Tuesday 29 December 2020

Zee Yuva | Tuz Maz Jamtay | सहकलाकारांनी साजरा केला अपूर्वाचा वाढदिवस

आपला उत्कृष्ट अभिनय, बोल्ड लूक आणि मादक अदांमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. अपूर्वा नेमळेकरने नुकताच तिचा ३२वा वाढदिवस साजरा केला. सध्या अपूर्वा झी युवावरील तुझं माझं जमतंय या मालिकेतून आपल्या भेटीला येत आहे. यात तिच्या भूमिकेचं नाव पम्मी आहे. अपूर्वा आपल्या कुटुंबापासून दूर नगरमध्ये या मालिकेचं शूटिंग करत आहे पण तिच्या सहकलाकारांनी तिला कुटुंबापासून दूर असल्याची जाणीव होऊ नाही दिली. तिच्या वाढदिवसा निमित्त जोरदार सेलिब्रेशन आणि एक सरप्राईज तिच्या 'तुझं माझं जमतंय' या मालिकेतील सहकलाकारांनी तिला दिलं.
सेटवर तिच्यासाठी १ २ नाही तर ३ केक्स आणि डेकोरेशन करून अपूर्वाला तिच्या सहकलाकारांनी सरप्राईज दिलं. तिने वाढदिवासच्या सेलिब्रेशनचे व्हिडीओ सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. अपूर्वाला तिच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment