आज अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मा.मेघराज राजेभोसले यांनी शिष्टमंडळासह सांस्कृतिक मंत्री मा.नामदार अमित देशमुख यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले व त्यांना निवेदन दिले. या शिष्टमंडळात प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार, सह कार्यवाह चैत्राली डोंगरे, संचालिका वर्षा उसगावकर, संचालक सतीश रणदिवे, संचालक पितांबर काळे, संचालक रत्नकांत जगताप, अभिनेत्री किशोरी शहाणे विज, अभिनेत्री दिपाली सय्यद, अभिनेत्री अर्चना नेवरेकर, भरारी पथक सदस्य दिलीप दळवी, आयटी सेल प्रमुख महेश मोटकर यांचा समावेश होता.
यावेळी महामंडळाच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये...
१-गावोगावी चित्रपट दाखवण्यासाठी सरकारी जागांवर मिनी थियेटर्सची महामंडळाच्या माध्यमातून उभारणी करणे.
२-मराठी चित्रपटांना अनुदान पूर्ववत सुरू ठेवावे. चित्रपट परिक्षण गुणांकन पद्धतीने न करता श्रेणी पद्धतीने करावे. अ, ब श्रेणी सोबतच क श्रेणी चालू करुन त्याअंतर्गत निर्मात्यांना रु.दहा लाख अनुदान देण्यात यावे. अनुदान आँनलाईन निर्मात्यांच्या बँक खात्यात जमा करावे.
३-मराठी चित्रपटांच्या तिकिटावर आकारण्यात येणारा जीएसटी. माफ करावा. आतापर्यंत आकारलेला जीएसटी निर्मात्यांना परत करण्यात यावा.
४- ज्येष्ठ कलावंतांची रखडलेली पेन्शन एकरकमी त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी.
५- सांस्कृतिक विभागाच्या योजनांचा लाभ पडद्यामागच्या कलाकारांनाही मिळावा.
६-मराठी चित्रपटांना जास्तीत जास्त चित्रपटगृहे मिळावीत.
७- प्रत्येक जिल्ह्यात नाट्यगृह, सिनेमा थिएटर व वाचनालय असे एकत्र संकुल शासनाने उभी करावीत.
८- महामंडळातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या चित्रपट संमेलनात राज्य सरकारने सहभागी होऊन महामंडळाला आर्थिक मदत करावी.
या सर्व बाबींचा सकारात्मकरित्या सांस्कृतिक विभागामार्फत अभ्यास करुन सकारात्मक निर्णय घेण्याचे सांस्कृतिक मंत्री श्री. अमित देशमुख यांनी मान्य केले.
No comments:
Post a Comment