गूढ कथांनी वाचकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या मतकरींसारख्या समर्थ लेखकाच्या लेखणीतून ‘आरण्यक’ हे नाटक साकारलेलं आहे. हे नाटक संपूर्णपणे महाभारतातल्या कथेवर आधारित आहे. धृतराष्ट्र, कुंती, गांधारी, विदूर या व्यक्तिरेखांवर या नाटकाचं कथानक आधारलेलं आहे. महाभारतातलं युद्ध होऊन गेल्यानंतरचा काळ या नाटकात दाखवण्यात आला आहे.
‘आरण्यक’च्या रूपाने झी मराठी वाहिनीने एक अजरामर नाट्यकृती ४४ वर्षांनंतर पुन्हा रंगभूमीवर आणली. रवी पटवर्धन - धृतराष्ट्र, दिलीप प्रभावळकर - विदुर, प्रतिभा मतकरी - गांधारी आणि मिनल परांजपे - कुंती या भूमिकांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आले आणि प्रेक्षकांचा या नाट्यकृतीला भरगोस प्रतिसाद मिळाला. नाट्यगृहाबाहेर हाउसफुलची पाटी असणं यात काहीच शंकाच नव्हती. प्रेक्षकांचं अपार प्रेम मिळालेली ही यशस्वी नाट्यकृती आता झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे. येत्या रविवारी १७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षक या अजरामर नाट्यकृतीचा आस्वाद घेऊ शकतात. तेव्हा पाहायला विसरू नका 'आरण्यक' फक्त आपल्या झी मराठीवर वाहिनीवर.
No comments:
Post a Comment