Sunday, 14 June 2020

Zee Marathi - Shriyut Gangadhar Tipre

टिपरेंची नात शलाका सध्या काय करते?

एक आदर्श एकत्र कुटुंब नेमकं कसं असावं हे श्रीयुत गंगाधर टिपरे या मालिकेतून उत्तमरित्या मांडण्यात आलं आणि म्हणूनचं २००१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आलेली मालिका तुफान लोकप्रिय झाली आणि अजरामर ठरलीआता हि मालिका लॉकडाऊनच्या काळात पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीवर १५ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेया मालिकेतील प्रत्येक कलाकारांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकलीत्यातच शलाका टिपरे ही भूमिका साकारणारी रेश्मा नाईक ही अभिनेत्री प्रेक्षकांना विशेष भावलीमालिकेतले बहुतांश कलाकार आजही मनोरंजनविश्वात सक्रिय आहेतपणटिपरेंची नात शलाका नेमकं काय करतेय असा प्रश्न कदाचित प्रेक्षकांना पडला असेल.
शलाका म्हणजेच अभिनेत्री रेश्मा नाईक हि मनोरंजन क्षेत्रापासून थोडी अलिप्त असल्याचं दिसून आलंती सध्या आपल्या कुटुंबात रमली आहेरेश्माचे लग्न झाले असून तिला एक मुलगाही आहेमुलाच्या संगोपनाकडे ती पूर्णपणे लक्ष देतेयमालिकेचं झी मराठीवर फेरप्रक्षेपण होणार असं कळल्यावर रेश्मादेखील भूतकाळात रमलीमालिकेच्या आठवणी सांगताना ती म्हणालीकी "चित्रीकरणाला जाताना मला वाटायचं कीमी एका घरातून दुसऱ्या घरी जातेयटिपरे कुटुंबदेखील माझं दुसरं घरच होतंजसं मी माझ्या घरी असायचे तसंच सेटवर असायचेआई-बाबाभाऊ आणि आजोबा असं आमचं टिपरे कुटुंब मला माझ्या खऱ्याखुऱ्या कुटुंबाप्रमाणेच भासायचंमाझा सख्खा भाऊ माझ्याहून एक वर्ष मोठा आहेत्यामुळे मालिकेत शिऱ्या आणि मी ज्याप्रमाणे एकमेकांच्या खोड्या काढायचोतसंच ते आमच्या घरीसुद्धा असायचंटिपरे कुटुंबातील आजोबांप्रमाणे आमच्या घरी माझी आजी असायचीआम्हा सर्वांना सांभाळून घेणारी."

No comments:

Post a Comment