Tuesday, 18 May 2021

संदीप खरेंच्या काव्यकथा स्टोरीटेलच्या ऑडिओबुकमध्ये खास मुलांसाठी!

स्टोरीटेलवर सध्या छोट्या बालदोस्तांसाठी उन्हाळी सुट्टीनिमित्त एकापेक्षा एक  धम्माल ऑडिओबुक्स रिलीज होत आहेत. गेल्या आठवड्यात भा. रा. भागवत यांची मराठी भाषेतील प्रचंड लोकप्रिय ठरलेली पहिली बाल साहस कथा 'फास्टर फेणे'चे अभिनेता अमेय वाघ याच्या आवाजातील ऑडिओबुक प्रकाशित झाली आहे. आता लगेचच लहान मुलांसाठी कवितेत गुंफलेल्या सुंदर काव्यकथा प्रसिद्ध कवी, गायक अभिनेता संदीप खरे यांच्या आवाजात बालदोस्तांसाठी स्टोरीटेल घेऊन येत आहे. यामध्ये प्राणी, राजा, राजकन्या, मस्तीखोर मुलं, परी, अशी अनेक छान छान कॅरेक्टर मुलांना भेटायला येतील.

'अग्गोबाई‌‍‌ऽऽ ढग्गोबाईऽऽऽ', 'डिबाडी डिपांग', 'दमलेल्या बाबाची कहाणी', 'आयुष्यावर बोलू काही' या गीतसंग्रहासोबत संगीतकार सलील कुलकर्णींबरोबर अनेक कार्यक्रमांचे सादरीकरण करणारे लोकप्रिय कवी, गायक व अभिनेते संदीप खरे यांच्या धम्माल काव्यकथा असलेल्या पाच ऑडिओबुक्स यांच्या गोड आवाजात खास बालदोस्तांसाठी स्टोरीटेलने प्रकाशित केला आहे. छोट्या मुलांना कवितांमधुन रंजकपणे परिकथा, गोष्टी सांगण्याची पध्दत पाश्चात्य साहित्यात मोठ्या प्रमाणावर आहे. मराठीत मुलांसाठी जाणीवपूर्वक काव्यकथा लिहिण्याचा हा प्रयोग स्टोरीटेलच्या निमित्ताने संदीप खरे पहिल्यांदाच करत आहेत.

यामध्ये 'साखरराणी हुशार राजपुत्राने काय युक्ती केली! तुसड्या राजकन्येची साखरराणी झाली', 'चंदा आणि परी ! परीच्या जादूने किमया घडली ! गरीब, मेहनती चंदा , राणी बनली', 'ओटो सानला धडा छान खोडकर ओटोचा भरला घडा ! तेंदूच्या कोटाने शिकवला धडा', 'चँग चू ... चुंग चू दोन भावांची गोष्ट आहे हटके! एकाला बक्षीस ... एकाला फटके', 'दुष्ट लांडगा.... हुशार ससा छोट्याश्या सश्याच्या मदतीला घोडा! पहा कसा शिकवला लांडग्याला धडा!!' ह्या अप्रतिम आणि सुंदर काव्यकथा प्रसिद्ध कवी संदीप खरेंच्या गोड आवाजात ऐकताना मुले सहज रमून जातात. या सर्व काव्यकथांचे शब्द आणि अभिवाचन संदीप खरे यांनी केले असून त्यावर संगीतसाज निनाद सोलापूरकर यांनी चढवला आहे.

खास मुलांसाठीच्या आवडीच्या कथा काव्य असलेल्या या ऑडिओबुक्स मुलांना सहज आणि सोप्या पद्धतीने गुगलप्ले स्टोअर किंवा ॲपस्टोअरवर जाऊन 'स्टोरीटेल' हे ॲप सहज डाऊनलोड करून किंवा www.storytel.com या वेबसाईटवर जाऊन हे ॲप डाऊनलोड सहज ऐकता येतील.

No comments:

Post a Comment