झी युवावरील नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली 'तुझं माझं जमतंय' हि मालिका प्रेक्षकांच्या भरलीच पसंतीस पडली आहे. अश्विनी, शुभंकर यांना एकत्र आणण्यासाठी मालिकेत दिलेला पम्मीचा तडका, आणि त्यांचं त्रिकुट हे प्रेक्षकांचं भरगोस मनोरंजन करतंय. अपूर्वा नेमळेकरने या मालिकेतून टीव्ही माध्यमात पुनरागमन केलं त्यामुळे तिला पुन्हा एकदा टीव्हीवर पाहायला मिळतंय याचा आनंद प्रेक्षकांना आहे. अपूर्वा सोबतच रोशन विचारे आणि मोनिका बागुल या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. या मालिकेचं शूटिंग नगरमध्ये चालू आहे.
मालिकेतील आशु म्हणजेच अभिनेत्री मोनिका बागुल हिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. साधी सालस आशु प्रेक्षकांना भावली आहे. मोनिका ही मूळची नगरचीच आहे. खऱ्या आयुष्यात देखील मोनिका ही थोडीफार आशु सारखीच आहे पण नुकतंच तिने सोशल मीडियावर वेस्टर्न आऊटफिट मधले फोटोज तिच्या चाहत्यांसाठी शेअर केले आणि मोनिकाला ग्लॅमरस अंदाजात पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. तिच्या या फोटोजवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
No comments:
Post a Comment