वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या २१ दिवसांचा लोकडाऊन जाहीर केला गेला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी घरी राहून सोशल डिस्टंसिंग करत कोरोनाला आळा घालायची जबाबदारी चोख बजावायची आहे. यामध्ये झी मराठी प्रेक्षकांची साथ देणार आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनाची जबाबदारी झी मराठी या वाहिनीने घेतली आहे. ही वाहिनी रसिक प्रेक्षकांसाठी सादर करणार एंटरटेनमेंट नॉन-स्टॉप. या लॉकडाऊनदरम्यान आता झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'तुला पाहते रे', 'स्वराज्य रक्षक संभाजी' आणि 'जय मल्हार' या तीन मालिका पुन्हा एकदा सुरु होत आहेत.
'तुला पाहते रे' ही मालिका ६ एप्रिलपासून सुरु होणार आहे. दुपारी १२ वाजता ही मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिका सायंकाळी ४ वाजता पाहयला मिळणार आहे. तर संध्याकाळी ६ वाजता 'जय मल्हार' मालिका झी मराठीवर प्रदर्शित होणार आहे. लॉकडाऊन दरम्यान मालिकांचं शूटिंग बंद आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळालेल्या मालिका, प्रेक्षकांच्या आग्रहास्तव पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
No comments:
Post a Comment