Showing posts with label 'झी युवा'. Show all posts
Showing posts with label 'झी युवा'. Show all posts

Wednesday, 10 June 2020

'झी युवा' म्हणतंय, 'लाव रे तो विडिओ'... 'लाव रे तो विडिओ' दाखव तुझं टॅलेंट!!!


लॉकडाऊनमध्ये घरी बसून सगळेच कंटाळले आहेत. पण, हा कंटाळा दूर करण्यासाठी अनेकांनी पर्याय निवडलाय, तो छंद जोपासण्याचा! तुम्ही सुद्धा, घरबसल्या तुमचं टॅलेंट आजमावत असाल, तर 'झी युवा' वाहिनी तुमच्यासाठी, एक सुवर्णसंधी घेऊन आली आहे. 'झी युवा' वाहिनीवरील, 'लाव रे तो विडिओ' हा नवा कोरा टॅलेंट शो, तुमचे आगळे कौशल्य जगासमोर आणण्यासाठी तुम्हाला मदत करेल. तुमच्यातील खास टॅलेंटचा २ ते ३ मिनिटांचा विडिओ तुम्ही वाहिनीला पाठवायचा आहे. अर्थात, हा विडिओ आणि तुमचं टॅलेंट हा एक अतरंगी आयटम असायला हवा. तुमचं टॅलेंट जर मनोरंजन करण्यात यशस्वी होणार असेल, तर 'झी युवा'च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र म्हणेल, 'लाव रे तो विडिओ'!!!
हा कोराकरकरीत शो, मनोरंजनाच्या सर्व सीमा पार करेल. कॉमेडी, डान्स, मिमिक्री अशा अनेक टॅलेंटचा या कार्यक्रमात समावेश असेल. सर्वांचीच हसून हसून पुरेवाट होईल. कधी हास्याची लकेर तर कधी फुल्ल ऑन एंटरटेन्मेंटचा कल्ला पाहायला मिळेल. 'लाव रे तो विडिओ' म्हणत, 'झी युवा' हा मजेदार कार्यक्रम सगळ्यांसाठी घेऊन येत आहे. सोशल डिस्टसिंग पाळून, अख्ख्या महाराष्ट्राला महाराष्ट्राचे मनोरंजन करण्यासाठी 'झी युवा' वाहिनी सज्ज आहे. कार्यक्रमाचा सूत्रसंचालक, हे आणखी एक मोठे सरप्राइझ असणार आहे. तेव्हा, तुम्ही सुद्धा तुमचं टॅलेंट घेऊन सज्ज व्हा, आणि म्हणा 'लाव रे तो विडिओ'!!!!

Thursday, 19 March 2020

डान्सर अपेक्षा लोंढेची स्वतःशीच स्पर्धा!!!

