Tuesday 11 February 2020

हौशी गायक गायिकांसाठी पुण्यात ट्रॅक गायन स्पर्धा


कधीतरी आपण हातात माईक घेऊन आपल्याला आवडणारे गाणे म्हणावे, आपण गात असताना साथीला त्या गाण्याचे संगीत वाजत असावे आणि समोर आपल्याला प्रोत्साहित करणारा, कौतुक करणारा प्रेक्षक असावा असे वाटते की नाही? भले देवाने गाता गळा दिला नसेल पण प्रत्येकाला गावेसे वाटतेच. हीच प्रत्येकाच्या मनातली सुप्त ईच्छा ओळखून मुंबईतील विलेपार्ले पूर्व येथील 'सुर-ताल कराओके क्लब' ने ही अभिनव स्पर्धा आयोजित केली आहे. नवोदित, हौशी गायक गायिकांसाठी 'सुर-ताल कराओके क्लब' ही संस्था वर्षभर विविध उपक्रम आयोजित करीत असते.
नोकरी, व्यवसायात अडकल्याने आपली आवड जोपासता येऊ न शकलेल्या पण थोडे फार अंगभूत गायनकौशल्य असलेल्या नवोदित गायक - गायिकांसाठी 'सुर-ताल कराओके क्लब' एक हक्काचं व्यासपीठ आहे.
या स्पर्धेतून चांगले गायक गायिका तयार व्हावेत हेच व्यापक उद्दिष्ट ठेऊन हौशी गायक - गायिकांसाठी त्यांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत नवोदित हौशी गायक - गायिकांना सहभागी होता येईल. स्पर्धकांनी हिंदी चित्रपटातील गाणी म्हणणे अभिप्रेत आहे. ही स्पर्धा ३० ते ७५ या वयोगटातील सर्वांसाठी खुली आहे. सुर-ताल कराओके क्लब प्रस्तुत कराओके ट्रॅक गायन स्पर्धा डिसेंबर महिन्यात मुंबईत आयोजित करण्यात आली होती. तिला भरभरून प्रतिसाद मिळाला होता. इतका की आम्हाला जवळपास २०० जणांना प्रवेश नाकारावा लागला.
या यशस्वी प्रयोगानंतर पुण्यात अशी स्पर्धा कधी आयोजित करणार का? अशी विचारणा झाली. त्यानंतर पुण्यात ही स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातही प्राथमिक, उपांत्य आणि अंतिम अश्या तीन फेऱ्या होणार आहेत. ज्यांना या स्पर्धेत भाग घ्यायचा असेल त्यांनी 9004564960/9769348413 या नंबर्सवर कॉल/व्हॉट्स अपवर किंवा soortaal5@gmail.com वर इमेलद्वारा संपर्क करावा. स्पर्धेबाबत संपूर्ण माहिती दिली जाईल.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी ५०० रुपये  फी आहे. पुरुष आणि महिला विजेत्यास प्रत्येकी रु. ५०००/- तसेच दोन्ही गटातील उपविजेत्यांना प्रत्येकी रु. २५००/-  असे बक्षीस आणि  सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल. तसेच प्रशस्तीपत्रही दिले जाणार आहे.पुणे आणि जवळपासच्या परिसरातील इच्छुकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छीणाऱ्या स्पर्धकांनी १५ फेब्रुवारीच्या आत वरीलप्रमाणे संपर्क साधावा. पहिल्या फक्त १०० एंट्रीज स्वीकारल्या जातील. स्पर्धा २१ फेब्रुवारी (महाशिवरात्र सुट्टी) आणि २२ फेब्रुवारी ( ४ था शनिवार ) या दिवशी होईल.स्पर्धेचे ठिकाण गांधर्व महाविद्यालय,शनिवार पेठ पुणे हे आहे.

No comments:

Post a Comment