Wednesday, 6 November 2019

लग्नानंतर फुलू लागलं आहे रमा – माधवचे नाते ! स्वामिनी सोम ते शनि रात्री ८.३० वा. कलर्स मराठीवर.

मुंबई ६ नोव्हेंबर, २०१९ : स्वामिनी मालिकेमध्ये मोठ्या थाटामाटात रमा – माधवचा विवाहसोहळा पार पडला. गोपिकाबाईंनी रमा माधवच्या लग्नामध्ये मोडता आणण्यासाठी अनेक कारस्थनं युक्त्या रचल्या पण या सगळ्या अडचणींना पार करत रमाबाईंचे माधवरावांशी लग्न झाले आणि त्या शनिवार वाड्यात आल्या... पार्वतीबाईंशी रमाचे विशेष नाते जुळले आणि त्या त्यांना आई मानू लागल्या, अनू आत्या, काशीबाईची मने देखील निरागस रमेने जिंकले. या सगळ्यामध्ये गोपिकाबाईंचा धाक काही कमी झाला नाही. गोपिकाबाईंनी घेतलेल्या एका निर्णयाचा मात्र रमाबाईंना खूप त्रास झाला… गोपिकाबाईंनी रमाबाईंच्या आई – वडिलांना पुन्हा त्यांच्या गावी निघून जाण्याचा आदेश दिला जेणेकरून त्या रमेला शिस्त, शनिवारवाड्यात कसे वागायचे हे शिकवू शकतील.... रमाच्या नाजुक मनावर त्याचा परिणाम झाला, त्यांनी त्या गोष्टीचा धस्का घेतला. त्यांनी काही खाण्यास देखील नकार दिला... शनिवार वाड्यात सुरू असलेले राजकारण रमाबाईंच्या निरागस मनाला काय कळणार... या सगळ्या गोष्टी माधवराव, सदाशिवराव आणि पार्वतीबाईंना कळत होत्या... आणि न राहून सदाशिव रावांनी गोपिकाबाईंच्या विरोधात जाऊन रमाबाईंच्या आई – वडीलांना शनिवार वाड्यात पुन्हा घेऊन येण्याचा निरोप पाठवला. हे सगळे घडत असताना रमाबाईंना माधवरावांचा आधार मिळाला... रमाबाईंनी अन्न ग्रहण करावे म्हणून त्यांनी देखील अन्नत्याग केला...
माधवरावांना रमाबाईंची ही परिस्थिति बघवत नव्हती... रमाला या सगळ्या गोष्टीचा विसर पडावा म्हणून माधवराव आता रमेला देवदशर्नासाठी शनिवारवाड्याच्या बाहेर घेऊन जाणार आहेत. तिथे रमा लगोरी खेळताना आणि परकर पोलका घालून आनंदाने बागडताना दिसणार आहे... हे बघून माधवराव आनंदी आहेत. लग्नानंतर आता रमा – माधवचे नाते हळूहळू फुलू लागले आहे... बघूया पुढे काय होते नक्की बघा स्वामिनी सोम ते शनि रात्री ८.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर. 

No comments:

Post a Comment