माननीय रस्ते परिवहन व महामार्ग तसेच सुक्ष्म, छोटे आणि मध्यम उद्योग मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लाँच
New Delhi, 02 December 2020
भारतातील अर्थमुव्हिंग आणि बांधकाम उपकरणांची सर्वांत मोठी उत्पादक कंपनी जेसीबी इंडिया लिमिटेडने आज उद्योगक्षेत्रातील पहिल्या ड्युअल-फ्युएल सीएनजी (काँप्रेस्ड नॅचरल गॅस) बाको लोडर भारतातील बाजारपेठेत आणला. या उत्पादनाला जेसीबी 3डीएक्स डीएफआय असे नाव देण्यात आले असून ते एचसीसीआयचा (होमोजिनियस चार्ज काँप्रेशन इग्निशन) वापर करून सीएनजी आणि डिझेल अशा दोन्ही इंधनांवर एकाच वेळी चालवले जाऊ शकते.
या यंत्राचे अनावरण माननीय रस्ते परिवहन व महामार्ग तसेच सुक्ष्म, छोटे, मध्यम उद्योगमंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात नवी दिल्ली येथे करण्यात आले. पर्यायी इंधनांचा वापर करणा-या बांधकाम यंत्रसामुग्रीच्या विकासाचे श्री. गडकरी यांची कायम समर्थन केले आहे आणि बांधकाम उपकरण वाहनांमध्ये सीएनजीचा वापर करण्यास प्रेरणा दिली आहे.
पर्यायी इंधनांचा वापर हा कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट व्हेइकल विभागातील लक्षणीय बदल आहे. जेसीबी 3डीएक्स डीएफआय सीएनजी व डिझेलच्या मिश्रणावर चालवले जात असल्याने सुक्ष्म कणांच्या उत्सर्जनामध्ये भरीव घट होते. यामुळे त्या प्रमाणात कार्बन डाय ऑक्साइडचे उत्सर्जनही कमी होते.
सीएनजी आर्थिकदृष्ट्या अधिक किफायतशीर आहे आणि त्यामुळे अखेरच्या ग्राहकाचा यंत्र चालवण्याचा खर्च कमी करण्यात ते उपयुक्त ठरते. पर्यावरण व शाश्वततेबाबत जगभरात चिंतेचे वातावरण असल्याने जेसीबी आपल्या ड्युएल फ्युएल सीएनजी बाको लोडरच्या माध्यमातून यासाठी काम करण्यास बांधील आहे. या यंत्राचा विकास भारतात करण्यात आला असून, लाँच करण्यापूर्वी त्याच्या विविध परिस्थितीत चाचण्या घेण्यात आल्या आहेत. कंपनीच्या दिल्ली-राजधानी परिसरातील बल्लारगढ येथील कारखान्यात यंत्राची बांधणी केली जाणार आहे.
जेसीबी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक शेट्टी यावेळी म्हणाले, “भारतात आम्ही गेल्या चार दशकांपासून काम करत आहोत आणि हा संपूर्ण काळ आम्ही नवोन्मेषासाठी गुंतवणूक करत आलो आहोत. हा आमच्या कामाच्या आधारस्तंभांपैकी एक आहे. हे ड्युएल-फ्युएल यंत्र डिझेलच्या जागी सीएनजीचा वापर करू शकते आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने ते विकसित करण्यात आले आहे. हे यंत्र पुढे जाऊन देशातील संरचना निर्मितीमध्ये योगदान देईल आणि जगभरातील अन्य देशांमध्येही निर्यात केले जाईल.”
मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत ही उद्दिष्टे साध्य करण्याचा एक भाग म्हणून जेसीबी इंडिया भारतात पाच कारखाने व एक डिझाइन सेंटर चालवत आहे. जेसीबी समूहाच्या सहाव्या कारखान्याचे बांधकाम गुजरातमधील बडोदा येथे सुरू आहे. कंपनीने ११०हून अधिक देशांना मेड इन इंडिया यंत्रे निर्यात केली आहेत. जेसीबीच्या वन ग्लोबल क्वालिटी स्टॅण्डर्डनुसार या यंत्रांचे डिझाइन तसेच उत्पादन करण्यात आले आहे.
ड्युएल-फ्युएल सीएनजी बाको लोडर हे उत्पादन भारतातील बाजारपेठेत उत्तम प्रस्थापित झालेल्या 3डीएक्स मॉडेलवरच आधारित आहे. यामध्ये इंधन भरण्याचा पर्याय लवचिक आहे. त्यामुळे सीएनजी रिफिलिंग पॉइंट्स उपलब्ध नाही अशा दुर्गम भागातील ग्राहकांसाठीही ते उपयुक्त आहे.
दीपक शेट्टी पुढे म्हणाले, “जेसीबी आपले ग्राहक, डीलर्स, पुरवठादार यांच्याकडून मिळालेल्या प्रक्रियांच्या आधारे या प्रकल्पावर काम करत आहे. या यंत्रांच्या चाचण्या विविध भौगोलिक तसेच भूप्रदेशांमध्ये प्रत्यक्ष ग्राहकाच्या कार्यस्थळावर घेण्यात आल्या आहेत आणि त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांतून मिळालेल्या ज्ञानाचा अंतर्भाव उत्पादनाच्या विकासात करण्यात आला आहे.”
जेसीबीचे डीलर नेटवर्क देशातील सर्वांत विस्तृत नेटवर्क्सपैकी एक आहे. त्यातील ६०हून अधिक डीलर्सकडे इंजिनीअर्स आहेत आणि ७००हून अधिक आउटलेट्समध्ये उत्तमरित्या प्रशिक्षित कर्मचारी आहेत. त्याचप्रमाणे सर्व ठिकाणी सुट्या भागांचा पुरेसा साठा ठेवला जातो. यामुळे ग्राहकांना उत्पादनासाठी प्रोफेशनल दर्जाचे सहाय्य मिळत राहील याची निश्चिती होते. या यंत्रात जेसीबीचे प्रगत टेलीमॅटिक्स तंत्रज्ञान- जेसीबी लाइव्हलिंकही बसवण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून यंत्रांचा माग ठेवला जातो आणि रिअल-टाइम तत्त्वावर देखरेख ठेवणे शक्य होते. हे तंत्रज्ञान सेवा, ऑपरेशन्स आणि यंत्राच्या सुरक्षिततेबद्दलही ताजी माहिती ऑनलाइन तसेच मोबाइल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून देत राहते.
आत्तापर्यंत सुमारे १,६०,००० लाइव्हलिंक एनेबल्ड जेसीबी यंत्रांची विक्री झाली आहे. ही यंत्रे जिओ-फेन्स्ड व टाइम-फेन्स्ड असू शकतात आणि जीपीएसद्वारे लोकेट केली जाऊ शकतात. ग्राहकांना त्यांच्या ताफ्यातील यंत्राची स्थिती, इंधनाचा स्तर, बॅटरीची स्थिती आदी महत्त्वाची माहिती मोबाइल उपकरणांद्वारे प्राप्त करून घेता येते. याद्वारे सर्व्हिसचे स्मरण करून दिले जाते (रिमाइंडर्स) आणि यंत्राचा इतिहासही दाखवला जातो.
No comments:
Post a Comment