Thursday 13 February 2020

Zee Marathi - Maza Hoshil Na

माझा होशील नामालिका झी मराठीवर लवकरच
जवळपास गेली दोन वर्षं प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेणारी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून या मालिकेचा शेवट जवळ आला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहेप्रेक्षकांची ही आवडती मालिका बंद झाल्यानंर या मालिकेची जागा कोणती मालिका घेणार याची उत्सुकता प्रेक्षकांना होतीप्रेक्षकांची उत्सुकता पाहाता झी मराठी वाहिनीनं नव्या मालिकेचा प्रोमो शेअर केला.
'माझा होशील नाअसं या नवीन मालिकेचं नाव आहेनुकताच या मालिकेचा प्रोमो झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालाया मालिकेत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण गौतमी देशपांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेसुनील तावडेविनय येडेकर, निखिल रत्नपारखी, अच्युत पोतदार असे अनेक ज्येष्ठ कलाकार या प्रोमोमध्ये दिसतायतप्रोमोवरून ही लव्हस्टोरी असल्याचं पाहायला मिळत असून प्रेक्षक या नव्या मालिकेसाठी उत्सुक आहेत.

No comments:

Post a Comment