'झी युवा' वाहिनीवरील 'युवा डान्सिंग क्वीन' ही स्पर्धा आता फारच चुरशीची झालेली आहे. या अपेक्षा लोंढे अटीतटीच्या स्पर्धेतदेखील, स्वतःशीच स्पर्धा करत आहे. इतर स्पर्धकांच्या आव्हानापेक्षा, स्वतःच्याच सादरीकरणात सुधारणा कशी करता येईल, याचा विचार ती अधिक प्रमाणात करते आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने तिच्याशी मारलेल्या गप्पा
१. तुझ्या आवडीचा आणि सर्वोत्तम नृत्यप्रकार कुठला? 
गेल्या आठ वर्षांपासून मी नृत्य करते आहे. खरंतर मला सगळ्याच प्रकारची नृत्ये आवडतात. पण, कंटेम्पररी डान्स फॉर्म मला सर्वाधिक आवडतो. या प्रकारातील नृत्यकला जोपासण्याचा प्रयत्न मी नेहमी करत असते.
२. तुझ्यासाठी मयूर आणि सोनाली यांच्यातील अधिक लाडकं कोण आहे?
दोन्ही परिक्षकांविषयी मला आदर आहे. दोघेही माझ्या आवडीचे आहेत. पण, सोनाली ताई मला थोडी अधिक आवडते. आमचं नृत्य ती मनापासून एन्जॉय करते. आमच्या डान्समधील बारकावे आम्हाला नीट समजावून सांगते. आमच्या नृत्यकलेतील खासियत तिच्या लक्षात येते, आणि ती त्याविषयी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करते. सोनाली ताईचा स्वभाव सुद्धा खूपच छान आहे. ती आम्हाला नेहमीच समजून घेते.
३. स्पर्धेतील कोणता स्पर्धक तुझ्यासमोर मोठे आव्हान उभे करू शकेल, असं तुला वाटतं?प्रत्येकच स्पर्धक आपली सर्वोत्तम कला सादर करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे सगळ्याच स्पर्धकांना एकमेकांचे तगडे आव्हान असणार आहे. अर्थात, माझी सगळ्यात पहिली स्पर्धा, ही स्वतःशी असते. प्रत्येकवेळी काहीतरी नवं आणि वेगळं करण्याचा माझा प्रयत्न असतो. माझे नृत्य, माझ्याच आधीच्या परफॉर्मन्सपेक्षा उत्तम असायला हवे यासाठी मी मेहनत घेते. त्यामुळे मी स्वतःच माझी सर्वात मोठी स्पर्धक आहे, असं मी म्हणेन. 
४. तुझ्या उत्तम परफॉर्मन्सबद्दल जेव्हा तुझं खूप कौतुक होतं, त्यावेळी तुझ्या मनातील भावना नेमक्या कशा असतात?
परीक्षक आणि प्रेक्षकांना माझं नृत्य आवडलं, त्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला, की खूप छान वाटतं. स्पर्धेतील इतर स्पर्धकांकडून जेव्हा कौतुकाची थाप मिळते, त्यावेळी मिळणारा आनंद आणि समाधान खूप मोठं असतं. माझ्या गुरूंनी माझ्यासाठी घेतलेली मेहनत आणि माझ्या कष्टांचे चीज झाले असल्याची भावना मनात असते. 
५. 'युवा डान्सिंग क्वीन'च्या मंचावरील एखादी आठवण, शूटिंगदरम्यानचा अनुभव आम्हाला सांग.'
युवा डान्सिंग क्वीन'च्या मंचावरील आम्ही सर्वजण एका कुटुंबाप्रमाणे राहतो. एकत्र जेवायला बसणे, एकमेकांसोबत थट्टामस्करी करणे, अशा गोष्टी नेहमीच सुरू असतात. ऑनस्क्रीन आम्ही एकमेकींच्या स्पर्धक असलो, तरीही आमच्यातील ऑफस्क्रीन मैत्री उत्तम आहे. एकमेकींची काळजी घेणे, मिळून-मिसळून राहणे, आणि एकमेकांना समजून घेणे, या गोष्टी अगदी सहजपणे घडत असतात. 
६. तुझ्या अनेक परफॉर्मन्समध्ये तू वेगवेगळ्या प्रकारचे स्टंट केले आहेस. यासाठी कशाप्रकारे तयारी करावी लागते?
मानसिक तयारी करणे, हे आव्हान सर्वप्रथम माझ्यासमोर असते. ओंकार सरांचा मान राखणे, त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणे, एवढ्याच गोष्टी त्यावेळी माझ्या मनात असतात. मी सतत सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करते. एकदा का मनाची तयारी झाली, की इतर गोष्टी सोप्या जातात.

Thursday, 27 February 2020

'युवा डान्सिंग क्वीन'च्या मंचावर पाहायला मिळतेय, कोरिओग्राफर ओंकारच्या फॅशनची खास झलक!!!

