लॉकडाऊनमध्ये झी मराठीवर आणखी २ नवीन मालिकांची पर्वणी
लॉकडाऊनमध्ये चित्रीकरणाची परवानगी जरी मिळाली असली तरी चित्रीकरण सुरू होण्यासाठी काही काळ जाईल. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या मालिकांचे नवीन भाग पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी थोडा वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. या दरम्यान, डिजिटल आशय निर्मितीतून मनोरंजन करणे शक्य असल्याने झी मराठी वाहिनीवर 'होम मिनिस्टर घरच्याघरी' आणि 'घरात बसले सारे' यासारख्या आणखी काही घरच्या घरी चित्रित केलेल्या मालिकांची पर्वणी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
‘एक गाव भूताचा’ आणि ‘टोटल हुबलाक’ या आणखी दोन नवीन मालिका लॉकडाऊनच्या काळात ‘झी मराठी’वर पाहायला मिळणार आहेत. ‘एक गाव भूताचा’या या मालिकेचे लेखन 'राजू घाग' यांनी केले असून यात वैभव मांगले मुख्य भूमिकेत आहेत. तर लेखक आणि निर्माता तेजपाल वाघ याने त्याच्या ‘लागीरं झालं जी’ मालिके तील भैय्यासाहेब, टॅलेन्ट आणि राहुल्या या तिघांना घेऊन ‘टोटल हुबलाक’ ही मालिका केली आहे. 'टोटल हुबलाक' हि मालिका १५ जून पासून रात्री ८.३० वा तर 'एक गाव भुताचा' हि मालिका १८ जून पासून रात्री ९ वा. प्रेक्षक झी मराठीवर पाहू शकतील.
No comments:
Post a Comment