मालिकेतल्या भूमिकेविषयी बोलणं होत असतं - गौतमी देशपांडे
झी मराठीवरील 'माझा होशील ना' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली आणि त्यातील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. लॉकडाऊनमुळे सध्या मालिकेचे नवीन भाग प्रेक्षकांना पाहायला मिळत नाही आहेत, पण दुसरीकडे आता चित्रीकरणाला परवानगी मिळाल्यामुळे लवकरच नव्या भागांसोबत हि मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येईल.
जवळपास अडीच महिन्यांच्या सुट्टीमध्ये या मालिकेतील प्रेक्षकांची लाडकी सई म्हणजेच अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने तिच्या भूमिकेला किती मिस केलं असं विचारलं असताना गौतमी म्हणाली, "खरंतर लॉकडाऊन जाहीर झालं तेव्हा आम्हाला अंदाज आला होता कि हे लवकर संपणार नाही. सुरुवातीच्या काळात आम्ही प्रेक्षकांसाठी सोशल मीडियावर वेबिसोड्स पोस्ट केले कारण मालिका नुकतीच सुरु झालेली. त्यानंतर व्हिडीओ कॉलद्वारे आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत. त्यामुळे भूमिकेपासून लांब आहोत असं वाटतच नाही. सतत मालिकेतल्या भूमिकेविषयी बोलणं होत असल्याने आम्ही त्यामध्येच असतो. आमची पात्रं देखील आम्ही लिहून काढली आहेत."
No comments:
Post a Comment