'प्रेम पॉयजन पंगा'मधील आपली सगळ्यांची लाडकी जुई, म्हणजेच अभिनेत्री शरयू सोनावणे, हिने लॉकडाऊनमध्ये नेमकं काय करायचं ठरवलंय, आणि ती तिचा वेळ कसा घालवतेय याविषयी तिच्याशी केलेली खास बातचीत :
१. लॉकडाऊनच्या काळात वेळ घालवण्यासाठी तू काय करतेस?नृत्य करायला मला खूप आवडतं. वयाच्या चौथ्या वर्षांपासून मी नृत्य शिकते आहे. भरतनाट्यम आणि फोकडान्स हे माझे आवडते नृत्यप्रकार आहेत. एरवी व्यस्त असल्यामुळे नृत्यासाठी वेळ देता येत नाही. आता मात्र खूप मोकळा वेळ मिळत असल्यामुळे, दिवसभरातून काही वेळ मी नृत्यासाठी देते. याशिवाय पेंटिंग करण्यात सुद्धा माझा वेळ जातो.
२. तुला कुत्र्यांची खूप आवड आहे. तुमच्याकडे सुद्धा एक कुत्रा आहे. लॉकडाऊनमध्ये त्याच्यासोबत कसा वेळ घालवतेस?लिओ, हा फक्त आमचा पाळीव कुत्रा नाही. तो आमच्या घरातील एक सदस्य आहे. मला कुत्र्यांविषयी खूप जिव्हाळा आहे. लिओ माझा फार आवडता मित्र आहे. टीमउळे त्याच्यासोबत वेळ घालवल्याशिवाय आणि खेळल्याशिवाय माझा दिवस संपत नाही. फक्त लिओच नाही, इतर कुत्र्यांची काळजी घेण्याचा माझा प्रयत्न असतो. आमच्या भागातील ८ ते १० भटक्या कुत्र्यांना मी रोज रात्री खायला घालते. ते उपाशी राहू नयेत प्रयत्न असतो.
३. लॉकडाऊनमुळे कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली आहे. त्याबद्दल काय सांगशील? एकत्र नाश्ता आणि जेवण करण्याची आमची पद्धत होती. सगळेच आपापल्या कामात व्यस्त झाल्यानंतर, यासाठी वेळ मिळेनासा झाला. पण, आता लॉकडाऊनमुळे सगळेजण घरी आहोत. म्हणून आम्ही सगळे आवर्जून एकत्र जेवायला बसतो. त्यावेळी आमच्या गप्पाही रंगतात. 'नवा व्यापार', 'नाव-गाव-फळ-फुल', असे काही खेळ आम्ही खेळतो. पत्त्यांचे डाव सुद्धा रंगतात. जेवढा अधिक वेळ एकमेकांसाठी देता येईल तेवढा देण्याचा आम्ही प्रयत्न करतो.
४. सरकारने शूटिंग ला परवानगी दिली आहे तेव्हा तुझी काय तयारी सुरु आहे ? आणि
प्रेक्षकांना तू काय संदेश देशील
सरकारने काही अटी सोबत शूटिंग ची परवानगी दिली आहे त्यामुळे आमची मालिका ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण तुम्हाला लवकरच झी युवावर पहायला मिळेल. मी सध्या नगर ला आहे , बरीच तयारी करायची आहे . मात्र तोपर्यंत देशाचा एक सुजाण नागरिक म्हणून, आपण प्रत्येकाने नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे. कोरोनाशी लढा देण्याचा उपाय म्हणून आपल्याला घरी राहणे आवश्यक आहे. त्यामुळे, तुम्ही सुद्धा घरीच राहा, सुरक्षित राहा. विरंगुळ्यासाठी घरच्याघरीच वेगवेगळे पर्याय निवडा.
No comments:
Post a Comment