'झी युवा' वाहिनी आणि दर्जेदार कार्यक्रम, हे समीकरण आता प्रेक्षकांना ठाऊक झालेलं आहे. अनेक उत्तम मालिका आणि कथाबाह्य कार्यक्रम वाहिनीवर प्रक्षेपित करण्यात येतात. आपल्या सर्वांसाठी  'संगीत सम्राट', 'युवा सिंगर एक नंबर'सारखे उत्तमोत्तम कार्यक्रम घेऊन येणाऱ्या 'झी युवा' वाहिनीवर 'युवा डान्सिंग क्वीन'ची सध्या हवा आहे. आपल्या धमाकेदार आणि जबरदस्त नृत्याविष्कारांच्या जोरावर या स्पर्धेतील ललना सर्वांची मने जिंकत आहेत. त्यांच्या डान्सचा जलवा, त्यांची स्टाईल स्टेटमेंट्स यांची छाप प्रेक्षकांवर पडलेली आहे. त्याचबरोबरीने, 'युवा डान्सिंग क्वीन'मधील आणखी एका व्यक्तीची फॅशन लोकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. कोरिओग्राफर ओंकार शिंदे याने त्याच्या अप्रतिम फॅशनचा नमुना, या स्पर्धेच्या निमित्ताने पेश केलेला आहे. 
        याआधी ओंकारने अनेक हिंदी डान्स रिऍलिटी शोजमध्ये कोरिओग्राफर म्हणून उत्तम काम केलेले आहे. हिंदी मनोरंजन विश्वातील हा प्रसिद्ध कोरिओग्राफर सध्या 'युवा डान्सिंग क्वीन'च्या स्पर्धकांना नृत्याचे धडे देत आहे. त्याच्या या शिष्यगणाने सादर केलेला नृत्याविष्कार पाहण्यासाठी, प्रेक्षक जितके उत्सुक आहेत, तितकीच उत्सुकता त्याने परिधान केलेल्या कपड्यांची सुद्धा आहे. त्याच्या फॅशनचा चाहतावर्ग सुद्धा खूप मोठा आहे. गुलाबी ब्लेझर, त्याला साजेशी गुलाबी पॅन्ट आणि पांढरे स्नीकर्स, अशा आकर्षक अवतारात  'युवा डान्सिंग क्वीन'च्या एका भागात ओंकार अवतरला होता. त्याचे हे झकास फॅशन स्टेटमेंट, त्याच्या इन्स्टाग्रामवर सुद्धा पाहायला मिळते आहे. कधी फंकी ब्राउन जॅकेट घालून, तर कधी डेनिम आणि स्वेटशर्ट घालून जेव्हा ओंकार 'युवा डान्सिंग क्वीन'च्या मंचावर अवतरतो, त्यावेळी कोरिओग्राफर आणि फॅशन आयकॉन अशा दुहेरी भूमिकेत असलेला भासतो. तरुणाईने त्याची फॅशन उचलून धरलेली दिसून येत आहे.
        'युवा डान्सिंग क्वीन' ही डान्सची स्पर्धा असली, तरी अशा अनेक रंगतदार गोष्टी मंचावर घडत असतात. तरुणींच्या दिलखेचक अदाकारीने परिपूर्ण असे नृत्याविष्कार आणि सोबतीने ओंकारचे फॅशन स्टेटमेंट अनुभवण्यासाठी, पाहायला विसरू नका, 'युवा डान्सिंग क्वीन', बुधवार ते शुक्रवार रात्री ९:३० वाजता , फक्त आपल्या लाडक्या 'झी युवा' वाहिनीवर!!! 

Friday, 22 November 2019

त्यामुळे ही भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक - अभिजीत चव्हाण

 'झी युवा' वाहिनीवरील 'साजणा' या मालिकेतील रावसाहेबांची भूमिका प्रेक्षकांच्या आवडीची ठरू लागली आहे. ही भूमिका साकारणारे दमदार अभिनेते अभिजित चव्हाण यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद;
१. 'साजणा' हा कार्यक्रम स्वीकारण्याचे नेमके कारण काय?
झी सोबत खूप चांगले संबंध आणि ऋणानुबंध आहेत. त्यामुळे 'झी युवा' सोबत काम करण्याची संधी नाकारण्याचा प्रश्नच नव्हता. शिवाय निर्माते शशांक सोळंकी आणि सेव्हन सेन्स मीडियासोबत सुद्धा अनेकवेळा काम केलेलं आहे. त्यामुळे मी हा कार्यक्रम स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
२.  या कार्यक्रमातील तुमच्या भूमिकेविषयी काय सांगाल?
आमदार रावसाहेब जाधव यांची भूमिका मी मालिकेत करत आहे. स्वतःचा शब्द हाच शेवटचा शब्द असं म्हणणारे आणि त्याप्रमाणे वागणारे असे हे व्यक्तिमत्व आहे. कावेबाज स्वभावाचा हा माणूस घरात सुद्धा सर्रासपणे राजकारण करतो. आपल्या एखाद्या इच्छेसाठी रावसाहेब साऱ्या घराला वेठीस धरू शकतात. उद्दाम आणि उर्मट असं हे पात्र आहे. रावसाहेबांचा स्वभाव माझ्या मूळ स्वभावाच्या अगदीच विरुद्ध आहे. त्यामुळे ही भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक होती.
३. सहकलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे?
सगळ्याच सहकलाकारांसोबत मी पहिल्यांदाच काम करत आहे. पण सगळ्यांसोबत काम करताना खूपच मजा येते. सारे सहकलाकार, ही केवळ एक टीम नसून ते एक कुटुंब झालेलं आहे. अगदी जेवायला सुद्धा आम्ही सगळे सोबतच बसतो. ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन सुद्धा खूप छान अनुभव येत आहे.
४. या भूमिकेबद्दल प्रेक्षकांकडून व चाहत्यांकडून कसा प्रतिसाद मिळत आहे?
ही भूमिका नकारात्मक असल्यामुळे एका निराळ्या प्रकारातील प्रतिसाद अनुभवायला मिळतो आहे. भेटलेले अनेक प्रेक्षक, रावसाहेब रमा आणि प्रतापचा छळ करत असल्याने रागावलेले दिसतात. ही मला माझ्या कामाची पोचपावती वाटते. शिवाय मालिका लोक आवडीने आणि समरस होऊन बघत असल्याचं यातून कळतं.

