श्वेताने केली राजस्थानची सफर
झी युवावरील डॉक्टर डॉन या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. मालिकेची कथा हटके आहेच पण यातल्या कलाकारांनी आपल्या अभिनयाने या कथेला चांगला न्याय दिलाय हे महत्वाचे. म्हणूनच सोशल मिडीयावरुन किंवा वैयक्तिक स्तरावरही यातल्या कलाकारांना प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळतेय. डॉ. मोनिका श्रीखंडे म्हणजे प्रेक्षकांची लाडकी डॉलीबाई महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतेय. तिचा अभिनय तसंच मालिकेतील लुक प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस पडला आहे. श्वेताच्या मालिकेतील लूकवर तर प्रेक्षक फिदा आहेतच पण श्वेता खऱ्या आयुष्यात देखील मोनिका सारखीच एलिगंट दिसते. तिने नुकतीच राजस्थानची सफर केली आणि त्यात सहलीचे काही फोटोज तिने सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. राजस्थानमधील महालाजवळ काढलेल्या फोटोजमध्ये श्वेताचा सौंदर्य अजूनच खुलून दिसतंय. तिच्या या फोटोजवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.
No comments:
Post a Comment