कोविड संकटाच्या काळात आपल्या जिवाची पर्वा न करता वैद्यकीय कर्मचा-यांनी १२.४४ कोटी महाराष्ट्रवासियांसाठी लढा दिला. या लढ्यात त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी तसेच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी २३ वर्षीय कनिष्ठ डॉक्टर डॉ. ऐश्वर्या नायर हिने पुढाकार घेतला आहे. कोविड संकटाच्या काळात डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्डबॉय, आरोग्यसेवक तसेच ज्यांनी या युद्धात प्राण गमावले आहे, त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य करण्याच्या हेतूने निधी संकलन केले जाणार आहे. या अभियानाचे नाव `थँक यू कोविड योद्धा’ (टीवायकेवाय) असे आहे. त्याचे अनावरण महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते त्यांच्या मुंबईतील येथील महापौर निवासस्थानी करण्यात आले. याप्रसंगी खासदार राहुल शेवाळे, अभिनेते सुशांत शेलार, सुप्रसिद्ध जनसंपर्क अधिकारी राम कोंडिलकर, माध्यम सल्लागार रवि नायर, रामचंद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक शिंदे व सदस्य आदित्य शिंदे उपस्थित होते.
सुप्रसिद्ध कलाकार विक्रम गोखले, सचिन खेडेकर, सुबोध भावे, शंकर महादेवन, प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव, अतुल परचुरे, किशोरी शहाणे, मृणाल कुलकर्णी, क्रांती रेडकर, प्राजक्ता माळी, संदीप कुलकर्णी, अजिंक्य देव, पुष्कर जोग, पुष्कर श्रोत्री, जितेंद्र जोशी, भारत गणेशपुरे, भाऊ कदम, शशांक केतकर, सुशांत शेलार, प्रार्थना बेहरे, गायत्री दातार, सागर देशमुख, प्रथमेश परब, सई लोकर, वैभव तत्ववादी, प्रितम कांगणे आनंदा कारेकर, माधव देवचक्के, गौरीश चिपूरकर या कलाकारांनी कोविड विरोधातील थँक यू कोविड योद्धा या प्रकल्पात सहभाग दिला आहे. हे सर्व कलाकार लोकमान्य या चित्रपटातील जीवन आपुले सार्थ करा रे, या गाण्याच्या पार्श्वभूमीवर जनतेला हे आवाहन करत आहेत.
डॉ. ऐश्वर्या नायर हिने यावेळी बोलताना सांगितले की, इतर उद्योगाप्रमाणेच वैद्यकीय क्षेत्रातील कामगारांची देखील अवस्था येत्या काळात होणार आहे. पुढच्या काही महिन्यांत या आरोग्य कर्मचा-यांना खडतर सामना करावा लागणार आहे. आर्थिक परिस्थितीबाबत देखील अनेक आव्हानं त्यांच्यासमोर उभी राहणार आहेत. अशावेळी श्रीमंत असो किंवा गरीब प्रत्येकाला आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करणे अवघड होणार आहे. त्यामुळेच या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. त्यांच्यासाठी असे काही केले पा हिजे की त्यांच्या आयुष्यात फरक पडेल. त्यामुळेच हे अभियान त्याचा एक भाग आहे.
या प्रकल्पात प्रसिद्ध जनसंपर्क अधिकारी राम कोंडिलकर, सिनेकलाकार सुशांत शेलार, माध्यम सल्लागार रवी नायर यांनी सहयोग दिला आहे. व्हिडिओ पॅलेसचे नानिकभाई जयसिंगानी यां नी देखील सामाजिक कार्यासाठी लोकमान्य चित्रपटातील गीत उपलब्ध करून दि ले आहे तर रामचंद्र प्रतिष्ठान
संस्थेचे अशोक शिंदे यांनी प्रकल्पासाठी व्यासपीठउपलब्ध केले आहे.
नागरिकांनाही यात सहभागी होण्या चे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुकांना "थँक यू कोविड योद् धा"चा निधी कमीत कमी ९९ रुपयां पासून जमा करता येईल. त्याचा खाते तपशील असा - रामचंद्र प्रतिष्ठान, खाते क्रमांक १०३१०३१३०००२६७३ (आयएफएससी कोड SVCB0000031), शामराव विठ्ठल सहकारी बँक, दादर. डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य सेवक हे योद्धा तसेच त्यांच्यासोबत सेवा देताना आयुष्य गमावलेल्यांच्या कुटुंबियांसाठी हा खारीचा वाटा असून महाराष्ट्रातील १२.४४ कोटी जनतेच्या प्राणांना वाचविण्यासाठी केलेल्या कार्याबद्दलची ही कृतज्ञता आहे, असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
आपण सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक आव्हानांचा सामना करीत
असताना, टीवायसीवाय ही संकल्पना प्रत्येकाने पुढे न्यावी आणि निधीमध्ये
योगदान देण्याची विनंती करण्यात आली आहे. यातून संकलित केले गेलेले पैसे हेल्थकेअर कम्युनिटी आणि पीडित कुटुंबियांना देण्या त येतील. टीवायवायवायमध्ये जमा झालेले पैसे योग्य लोकांपर्यंत पोचतील याची खात्री जनतेने बाळगावी.
अधिक माहितीसाठी फेसबुक थँक्यू कोविडयोद्धा, ट्विटर, इन्स्टाग्राम अकाउंट्सचे अनुसरण करा. आपले योगदान लवकरात लवकर खाली दिलेल्या खात्यात जमा करावे. मदतीची प् रतीक्षा करीत आहे:
प्रकल्पाचे नावः थँक यू कोविड योद्धा (TYCY)
बँक: शामराव विठ्ठल को-ऑप बँक, दादर (पश्चिम) शाखा
खातेधारक संस्था : रामचंद्र प्रतिष्ठान
खाते क्रमांक: 103103130002673
आयएफएससी कोड: SVCB0000031
अधिक माहितीसाठीआपण कॉल करू शकता: 9969336188
No comments:
Post a Comment