वाचन, वेब सिरीज आणि भांडी घासणं...
चित्रीकरण बंद असल्यामुळे कलाकार मंडळी 'झी युवा' वाहिनीवरील 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' मालिकेतील नचिकेत देशपांडे, म्हणजेच अभिनेता निखिल दामले सांगतोय त्याच्या लॉकडाऊनमधील दिनक्रमाविषयी;
१. लॉकडाऊनमध्ये तू कसा वेळ घालवतो आहेस?
वाचन, वेब सिरीज बघणं आणि घरकामात थोडी फार मदत करणं या तीन गोष्टींमध्ये माझा बराचसा वेळ जातोय. झी ५ उत्तम सीरीज आहेत त्या बघण्यात वेळ कसा जातो हे कळत नाही .
२. वाचनात सुद्धा तुझा वेळ जातो असं तू म्हणालास. सध्या तू काय वाचतो आहेस?
सध्या स्वयंभू हे पुस्तक वाचतोय. माझ्या बाबांनी मला हे पुस्तक वाचायला सांगितलंय. व्यासांनी लिहिलेलय महाभारतावर हे पुस्तक आधारित आहे. महाभारतात घडलेल्या खऱ्या घटनांचा मागोवा यात घेण्यात आला आहे. महाभारतात घडल्याही नाहीत अशा गोष्टी हल्ली वाचनात आणि पाहण्यात येतात. त्यामुळे अस्सल महाभारत काय आहे, ते जाणून घेण्याचा माझा प्रयत्न आहे.
३. घरात काम करण्याचा सुद्धा तू उल्लेख केलास, त्याविषयी सविस्तरपणे काय सांगशील?
खरं तर मी सतत बसून राहणं आणि मोबाईल वापरणं आईला अजिबात आवडत नाही. त्यामुळे आईला मस्का मारण्यासाठी मी घरकामातमदत करतो असं म्हणता येईल. मी नेहमीच चित्रीकरणाच्या निमित्ताने एरवी मी दिवसभर बाहेर असतो; त्यामुळे सध्या मी घरात असल्याचा फायदा घरचे घेत आहेत. इतर घरातील मुलांची जशी स्थिती आहे, साधारण तशीच अवस्था माझी सुद्धा झाली आहे. घरातील केर काढणं, भांडी घासणं अशा घरातील कामांमध्ये मदत करणं भाग आहे.
४. सरकारने आता शूट ला परवानगी दिल्या आहेत अशावेळी, तू काय तयारी करत आहेस आणि तुझ्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना काय आवाहन करशील?
सरकारने आता शूटिंग ला परवानगी दिल्यामुळे आमची मालिका ऑलमोस्ट सुफल संपूर्ण सुद्धा सुरु होत आहे आणि मी पुन्हा नचिकेत च्या भूमिकेत शिरतोय अस झालय. काही अटी आणि नियम आहेत ते मी सध्या समजून घेत आहे. प्रेक्षकांनी मात्र सध्या लॉकडाऊनमध्ये करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. तुम्ही अनेक गोष्टींमध्ये आपण मन रमवू शकता. घरातच राहून, आपले छंद जोपासण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. आमची मालिका लवकरच येत आहे तिची वाट पहा आणि कोरोनावर मात करण्यासाठी, प्रत्येकाने आपापल्या परीने सहकार्य करा. त्यासाठीच, घरी रहा आणि सुरक्षित रहा.
No comments:
Post a Comment