Thursday, 2 April 2020

Zee Yuva | Yuva Dancing Queen | सर्वाधिकवेळा सुवर्ण मोहोर मिळवणार डान्सिंग क्वीन पूर्वा शिंदे!!!

प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणाऱ्या 'झी युवा' वाहिनीवर काही कालावधीपूर्वी, 'युवा डान्सिंग क्वीन' ही नृत्य स्पर्धा सुरू झाली. अल्पावधीतच या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मने जिंकली. स्पर्धकांचे उकृष्ट डान्स परफॉर्मन्स व सोनाली कुलकर्णी आणि मयूर वैद्य यांचे उपयुक्त परीक्षण यामुळे दिवसेंदिवस या स्पर्धेत अधिक रंग भरले गेले आहेत. स्पर्धेच्या सुरुवातीला सोळा ललनांचा सहभाग असलेली ही स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली. स्पर्धा अंतिम टप्प्यात आलेली असताना, अंतिम फेरीसाठीची चुरस वाढलेली दिसते आहे. सर्वाधिक वेळा सुवर्ण मोहोर मिळवणाऱ्या पाच स्पर्धकांना अंतिम फेरीत स्थान मिळणार आहे.अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी सगळ्या स्पर्धकांची अतोनात धडपड सुरू आहे.
अंतिम फेरीच्या शर्यतीत, पूर्वा शिंदे सगळ्यात पुढे असल्याचे पाहायला मिळते आहे. मागील काही आठवड्यात तिच्या जबरदस्त नृत्याने, ती सातत्याने परीक्षक आणि प्रेक्षकांवर छाप पाडत आहे. पूर्वा सर्वाधिकवेळा गोल्डनब्लास्टची मानकरी ठरली आहे. अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी ती प्रमुख दावेदार असल्याचे तिने तिच्या सादरीकरणामधून दाखवून दिलेले आहे. पूर्वाला टक्कर देण्यासाठी, सर्वच स्पर्धक आपला सर्वोत्तम परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करत आहेत. पहिल्या परफॉर्मन्सपासूनच उत्कृष्ट नृत्याचा जलवा दाखवणाऱ्या पूर्वाचे कडवे आव्हान त्या सगळ्यांना पेलावे लागणार आहे. सर्वाधिकवेळा सुवर्ण मोहोर मिळवण्याचा मान सुद्धा पूर्वालाच मिळालेला आहे. त्यामुळे तिचा अंतिम फेरीचा मार्ग सोपा झालेला असल्याचे दिसून येत आहे. तिच्या दमदार सादरीकरणामुळे परीक्षक सुद्धा आश्चर्यचकित झालेले आहेत. तिला अंतिम फेरीत स्थान मिळायला हवे, असे परीक्षक सोनाली कुलकर्णी हिचेही प्रांजळ मत आहे. पूर्वाला एक उत्तम अभिनेत्री म्हणून, आपण सगळ्यांनी याआधी पाहिलेले आहे. ही गुणी अभिनेत्री लवकरच, तिच्या नृत्याच्या जोरावर, स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्याच्या तयारीत आहे.पूर्वा 'युवा डान्सिंग क्वीन'च्या अंतिम फेरीत स्थान मिळवणारी पहिली स्पर्धक ठरणार का? 
हे जाणून घेण्यासाठी, पाहत राहा, आपली सर्वांची लाडकी 'झी युवा' वाहिनी, बुधवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता!!!

No comments:

Post a Comment