बिकिनी सीन करावा लागणा र होता. त्यामुळे 'फिगर' नीट ठे वणं फार गरजेचं होतं. मी आणि अभ य पहिल्या दिवसापासूनच, याविषयी एकेमकांना प्रोत्साहन देत होतो . फावल्या वेळात चहा-नाश्ता के ला जात असताना, मला अनेकदा चमचमी त खाण्याची हुक्की येत असे. मना वर फार ताबा ठेवला असला, तरी का हीवेळा थोडंफार खाणं होत असे. ए कदा अभयने मला काहीतरी खाताना ब घितलं त्यावेळी तो पोट धरून हसत सुटला होता. माझ्या मराठी उच् चारावरून अनेकवेळा अभय माझी मस् करी करायचा. मी चांगल्याप्रकारे मराठी बोलत असले, तरीही हा आमच्या चेष्टेचा विषय ठरलेला असायचा. चित्रपटाचं बरंचसं चित्रीकरण गो व्यात झालेलं असल्याने, शूट सं पवून बीचवर फिरायला जाण्याचा सु द्धा आम्ही प्रयत्न करत असू. त् यामुळे गोव्यात सुद्धा खूप धमाल केली आहे.
५. हा सिनेमा एका वेगळ्या धाटणी चा आहे. प्रेक्षकांनी तो का पा हावा असं तुला वाटतं?
तरुणवर्ग या चित्रपटाशी खूप छान कनेक्ट होऊ शकतो. एक वेगळ्या प्र कारचा चित्रपट असूनदेखील आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांशी त् याचा संबंध सहज जोडला जाऊ शकतो. हा एक अतिशय मजेदार सिनेमा आहे . आजच्या काळातील तरुणाईला नक् की आपलासा वाटेल असा हा चित्रपट आहे. चित्रपट पाहताना त्या कथा नकाशी तरुणाई निश्चितपणे जोडली जाईल. म्हणूनच हा चित्रपट सर्वां नी नक्की पाहावा. रविवारी १० नो व्हेंबरला, झी टॉकीजवर दुपारी १ २ आणि संध्याकाळी ६ वाजता हा चि त्रपट पाहायला मिळणार आहे.
No comments:
Post a Comment