Thursday, 14 November 2019

बालकलाकारांना 'झी युवा'ने दिली स्पेशल भेट...!!!!

वेगवेगळ्या धाटणीच्या दर्जेदार मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येणारी मराठी वाहिनी 'झी युवा', ही सगळ्यांचीच लाडकी वाहिनी आहेया वाहिनीचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहेमालिकेतील मुख्य कलाकारांवर प्रेक्षक जीवापाड प्रेम करतातत्याचबरोबरीने बालकलाकार सुद्धा प्रेक्षकांसाठी खूप लाडके असतातया बालकलाकारांसाठी यंदाचा 'बालदिनअविस्मरणीय ठरलावाहिनीने त्यांच्यासाठी एक खास बेत आखला होता.
जय शास्त्रीगार्गी जोशी आणि 'युवा सिंगर एक नंबर'चा उपविजेता ओंकार कानिटकर या बालकलाकारांनी हा खास दिवस 'कीडझेनिया'मध्ये घालवलाखूप धमालमजामस्ती आणि बरोबरीने शिकायला मिळालेल्या अनेक नव्या गोष्टी त्यांच्यासाठी फार मोलाच्या ठरल्याया बालकलाकारांच्या सोबतीने 'प्रेम पॉयजन पंगा 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्णया मालिकेतील मुख्य कलाकार सुद्धा 'कीडझेनिया'ला उपस्थित होतेया कलाकारांना सुद्धा बालपणीची मजा पुन्हा अनुभवायला मिळालीवॉल पेंटिंगचित्रकलाफॅन्सी ड्रेस अशा अनेक गोष्टींचा आनंद मुलांनी लुटलाशिवायमालिकेतील मुख्य जोडीतील कलाकारांना 'हेअर स्पादेण्याचा सुद्धा गमतीशीर अनुभव या बालकलाकारांनी घेतला. 'बालदिनविशेष म्हणून करण्यात आलेले हे सेलिब्रेशन सगळ्याच कलाकारांसाठी अविस्मरणीय ठरले.
Here are the bytes from the kids and the artists. Would be highly obliged if you could carry the same forward.
Download link Children’s day Kidzania Byte

Download link of Children’s day Kids Painting byte

Download link Kidzania footage ( kids doing fun at kidzania )

Tuesday, 22 October 2019

पॉयजन'मुळे होणार नाही ना, जुईच्या प्रेमाचा पंगा!!!!

