झी टॉकीज साजरा करणार अशोक सराफांचा वाढदिवस अशोक सराफ फिल्म फेस्टिवल द्वारे
झी टॉकीज आपल्या प्रेक्षकांना नेहमीच निखळ मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत असते. गेल्या १० वर्षात प्रेक्षकांना विविध चित्रपट आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून झी टॉकीज ने प्रेक्षकांना आपल्या कडे आकर्षित केलं आहे. टॉकीज प्रीमियर लीग च्या अभूतपूर्व यशानंतर ४ जुन २०२० रोजी अशोक सराफांच्या वाढदिवसानिमित्त झी टॉकीज घेऊन येत आहे "अशोक सराफ फिल्म फेस्टिवल ".
अशोक मामा हे मराठी चित्रपट सृष्टीतील एक दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेते आहेत. अनेक वर्षानपासून ते आपल्या खुमासदार शैलीने प्रेक्षकांना हसवत आलेले आहेत. मामांची डायलॉग डिलिव्हरी आणि आणि चेहऱ्यावरील हावभाव प्रेक्षांना एक वेगळाच आनंद देऊन जातात.अशोक मामांचा चित्रपट म्हणजे लहानांन पासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी मनोरंजनाचा खजिनाचं. मराठी चित्रपट सृष्टी च्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. म्हणूनच अशोक मामांच्या वाढदिवसानिमित्त झी टॉकीज घेऊन येत आहे "अशोक सराफ फिल्म फेस्टिवल". या फिल्म फेस्टिवलच्या माध्यमातून प्रेक्षकांना अशोक मामांच्या नव्या , जुन्या चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे.
या फिल्म फेस्टिवल ची सुरुवात सकाळी ९ वाजता "साडे माडे तीन" या चित्रपटाद्वारे होणार आहे. ३ भावांमधील एक भाऊ एका मुलीच्या प्रेमात पडतो आणि त्यानंतर सर्वांच्याच आयुष्याला कशी कलाटणी मिळते हे या चित्रपटात दाखवण्यात आलेलं आहे. ११ वाजता "एक डाव धोबी पछाड" या चित्रपटातून "दादा दांडगे " प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. अशोक मामांसोबत प्रसाद ओक, मुक्त बर्वे, संजय मोने, पुष्कर श्रोत्री या कलाकारांची अफलातून कॉमेडी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. गिरीश घाणेकर दिग्दर्शित ‘वाजवा रे वाजवा’ हा चित्रपट दुपारी १.३० वाजता दाखवण्यात येणार आहे. आपल्या सर्वांची लाडकी जोडी अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा "चंगू मंगू " दुपारी ४ वाजता प्रदर्शित होणार आहे. बड्या बापाची मुलं असणारी चंगू आणि मंगू ऐश आरामात आपलं आयुष्य जगात असतात आणि लोकांना त्रास देत असतात. "बिन कामाचा नवरा" एका अतिशय आळशी नवऱ्याची भूमिका अशोक मामांनी या चित्रपटात साकारलेली आहे. संध्याकाळी ६ वाजता हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या फिल्म फेस्टिवल ची सांगता "आयत्या घरात घरोबा" या तुफान विनोदी चित्रपटाद्वारे होणार आहे. सचिन पिळगावकर , लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ हे तीन सुपरस्टार आपल्या भेटीस येणार आहेत.
अशोक मामांना शुभेच्छा देण्याची संधी झी टॉकीज ने प्रेक्षकांना दिलेली आहे. या सर्व शुभेच्छा ४ जून २०२० रोजी दाखवण्यात येणार आहेत.अशोक मामांचे चाहते शुभेच्छांचा पाऊस पडतील याची आम्हला खात्री आहे. झी टॉकीज द्वारे कारण्यात येणारा हा क्वारंटाइन मधील वाढदिवस अशोक मामांसाठी नक्कीच स्पेशल ठरेल अशी आशा आहे.तर बघायला विसरू नका "अशोक सराफ फिल्म फेस्टिवल" ४ जून २०२० रोजी फक्त आपल्या झी टॉकीज वर.
No comments:
Post a Comment