Wednesday 24 February 2021

Zee Talkies | Gast | नायकाची भूमिका साकारणं आव्हानात्मक - तानाजी गालगुंडे


सैराट चित्रपटात लक्षवेधी भूमिका साकारलेला अभिनेता तानाजी गालगुंडे आता टॉकीज ओरिजनल चित्रपट गस्त मधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याच्या सोबत साधलेला हा खास संवाद
१. सैराट मधील बाळ्याच्या भूमिके नंतर, गस्त मध्ये प्रमुख भूमिका निभावण्यासाठी जेव्हा तुझी निवड केली तेव्हा तुझी प्रतिक्रिया काय होती?
- मला थोडंसं दडपण आलं होतं कारण याआधी मी सहायक आणि विनोदी भूमिका केल्या होत्या आणि गस्त मध्ये प्रमुख नायकाची भूमिका असल्यामुळे आधी थोडी धाकधूक होती. प्रेक्षक मला नायक म्हणून कशा प्रकारे प्रतिसाद देतील, तसंच चित्रपटात रोमँटिक नायकाची भूमिका साकारायची यासगळ्याच थोडं टेन्शन होतं. पण आमचे दिग्दर्शक आणि गस्तच्या संपूर्ण टीमने मला खूप सपोर्ट केला त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. तसेच झी टॉकीजने या चित्रपटात भूमिका साकारण्याची संधी दिली याचा मला खूप आनंद आहे.
२. तुझ्या भूमिकेबद्दल थोडक्यात सांग.
- मी गस्त या चित्रपटात अमर नावाच्या मुलाची भूमिका साकारतोय. तो एका मुलीच्या प्रेमात आहे आणि ज्या गावात राहतोय त्या गावात पहारा देत असताना त्या मुलीला तो चोरून भेटत असतो. त्यांच्या प्रेमकथा पुढे काय वळण घेते हे प्रेक्षकांना चित्रपटात पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मी एका गावाकडच्या मुलाची भूमिका निभावतोय आणि प्रेक्षकांना देखील ती नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे
३. चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव कसा होता?
- कोरोनाचं वारं सगळीकडे होतं. त्यामुळे चित्रीकरण करताना एक प्रकारची धाकधूक होती कि काही व्यत्यय तर नाही येणार ना? पण आम्हाला चित्रीकरण करताना कुठलीच अडचण आली नाही. राशीवाडी गावातील लोकांनी आम्हाला खूप सहकार्य केलं त्यामुळे आमचं शूटिंग सुरळीत पार पडलं.
४. गस्त चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान कुठली गोष्ट तुला आव्हानात्मक वाटली?
- नायकाची भूमिका साकारणं हेच माझ्या साठी मुळात आव्हानात्मक होतं पण माझ्या संपूर्ण टीमने मला सांभाळून घेतलं त्यामुळे मी ती भूमिका चांगल्या प्रकारे साकारू शकलो. तसंच अजून एक आव्हानात्मक गोष्ट सांगायची झाली तर आम्हाला एक गाणं एका दिवसात शूट करायचा होतं ज्यात आम्हाला डान्सदेखील करायचा होता. पण आम्ही सगळ्यांनी व्यवस्थित सराव केला आणि ते गाणं एका दिवसात शूट करण्याचं आव्हान पार पाडलं.
५.  हा चित्रपट झी टॉकीज थेट प्रसारित करणार आहे, तुम्ही प्रेक्षकांना काय आवाहन कराल?
- येत्या २८ फेब्रुवारीला हा चित्रपट झी टॉकीजवर प्रदर्शित होत आहे. एक नवीन कोरा सिनेमा झॉ टॉकीज घेऊन येत आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे आम्हा सर्व कलाकार आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा कारण आम्ही हा चित्रपट मागील वर्षी ऑक्टोबर मध्ये शूट केला आणि आता झी टॉकीज थेट प्रेक्षकांसाठी हा चित्रपट सादर करणार आहे. तेव्हा सगळ्यांनी पहा अमर आणि सुजाताची लव्हस्टोरी २८ फेब्रुवारीला दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता फक्त आपल्या झी टॉकीजवर.

No comments:

Post a Comment