Monday, 24 February 2020

गजेंद्र अहिरे... आर्तता प्रतिध्वनीत करणारा दिग्दर्शक


गजेंद्र अहिरेंच्या ५०व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ५०वा सिनेमा ‘बिडी बाकडाचे पोस्टर प्रदर्शित
OR
एका स्त्री भोवती,  तिच्या बाईपणाभोवतीतिच्या संघर्षांभोवती फिरतो गजेंद्र अहिरेंचा सिनेमा.
OR
 गजेंद्र अहिरे त्यांच्या सिनेमातून बाईतलं बाईपण अगदी प्रभावीपणे मांडतात
OR
 ‘बिडी बाकडामुळे गजेंद्र अहिरेंची हाफ सेंच्युरी पूर्ण
एखादी कलाकृती दीर्घकाळ लक्षात राहतेपुन्हा पुन्हा आठवतेमनात रूंजी घालत राहते...असं कधी होतं तर जेव्हा ती कलाकृती आपल्याशी वैयक्तिक पातळीवर जोडली जातेत्यातला भावनाविष्कार आपल्याला आपला स्वतःचा वाटू लागतोत्यातला आनंदत्यातली स्वप्नं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यातली वेदना आपल्याला आपली वाटतेएका संवेदनशील मनाला जाणवलेली संवेदना जेव्हा दुस-या संवेदनशील मनापर्यंत पोहचते तेव्हा ती दीर्घकाळ टिकून राहतेअशा अनेक संवेदना आपल्यापर्यंत पोहचवल्या आहेत लेखकगीतकार आणि कवीमनाचा दिग्दर्शक असलेल्या गजेंद्र अहिरे यांनी
गजेंद्र अहिरेंच्या प्रत्येक सिनेमात एक नवी गोष्ट असतेआणि ती प्रत्येक गोष्ट फिरत असते एका स्त्री भोवती,  तिच्या बाईपणाभोवतीतिच्या संघर्षांभोवती. ‘गुलमोहोर’ मधली विद्या असो किंवा ‘सरीवर सरी’ मधली मनी, ‘मिसेस राऊत’ असो किंवा ‘बयो’. प्रत्येक जण एका तीव्र संघर्षातून जात सामाजिक चौकटी ओलांडत जगतेबाईतलं बाईपण इतक्या प्रभावीपणे मांडण्यासाठी आवश्यक असलेलं अत्यंत संवेदनशील मन फार कमी पुरुषांकडे असतंआणि ते गजेंद्र अहिरेंकडे आहे
गेल्या रविवारी १६ फेब्रुवारीला स्वतः गजेंद्र अहिरे आणि त्यांची फिल्म दोघांनी ५० वर्षांच्या मैलाचा दगड गाठला आहेअवघ्या सतरा वर्षांमधे ५० फिल्म्स करणं आणि त्यातली प्रत्येक फिल्म ही अत्यंत संवेदनशील गोष्ट मांडणारी असणं ही आज आपल्या सिनेजगतात अप्रूप वाटण्यासारखी आणि म्हणूनच नोंदवून ठेवण्यासारखी गोष्ट आहे५० फिल्म्स मधल्या ५० वेगवेगळ्या गोष्टींचा विचार केला तर लक्षात येतं की गजेंद्र अहिरेंनी केवळ फिल्म्स नाही बनवल्या तर त्यातून एक नवीन स्त्रीसाहित्य निर्माण केलं आहे
या समोर येणा-या ५० गोष्टींमागे समोर  येणा-या २५० गोष्टीही आहेतकेवळ कथा आणि दिग्दर्शनाशिवाय गीतकार म्हणूननाटककार म्हणून आणि श्रीमान श्रीमती सारख्या मालिकांसाठी केलेलं लिखाण हे गजेंद्र अहिरेंच्या आजवरच्या कारकिर्दीतील अजून एक वेगळं पण अत्यंत महत्वाचं अंग आहेजगभरच्या अनेक फिल्म फेस्टीवल्समध्ये असंख्य पारितोषिके गजेंद्र अहिरेंच्या फिल्म्सनी मिळवली आहेतअत्यंत कमी वेळात दर्जेदार आणि प्रभावी फिल्म बनवण्याची त्यांची जी शैली आहे तिची विशेष दखल स्वीडन मधील एका प्रतिष्ठीत विद्यापिठाने घेतलीमराठी चित्रपट क्षेत्रात ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे
