Tuesday 19 May 2020

कोरोना काळात "लॉ ऑफ लव्ह" च्या फर्स्ट लूक चे डिजिटली अनावरण - First look of “LAW OF LOVE” Launched Digitally during CORONA pandemic…

कोरोनाचे रोजच्या रोज बदलणारे आकडे, चढते आलेख, कधी कधी मनाला चटका लावणाऱ्या घटना तर कधी परिस्थिती नियंत्रणात येतानाच्या दिलासादायक बातम्या .... मानवी मनाला आता अशा चढ उतारांशी रोज सामना करावा लागतोय. आज काहीही न करता स्ट्रेस लेव्हल म्हणजेच मनावरील ताणतणाव वाढताना दिसतोय. आणि या करीताच ओंनलाईन योगा क्लासेस, ओंनलाईन मोटिव्हेशन लेक्चर्स इ. डिजिटल जनजागृती वाढताना दिसतेय.  
करमणूक हा मोटिव्हेशनचाच एक भाग असून आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा घटक आहे आणि यानंतरही राहणार आहे. मनावरील ताण कमी करण्यासाठी चित्रपटच्या माध्यमातून होणारी करमणूक नेहमीच उपयुक्त ठरली  आहे.
लॉकडाऊनचा परिणाम अर्थात आपल्या चित्रपटसृष्टीला देखील बसला आहे, वेगवेगळ्या मालिका, चित्रपटांचे चित्रीकरण अर्ध्यातून थांबवण्यात आले, चित्रपटगृहे बंद झाल्यामुळे नव्या चित्रपटांचे प्रदर्शन तसेच नव्या चित्रपटांचे प्रोमोशन रखडले आहेत. आणि याच वेळेचा सदुपयोग करत एका सकारात्मक दृष्टिकोनातून निर्माता आणि पटकथाकार जे. उदय  रसिकप्रेक्षकांसाठी नवा मराठी चित्रपट "लॉ ऑफ लव्ह" घेऊन येत आहेत. सध्या डिजिटली जास्तीत जास्त लोकं "ऍक्टिव्ह" असल्याने निर्मात्यांनी याच वेळेला आपली संधी मानत "लॉ ऑफ लव्ह" च्या फर्स्ट लूक पोस्टरचं अनावरण सोशल मीडियावर केलं  आणि या पोस्टर ला चांगला प्रतिसाददेखील मिळत आहे. 
चित्रपटाचं नाव जितकं हटके आहे तितक्याच हटके त्याची कहाणी असेल यात काहीच शंका नाही. चित्रपटाचे निर्माता आणि पटकथाकार जे. उदय यांचा हा पहिला सिनेमा आहे. लॉकडाऊन नंतर सुरु होणाऱ्या प्रेक्षकांच्या बदललेल्या आयुष्यासाठी हा सिनेमा उत्तम पर्याय ठरणार आहे. या सिनेमात नक्की कोणकोणते कलाकार असणार आहेत, कोणत्या नव्या गोष्टी असतील ही माहिती सध्या गुलदस्त्यातचं आहे, त्यामुळे या सिनेमाबद्दलची उत्सुकता अधिकचं राहील.  
"प्रेमाची नवी परिभाषा लोकांसमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, सध्याची परिस्थिती पूर्णपणे जाणता खास सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेल्या लोकांसाठी नवं काहीतरी देण्याचा एक प्रयत्न म्हणून आम्ही फर्स्ट लूक पोस्टरचं अनावरण केलं आहे. लॉकडाऊन च्या काळात उत्सुकता वाढविणे आणि सर्व सुरळीत चालू झाल्यावर प्रेक्षकांना लार्जर द्यान लाईफ अनुभव देण्याचे आमचे ध्येय आहे"  
-  जे. उदय, निर्माता आणि पटकथाकार

The ever changing figures of CORONA, the rising graphs, incidents that straightway catch hold of your heart and comforting news for a while of CORONA under control…Human minds today have to struggle with high and low of life. The stress levels are rising while we are actually sort of resting at home. The modern life has been made to surrender to digital awareness created and maintained by Online Yoga lessons, motivational lectures and others to keep stresses under control.
            Entertainment has been a part of motivation and will be an important aspect of our lives in future. The entertainment brought to us through the medium on films has always been found useful as a stress buster.
            The impact of Lockdown has been equally felt and faced by the film industry on the whole. The schedules for various films and TV serials had to be abandoned suddenly. With the closure of cinema theaters, the release and promotion of new films has been adversely affected. It is within this scenario around and with a positive perspective, Producer and Screen Play writer J. Uday has used this period of lull to bring a new Marathi film “Law of Love” for connoisseur Marathi audiences. As most of the people have adjusted to the new Digital regime and have been active on this medium, the producer has unveiled First Look Poster of the film “Law of Love” through social media. The audiences have provided a huge positive response to the same.
            Just as the name of the film is out of the box, there is no doubt that the story would also follow suit. This is the debut film for Mr. J. Uday, Producer and Screen Play writer. This film is going to be a truly viable option for the changed lifestyle of audiences after lockdown. The details about the cast of the film and the fresh ingredients to be brought to you are yet to be announced and hence the anxiety about this film will continue to soar till the film hits the screens.
“We have tried to place a new definition of love before the audiences. Considering the situation at hand due to the Virus projection and highly active people on social media, we unveiled First Look Poster of this film on social media as our effort to provide something new to the audiences. After the anxieties of the lockdown die down and things are normal, we aim to provide a true larger than life experience for our audiences.”  
 - Mr.  J. Uday, Producer and Screenplay writer. 
Social Media handles of "Law of Love"

No comments:

Post a Comment