‘लग्न’ ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट. मात्र अलीकडे नको त्या अव्यवहार्य अपेक्षांचे मापदंड लावत आपापसातील नाती व्यापारात गोवली जाऊ लागली आहेत. जोडीदारांबद्दलच्या अवास्तव अपेक्षा यांतून आजची तरुण पिढी त्रस्त आहे. ही स्थिती शहरी आणि ग्रामीण भागातील अनेक घरांतून दिसत असली तरी या वाढत्या सामाजिक प्रश्नाकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. याच प्रश्नाचा वेध मार्मिक पद्धतीने घेणाऱ्या वाय डी फिल्मस्’ निर्मित व सुरेश साहेबराव ठाणगे लिखित-दिग्दर्शित ‘बायको देता का बायको’ हा चित्रपट २१ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. धनंजय रामदास यमपुरे यांनी या चित्रपटची निर्मिती केली आहे.
मुळात लग्न ठरणं आणि ते होणं ही प्रोसेस सध्या इतकी कठीण झाली आहे. हल्ली लग्नाच्या बाजारात तुमची किंमत कशावरून होईल हे सांगता येत नाही हाच धागा पकडून ‘बायको देता का बायको’ चित्रपटाची कथा लिहिण्यात आली आहे. जोडीदाराबद्दलच्या अवास्तव आणि अनाकलनीय अपेक्षांची यादी न सरकवता आपुलकीच्या सोबतीने एकमेकांना सांभाळण्याचा आनंद घेता येऊ शकतो हे सांगणारा हा चित्रपट प्रत्येकाला विचार करायला लावणारा सोबत मनोरंजन करणारा आहे.
चित्रपटाच्या कथेला अनुसरून वेगवेगळ्या पठडीतली गाणी चित्रपटात आहेत ए.आर माने, धनश्री गणात्रा, अरुण पवार यांनी लिहिलेल्या गीतांना गायक सुरेश वाडकर, हंमसिका अय्यर, आर्या आंबेकर, रोहित राऊत यांचा स्वरसाज लाभला आहे. धनश्री गणात्रा, ए आर माने यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. पार्श्वसंगीत अवि लोहार यांनी दिले आहे.
‘बायको देता का बायको’ चित्रपटात सुरेश ठाणगे, सुनील गोडबोले श्वेता कुलकर्णी, आरती तांबे, अभिलाषा पाटील, प्रतीक पडवळ, सिद्धेश्वर झाडबुके, किशोर ढमाले, अमोल पठाडे, प्रीतम साळुंखे, हनुमंत गणगे, प्रमिला जगताप, वैष्णवी अनपट, वैशाली जाधव, राणी ठोसर, प्रशांत जाधव, महादेव सवई, अश्विनी वाव्हळ, संगीता कोठारी या कलाकारांच्या भूमिका आहेत. सहनिर्माते संभाजी पडवळ, त्रिंबक सुरवसे, जनाबाई देवकर, अमोल नवले, विलास शिंदे, रोहिणी कसबे, गणेश तोंडे, नितीन गावडे, महादेव घरत, गणेश काळे, अनिल फडके आहेत.
No comments:
Post a Comment