'झी युवा' वाहिनीवरील  'प्रेम पॉयजन पंगा' या मिलकेतून पहिल्यांदाच मराठी टेलिव्हिजनवर इच्छाधारी नागीण दिसणार आहे. ही निराळी भूमिका साकारणारी अभिनेत्री शरयू सोनावणे तिच्या या भूमिकेविषयी आणि मालिकेबद्दल काय सांगतेय, ते बघूया;
१. 'प्रेम, पॉयजन, पंगा' या मालिकेसाठी तुझी निवड कशी झाली?
मला ऑडिशनसाठी बोलावलं गेलं आणि मी तिथे गेले. साधारणपणे ४-५ ओळींचं स्क्रिप्ट असेल अशी माझी अपेक्षा होती. पण जवळपास २० ओळींचं स्क्रिप्ट बघून आधी मला भीती वाटली होती. एवढं पाठांतर करणं मला कठीण वाटत होतं. पण, वाचायला सुरुवात केल्यावर त्यातलं वेगळेपण मला जाणवलं. ही व्यक्तिरेखा फार वेगळी असल्याचं लक्षात आल्यामुळे मी योग्यप्रकारे मेहनत घेतली. या मेहनतीचं फळ मला मिळालं आणि ही वेगळी भूमिका करण्याची संधी मला मिळाली. अर्थात, मॉक शूट झाल्यावर सुद्धा अंतिम निर्णय कळेपर्यंत मनात धाकधूक होतीच. अंतिम निर्णय केल्यानंतर मात्र शूट कधी सुरु होईल याची उत्सुकता लागून राहिली होती. 
२. तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल थोडक्यात सांग. 
जुई भोळे असं माझ्या भूमिकेचं नाव आहे. एकुलती एक असल्याने घरात सगळ्यांचीच फार लाडकी आहे. मजामस्ती करणं, आपल्या आवडीनिवडी जपणं याची तिला आवड आहे. सेल्फीक्वीन, टिकटॉकची आवड असलेली अशी ही मुलगी सोशल मीडियावर नितांत प्रेम करते. सोशल मीडियावर ती खूप प्रसिद्ध सुद्धा आहे. मित्रमंडळींच्यात असतानाही आपली वेगळी छाप पडण्याची कला तिच्याकडे आहे. लहान मुलांची आवड असल्याने त्यांच्याशी खेळणं, त्यांना शिकवणं, या गोष्टी ती करत असते. थोडक्यात सांगायचं झालं, तर आयुष्य मजेत जगणारी बिनधास्त अशी तरुण म्हणजे 'प्रेम पॉयजन पंगा'मधील जुई!!!
३. इच्छाधारी नागीण मराठी मालिकेत पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. ही व्यक्तिरेखा तू साकारते आहेस. त्याविषयी काय सांगशील?
'इच्छाधारी' नागीण या शब्दातच एक गम्मत आहे. जुई आपलं छान आयुष्य जगात असताना अचानक ती नागीण होते, त्यामुळे तिला दुहेरी जीवन जगावं लागणार आहे. आपल्या इच्छा पूर्ण करत असताना, इच्छाधारी नागीण असल्याचं भान जुईला ठेवावं लागतं. अर्थात, ती जरी नागीण असली, तरी कुणाचाही बदल घेण्यासाठी ती आलेली नाही. सगळयांना समजून घेणं, सगळ्यांच्यात मिळून मिसळून राहणं या गोष्टी तिला हव्या आहेत. मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच नागीण अवतरणार आहे, हे जितकं खरं आहे, तितकंच ही नागीण वेगळी आहे यातही तथ्य आहे. ही निराळी भूमिका साकारताना मला सुद्धा खूप मजा येतेय. ही भूमिका सगळ्यांना आवडेल याची खात्री आहे
४. ही भूमिका साकारण्यासाठी काही खास मेहनत घ्यावी लागली का?
जुई ही एक बिनधास्त मुलगी आहे. तिला सेल्फीक्वीन म्हणावं, इतकी तिला सेल्फीजची आवड आहे. पण, अचानक ती नागीण असल्याचं तिला लक्षात येतं. नागीण झाल्यानंतरची जुई साकारत असताना, 'स'चा उच्चार लांबवण्याची गरज पडत आहे. यासाठी मेहनत घ्यावी लागते. इच्छाधारी नागिणीला, चंद्रप्रकाश, आग वगैरे गोष्टींपासून धोका असतो. त्यामुळे, हे पात्र साकारत असताना त्यानुसार अभिनय करण्याची गरज पडते. या गोष्टी आव्हानात्मक आहेत. अर्थातच, हे आव्हान पेलायची इच्छा सुद्धा 'इच्छाधारी' नागीण साकारन्यासाठी माझ्याकडे आहे. 
५. मालिकेचे प्रोमोज बघितल्यानंतर, चाहत्यांच्या प्रतिक्रिया नेमक्या कशा होत्या?  
प्रोमो पहिल्यांनंतर अनेकांनी मला फोन केले. प्रत्येकाने ज्याचा-त्याचा अंदाज बांधला होता. काही जणांना मी रोबोट वाटले, तर काहींनी मी भूत आहे असं सांगितलं. अनेकांना असंच वाटलं असताना, काहींनी मात्र नागीण असल्याचा योग्य अंदाज बांधला होता. हे पात्र रोबोट आहे असं समजलेल्या अनेकांनी मला ते साकारण्यासाठी मी काय करावं याबद्दल सल्ले दिले होते. पण, एकूणच या सगळ्या फोनकॉल्समधून मालिकेविषयी प्रेक्षकांना खूप उत्सुकता असल्याचं दिसून आलं आहे.