लाव रे तो व्हिडिओमध्ये लवकरच पहायला मिळणार महिला शक्ती...
झी युवा वाहिनीवरच्या लाव रे तो व्हिडिओ या कार्यक्रमामध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातलं टॅलेंट पहायला मिळतंय. कारण कार्यक्रमाची संकल्पनाच तशी आहे, सर्वसामान्य कलाकार किंवा माणसांनी त्यांच्याकडचं कौशल्य किंवा त्यांना अवगत असलेली कला कुसर एका व्हिडिओ माध्यमातून शुट करतात आणि तो व्हिडिओ या कार्यक्रमामध्ये पाठवतात आणि त्या व्हिडिओंना या कार्यक्रमामध्ये दाखवलं जातंय. देशभरातल्या लॉकडाऊनमुळे घरातल्या घरात अशा पद्धतीचे व्हिडिओज शुट करुन एका लोकप्रिय वाहिनीवर झळकण्याची ही संधी अनेक जण घेतायत. पण आता पुढचे दोन आठवडे हा कार्यक्रम आणि यातले व्हिडिओज हे महिला शक्तीचे प्रदर्शन करताना दिसतील.
थोडक्यात राज्यभरातनं इच्छुक मुली, तरुणी आणि महिलांनी आपलं टॅलेंट दाखवणारे व्हिडिओ शुट करावेत आणि या कार्यक्रमामध्ये पाठवावेत. तुमचे हे व्हिडिओ पाहून ते योग्य पद्धतीने लाव रे तो व्हिडिओ या कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात येतील. राज्यभरातल्या विविध स्तरावरील महिलांमधले छुपे गुणं कौशल्य यानिमित्ताने पुढे आणण्याची संधी त्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातनं देण्याचा प्रयत्न वाहिनीतर्फे केला जातोय. तेव्हा लाव रे तो व्हिडिओचे हे महिला विशेष भाग पहायला विसरु नका फक्त झी युवा वाहिनीवर.
No comments:
Post a Comment