वेगवेगळ्या धाटणीच्या दर्जेदार मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येणारी मराठी वाहिनी 'झी युवा', ही सगळ्यांचीच लाडकी वाहिनी आहे. या वाहिनीचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मालिकेतील मुख्य कलाकारांवर प्रेक्षक जीवापाड प्रेम करतात. त्याचबरोबरीने बालकलाकार सुद्धा प्रेक्षकांसाठी खूप लाडके असतात. या बालकलाकारांसाठी यंदाचा 'बालदिन' अविस्मरणीय ठरला. वाहिनीने त्यांच्यासाठी एक खास बेत आखला होता.
जय शास्त्री, गार्गी जोशी आणि 'युवा सिंगर एक नंबर'चा उपविजेता ओंकार कानिटकर या बालकलाकारांनी हा खास दिवस 'कीडझेनिया'मध्ये घालवला. खूप धमाल, मजामस्ती आणि बरोबरीने शिकायला मिळालेल्या अनेक नव्या गोष्टी त्यांच्यासाठी फार मोलाच्या ठरल्या. या बालकलाकारांच्या सोबतीने 'प्रेम पॉयजन पंगा' व 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' या मालिकेतील मुख्य कलाकार सुद्धा 'कीडझेनिया'ला उपस्थित होते. या कलाकारांना सुद्धा बालपणीची मजा पुन्हा अनुभवायला मिळाली. वॉल पेंटिंग, चित्रकला, फॅन्सी ड्रेस अशा अनेक गोष्टींचा आनंद मुलांनी लुटला. शिवाय, मालिकेतील मुख्य जोडीतील कलाकारांना 'हेअर स्पा' देण्याचा सुद्धा गमतीशीर अनुभव या बालकलाकारांनी घेतला. 'बालदिन' विशेष म्हणून करण्यात आलेले हे सेलिब्रेशन सगळ्याच कलाकारांसाठी अविस्मरणीय ठरले.
Here are the bytes from the kids and the artists. Would be highly obliged if you could carry the same forward.
Download link Children’s day Kidzania Byte
Download link of Children’s day Kids Painting byte
Download link Kidzania footage ( kids doing fun at kidzania )
No comments:
Post a Comment