Saturday 29 May 2021

सूरताल कराओके सिंगिंग स्टारची अंतिम फेरी व निकाल रविवारी 'गामा फाऊंडेशन'च्या फेसबूक पेज वर लाईव्ह पहाण्याची संधी!

गामा फाऊंडेशनने आयोजित केलेल्या लोकप्रिय सदाबहार हिंदी चित्रपट कराओके गीत गायनाची सूरताल कराओके सिंगिंग स्टार या स्पर्धेची अंतिम फेरी आणि निकाल रविवारी ३० मे २०२१ रोजी सकाळी ११:०० वाजल्यापासून प्रत्यक्ष 'गामा फाऊंडेशन'च्या फेसबूक पेज वर लाईव्ह सादर होणार आहे.
या स्पर्धेत मुंबईसह उपनगरांतील अनेक हौशी गायकांनी ऑनलाईन पद्धतीने सहभाग नोंदविला होता. एकापेक्षा एक अवीट गोडीच्या बहारदार सादरीकरणामुळे ही स्पर्धा रंगतदार व सुरस झाली होती. अंतिम फेरीसाठी स्पर्धकांची निवड करताना परीक्षकांचा कस लागला होता. आता स्पर्धकांची उत्सुकता जास्ती न ताणता आज आम्ही काही गोष्टी इथे जाहीर करत आहोत असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या स्पर्धेचे परीक्षक संगीत संयोजक प्रशांत लळित आणि गायिका विद्या करलगीकर आहेत. त्याच बरोबर या कार्यक्रमात विशेष सहभाग डॉ. राहुल जोशी(एम.डी.होमिओपथी) आणि आश्विन बापट(एबीपी माझा - न्यूज अँकर) यांचा सुद्धा सहभाग असणार आहे.
या कार्यक्रमाचा लाईव्ह आस्वाद घेण्यासाठी गामा फाऊंडेशनच्या https://www.facebook.com/gama.foundations.3 फेसबूक/इंस्टाग्राम पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका!

No comments:

Post a Comment