होळीनिमित्त एण्ड टीव्हीवर ड्रामा व कॉमेडीचे रंग
होळी सण जवळच आला असताना एण्ड टीव्ही आगामी एपिसोड्समध्ये रंगाची उधळण, साजरीकरण व आनंद घेऊन येत आहे. मालिका 'भाबीजी घर पर है'च्या आगामी एपिसोडमध्ये विभुती नारायण मिश्रा (आसिफ शेख) व मनमोहन तिवारी (रोहिताश्व गौड) यांना भाभींसोबत होळी खेळत असल्याचे स्वप्न पडते आणि ते एकमेकांच्या प्रसादामध्ये भांग टाकतात. दुसरीकडे, अनिता भाभी (नेहा पेंडसे) व अंगूरी भाभी (शुभांगी अत्रे) संकटात असताना संरक्षण करण्याची क्षमता असण्याबाबत त्यांच्या पतींची परीक्षा घेण्याचे ठरवतात. हे सर्व घडत असताना विभुतीजी व तिवारीजी भाभीजींसोबत होळी खेळू शकतील का आणि त्यांच्या पत्नींचे संरक्षण करण्यासंदर्भातील परीक्षेमध्ये पास होतील का? कुख्यात भांग मालिका 'हप्पू की उलटन पलटन'मध्ये दिसून येईल. संपूर्ण कुटुंब होळी सण साजरा केल्यानंतर चित्रपट पाहायला जाण्याचे ठरवतात. ते दरोगा हप्पू सिंगकडून (योगेश त्रिपाठी) भांग न पिण्याचे वचन मागतात. पण भांगेची खूप आवड असलेला हप्पू त्याचे वचन मोडतो आणि भांग पितो, ज्यामुळे राजेश (कामना पाठक) व मुले त्याच्यावर खूपच रागावतात. ते या गोष्टीचा सूड घेण्याचे ठरवत एक योजना आखतात, जेथे छेडी तक्रार करतो की हप्पूने त्याच्या मेव्हणीची छेड काढली आहे. हप्पू त्याची निरागसता सिद्ध करत त्याची पत्नी व मुलांचे मन जिंकेल का? मालिका 'संतोषी माँ सुनाएं व्रत कथाएं'मध्ये सिंग कुटुंब पूर्णत: उत्सव साजरा करण्याच्या मूडमध्ये आहे. साजरीकरणादरम्यान स्वाती (तन्वी डोग्रा) व इंद्रेश (आशिष कडियन) यांच्यामध्ये प्रेम व रोमांच बहरू लागतो, पण देवेश (धीरज राय) त्यांच्यामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत राहतो. यादरम्यान देवलोकमध्ये महादेव संतोषी माँ (ग्रेसी सिंग) व असुर राणी पौलोमी (सारा खान) यांची कठोर परीक्षा घेत आहेत. स्वाती व इंद्रेशचे प्रेम अडथळ्यांवर मात करेल का? संतोषी माँ महादेवांनी घेतलेल्या परीक्षेमध्ये यशस्वी होईल का? रंगीबेरंगी एपिसोडबाबत सांगातना आसिफ शेख ऊर्फ विभुती नारायण मिश्रा म्हणाले, ''अंगूरी भाभीसोबत होळी खेळण्याचे स्वप्न पाहिल्यानंतर विभुतीला ते स्वप्न सत्यात आणायचे असते. तो तिवारीच्या प्रसादामध्ये भांग टाकण्याचे ठरवतो, ज्यामुळे तो झोपून जाईल आणि विभुतीला अंगूरी भाभीसोबत होळी खेळायला मिळेल.'' कामना पाठक ऊर्फ राजेश म्हणाल्या, ''संपूर्ण कुटुंबाची होळी खेळल्यानंतर चित्रपट पाहायला जाण्याची इच्छा आहे, पण हप्पू भांग पिऊन त्यांच्या सर्व इच्छा भंग करतो. म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी राजेश योजना आखते. हप्पू या स्थितीची कशाप्रकारे हाताळणी करतो हे पाहणे रोमांचक असणार आहे. या सीक्वेन्ससाठी शूटिंग करताना खूप धमाल आली. आम्हाला संपूर्ण टीमसोबत रंगांची उधळण करायला मिळाली.'' तन्वी डोग्रा ऊर्फ स्वाती म्हणाल्या, ''होळी साजरीकरणामुळे स्वाती व इंद्रेशला एकमेकांच्या जवळ येण्याची आणि त्यांच्या नात्याला अधिक दृढ करण्याची संधी मिळते. पण, देवेश स्वातीला तिला रंग लावण्यास दिले नाही तर तिच्या नणंदेला दुखापत करण्याबाबत ब्लॅकमेल करत त्यांच्यामध्ये अडथळा निर्माण करण्यास सुरूवात करतो. त्यांचे प्रेम विरूद्ध देवेश हा संग्राम पाहणे रोमांचक असणार आहे. वेगळे साजरीकरण, रोमांस व ड्रामासह हा रोमांचक सीक्वेन्स असणार आहे.''
अमर्याद धमाल व ड्रामासाठी पहा 'संतोषी माँ सुनाएं व्रत कथाएं' रात्री ९ वाजता, 'हप्पू की उलटन पलटन' रात्री ९.३० वाजता आणि 'भाबीजी घर पर है' रात्री १०.३० वाजता दर सोमवार ते शुक्रवार फक्त एण्ड टीव्हीवर!
No comments:
Post a Comment