जगण्यासाठी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून जात असतानाही ‘केवळ मनोरंजनासाठी’ सिनेमा बनवण्याचा पर्याय  निवडता आसपास भेटणारी माणसंस्त्रियात्यांचे संघर्ष मांडत अभिव्यक्त होण्याचा पर्याय गजेंद्र अहिरेंनी निवडलासिनेमा क्षेत्रात अशा पद्धतीने टिकून राहण्यासाठी आवश्यक असतं सातत्यसातत्याने आपल्याला जे सांगायचं आहे तेच सांगत राहणंगजेंद्र अहिरे सांगतात की ‘हे सातत्य राखण्यासाठीटिकून राहण्यासाठी खूप बळ आवश्यक असतंआणि कायम असमाधानी भावना जाणवत राहण्यातून हे बळ मला मिळत राहतंएक फिल्म पूर्ण झाली की पुढची फिल्म बनवण्याचीपुन्हा एक नवीन प्रयोग करून पाहण्याची अस्वस्थताच माझ्या निर्मितीमागची प्रेरणा असते
गजेंद्र अहिरेंची प्रत्येक फिल्म ही त्यांच्या खास शैलीतून उलगडत जातेनव्याने त्यांचा सिनेमा पाहणा-या प्रत्येक प्रेक्षकाला हा दिग्दर्शक समजून घेण्यासाठी त्याचे अनेक सिनेमे पहावेसे वाटतीलपुन्हा पुन्हा पहावेसे वाटतीलतेव्हा त्यातली वेदनात्या वेदनेतलं सौंदर्य समजू शकेलएखादा चित्रकार जेव्हा एखादी अमूर्त रचना करतो किंवा एखादा कवी एक कविता रचतो तेव्हा तिचा आस्वाद घेणा-या प्रत्येकापर्यंत ती तशीच पोहचेल किंवा प्रत्येकाला एकसारखीच जाणवेल असं होत नाहीप्रत्येकाची जाणीव ही वेगळी असतेगजेंद्र अहिरेंची फिल्म पाहताना हिच भावना असतेएक अमूर्त चित्र किंवा एक वाहणारी कविताजी समजली असं वाटतानाच अनोळखीही वाटू लागते आणि पुन्हा आपलीही वाटू लागतेती कविता अखंड वाहत राहतेवेगवेगळ्या काळांच्यावेगवेगळ्या जाणिवांच्या चौकटी ओलांडत ती रूप बदलते पण गाभा तोच राहतो
गजेंद्र अहिरेंच्या ५० फिल्म्समधल्या ५० गोष्टी जरी वेगवेगळ्या माणसांभोवती फिरत असल्या तरी त्यांचा प्रवास समांतरच असतोआणि तो वेदनेच्या हातात हात गुंफून होत असतोती पात्रं वर्षानुवर्षे आपल्या सोबत राहतातत्यांच्या संघर्षानी वर्षानुवर्ष आपलं काळीज पिळवटत राहतंकशा ना कशाच्या मागे सतत धावणा-या आपल्या सारख्या सामान्य माणसांच्या जगात जिथे आज संवेदना हरवत चालल्या आहेततिथे गजेंद्र अहिरेंचा सिनेमा त्या संवेदना पुन्हा रूजवण्याचं काम करतो आहेआपल्या चित्रपटसृष्टीत या गुणीप्रतिभावान दिग्दर्शकाचं असणं ही एक बहूमुल्य गोष्ट आहे.
त्यांच्या ‘ सायलेन्स’ या सिनेमातल्या रघुवीर यादवांनी साकारलेल्या भूमिकेतला बाप आपल्या लेकिने सोसलेल्या वेदनेनी व्याकूळ होऊन टाहो फोडतोत्याची ती आर्तता प्रतिध्वनीत होत राहतेगजेंद्र अहिरेंच्या प्रत्येक सिनेमानंतर बरोब्बर हिच जाणीव होतेती वेदना आपल्या आत प्रतिध्वनीत होत राहते... आयुष्यभर.
५०व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी त्यांचा ५०वा सिनेमा ‘बिडी बाकडा’ चे पोस्टर प्रदर्शित केले आहेआता या सिनेमाविषयी तपशीलात जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना नक्कीच असणार

No comments:

Post a Comment