टिपरेंची नात शलाका सध्या काय करते?
एक आदर्श एकत्र कुटुंब नेमकं कसं असावं हे श्रीयुत गंगाधर टिपरे या मालिकेतून उत्तमरित्या मांडण्यात आलं आणि म्हणूनचं २००१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आलेली मालिका तुफान लोकप्रिय झाली आणि अजरामर ठरली. आता हि मालिका लॉकडाऊनच्या काळात पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीवर १५ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यातच शलाका टिपरे ही भूमिका साकारणारी रेश्मा नाईक ही अभिनेत्री प्रेक्षकांना विशेष भावली. मालिकेतले बहुतांश कलाकार आजही मनोरंजनविश्वात सक्रिय आहेत. पण, टिपरेंची नात शलाका नेमकं काय करतेय असा प्रश्न कदाचित प्रेक्षकांना पडला असेल.
No comments:
Post a Comment