Wednesday, 24 June 2020

अजय देवगनचा मावळा म्हणतोय, “नैराश्यावर मात करण्यासाठी वाचा पाब्लो नेरूदांची कविता”

अजय देवगनच्या तानाजी चित्रपटाव्दारे यंदा मराठमोळा अभिनेता धैर्यशीलने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. तानाजीच्या सैन्यातल्या मावळ्याच्या भूमिकेत दिसलेल्या धैर्यशीलने नोबेल पुरस्कार प्राप्त सुप्रसिध्द स्पॅनिश कवी पाब्लो नेरूदा ह्यांच्या मराठी अनुवादीत कवितेचे वाचन केलेला एक व्हिडीयो नुकताच सोशल मीडियावर टाकला आहे.
सध्याच्या नैराश्यग्रस्त वातावरणातून बाहेर येऊन सकारात्मकतेने वाटचाल करण्यासाठी पाब्लो नेरूदांची ही कविता खूप प्रेरित करेल असे धैर्यशीलला वाटते. तो म्हणतो, सध्या नैराश्य, चिंता आणि काळजीचे वातावरण वैश्विक स्तरावर पाहायला मिळतेय. पाब्लो नेरूदा हे विश्वकवी होते. त्यांची ‘To start dying slowly’ ही कविता कुठे तरी आपली सध्याची मनस्थिती दर्शवणारी आणि परिस्थितीतून मरगळ झटकून पूढे वाटचाल करायला प्रेरित करणारी आहे, असं मला वाटतं. सध्या आपण घरी अडकलो आहोत. आपली पूढची वाटचाल कशी असावी ह्याचा विचार करायची, मन:चिंतन करायची खरं तर हिच वेळ आहे. 
धैर्यशील पूढे म्हणतो, “To start dying slowly’ कवितेचा अनुवाद असलेली तुम्ही मरताय हळूहळू ह्या कवितेचा गाभा लक्षात घेऊन आत्मचिंतन केले तर कवितेतलं तत्वज्ञान निश्चितच नैराश्यातून बाहेर काढायला मदत करणार आहे. मला कायम असं वाटतं आलयं की, आपण हल्लीची पिढी खूप सुपरफिशीअल आयुष्य जगत आलोय. आणि कुठेतरी ही कविता आपल्याला जगण्याचा खरा दृष्टिकोण देते. 

No comments:

Post a Comment