Friday 12 June 2020

Zee Yuva | 'झी युवा'वर उलगडणार रावी आणि अरिहंतच्या प्रेमाची कहाणी...

'झी युवा' वाहिनी, ही नेहमीच काही ना काही नवनवीन गोष्टी प्रेक्षकांसाठी घेऊन येते. म्हणूनच ती, सगळ्यांची आवडती वाहिनी आहे. या वाहिनीवर दर रविवारी एक दर्जेदार वेबसिरीज प्रक्षेपित करण्यात येत आहे. भरपूर मनोरंजन करणारी आणि नात्यामधील अनेक कंगोरे उलगडणारी 'वन्स अ इयर' ही अप्रतिम वेबसिरीज, येत्या रविवारी १४ जूनला दुपारी १२ वाजता पाहायला मिळणार आहे. रावी आणि अरिहंत यांच्या जीवनातील सहा वर्षांचा प्रवास या लघुमालिकेत पाहायला मिळेल. कॉलेज जीवनातील न कळत्या वयात जुळलेलं प्रेम, त्यातून घडणाऱ्या गमतीजमती, कधी ताणलं गेलेलं, तर कधी गोडगुलाबीचं नातं, असा या जोडीचा प्रवास 'वन्स अ इयर'मध्ये पाहायला मिळतो. रावी आणि अरिहंत, आजच्या काळातील तरुणाईचं प्रतिनिधित्व करतात. या लघुमालिकेची कथा, आणि ही दोन्ही पात्रं, तरुणांना आणि विशेषतः 'झी युवा'च्या प्रेक्षक वर्गाला नक्कीच आपलीशी वाटतील. मालिकेतील संवाद ऐकताना अनेकांचं मन भूतकाळात रमून जाईल, असा विश्वास अभिनेत्री मृण्मयी गोडबोले हिला वाटतो. लॉकडाऊनच्या काळात, अजूनही मित्रमैत्रिणींना भेटण्याची मुभा आपल्याला मिळालेली नाही. आरोग्य उत्तम राखण्यासाठी, काही प्रमाणात खबरदारी घेणे गरजेचे आहे. अशावेळी, नात्यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारी, 'वन्स अ इयर' ही मालिका पाहायला मिळणं, ही प्रेक्षकांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे.याविषयी बोलताना, अभिनेता निपुण धर्माधिकारी म्हणतो;"या लघुमालिकेचे प्रक्षेपण टीव्हीवर सुद्धा होईल, असा विचारही मनात आला नव्हता. टीव्हीच्या माध्यमातून मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत एकाचवेळी पोचता येतं. 'झी युवा'सारख्या उत्कृष्ट वाहिनीवर 'वन्स अ इयर' पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. एका दिवसात, सर्वच्या सर्व सहा एपिसोड सलग पाहायला मिळतील, हा नवा अनुभव ठरेल. येत्या रविवारी, १४ तारखेला, दुपारी १२ वाजता ही मालिका पाहायला विसरू नका."

No comments:

Post a Comment