Friday 18 December 2020

कोकिलाबेन रुग्णालयात 70 वर्षीय पणजीने तिच्या 4वर्षाच्या पणतीला मूत्रपिंड दान करून पिढ्यांमधील अंतर केले कमी

चार वर्षाची मुलगी मूत्रपिंडाच्या शेवटच्या टप्प्यातीलआजाराने ग्रस्त होतीयशस्वी प्रत्यारोपणानंतर तिला सोडण्यात आले ~

मुंबई18 डिसेंबर 2020 : एका अनोख्या आणि दुर्मिळ प्रकरणात70 वर्षीय पणजीने आपल्या 4 वर्षे वयाच्या पणतीला मूत्रपिंडाचे दान केले आणि या मुलीला आयुष्य जगण्याची पुन्हा संधी मिळावी म्हणून पिढ्यांमधील अंतर कमी केलेप्रत्यारोपणाच्या प्रकरणामध्ये रुग्ण व अवयवदाता यांच्यात चार पिढ्यांचे अंतर असण्याची अपवादात्मक गोष्ट या ठिकाणी घडली. आयझा तन्वीर कुरेशी हिला, फोकल सेगमेंटल ग्लोमेरुलोस्क्लेरोसिस (एफएसजीएस) नावाने ओळखल्या जाणारा मूत्रपिंडाचा शेवटच्या टप्प्यातील आजार होताआणि तिला मूत्रपिंड प्रत्यारोपणाची तातडीची गरज होती. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल (केडीएएच) येथे 25नोव्हेंबर2020 रोजी प्रत्यारोपण तज्ज्ञांच्या पथकाने तिच्यावर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली. कोणतीही अनुचित घटना न घडता अवयवदात्री व रुग्ण या दोघींची प्रकृती सुधारली व त्यांना घरी सोडण्यात आले.

केडीएएचमधील नेफ्रॉलॉजी विभागाचे प्रमुख व सल्लागार डॉ. शरद शेठ यांनी सांगितले, ही रुग्ण तिच्या पालकांची एकुलती एक मुलगी आहे. ती आमच्या रूग्णालयात आलीतेव्हा तिच्या चेहऱ्यावर सूज होती. मागील 6 महिन्यांपासून तिला हा त्रास होत होता व तो वाढू लागला होता. तसेच तिला भूक कमी लागणेमळमळ व उलटी असेही त्रास होत होते. तिच्या मूत्रपिंडाचे कार्य संपूर्णपणे विस्कळीत होऊन तिला मेटॅबॉलिक अॅसिडोसिस झाल्याचे आढळून आले. तिला तातडीने हिमोडायलिसिसवर ठेवण्यात आले. मूत्रपिंड प्रत्यारोपणाची तिला गरज होती.

डॉ. शेठ पुढे म्हणाले, "अवयवदात्री व रूग्ण यांच्यातील नाते व त्यांच्या वयातील अंतर पाहताही माझ्या 40 वर्षांच्या कारकिर्दीतील अगदी एकमेवाद्वितीय अशी प्रत्यारोपणाची केस होती."

रूग्णाच्या संपूर्ण कुटुंबात,तिच्या 70 वर्षांच्यापणजीचे मूत्रपिंड हेच केवळ रुग्णाला अनुकूल ठरणारे होते. ही पणजी निरोगी होती व तिचा ब्लड ग्रुप रूग्णाशी सुसंगत होता. तिचे वय लक्षात घेऊन तिचे संपूर्ण मूल्यांकन आणि तपासणी करण्यात आली. ती अवयवदान करण्यासाठी योग्य असल्याचे मूल्यांकनात आढळले. प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पडल्यावर अवयवदात्री आणि प्राप्तकर्ती या दोघींची प्रकृती उत्तम आहे. पाचव्या दिवशी पणजीला सोडण्यात आले. रुग्णाच्या मूत्रपिंडाच्या कार्याच्या चाचण्या घेण्यात आल्या व त्यांमध्ये सुधारणा दिसून आली. शस्त्रक्रियेच्या 14व्या दिवशी रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला.

डॉ. शेठ यांच्या नेतृत्वाखालीकोकिलाबेन रूग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने ही मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली. या पथकामध्ये अॅंड्रॉलॉजी व रीकन्स्ट्रक्टिव्ह युरॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. संजय पांडे, युरॉलॉजीतील सल्लागार व मूत्रपिंड प्रत्यारोपणातील सर्जन डॉ. अत्तार महंमद इस्माईल यांचातसेच अन्य डॉक्टरांचा समावेश होता.

रुग्णाच्या आईने आभार व्यक्त करताना म्हटले, कोकिलाबेन रुग्णालयात आम्हाला मिळालेल्या मदतीबद्दल आम्ही सर्व संबंधितांचे आभारी आहोत. आमच्या मुलीला कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये आणण्याचा आम्ही घेतलेला निर्णय सर्वात योग्य होता. येथे तिच्या तब्येतीला चांगले वळण लाभले. माझ्या लहान मुलीला दर दिवसाआड अनेक तास हिमोडायलिसिसघेताना पाहूनमनाला खूप वेदना होत होती. डॉ. शेठ आणि त्यांच्या टीमने माझ्या मुलीला इतर मुलांप्रमाणेच सामान्य जीवन जगण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही कायम कृतज्ञ आहोत. माझी आजी माझ्या मुलीसाठी तारणहार म्हणून आली. तिचे आभार मानायला माझ्याकडे शब्द पुरेसे नाहीत.

No comments:

Post a Comment