Tuesday, 9 November 2021

बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 37! “आपण त्याच्या बाटलीमध्ये उतरायचे नाही” – सोनाली !

मुंबई ९ नोव्हेंबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दोन सदस्यांमध्ये विकासबद्दल चांगलचं गॉसिपींग सुरू आहे. सहसा विकासबद्दल कोणी काही बोलतं आहे हे कमीच बघायला मिळतं कारण बहूतांशी तोच बोलताना दिसतो. विकासच्या ग्रुपमधील सोनाली आणि मीनल त्याच्याबद्दल बोलताना दिसणार आहेत. तुम्हांलाही वाटतं का विकास समोरच्याला बाटलीत उतरवतो?

मीनल सोनालीला सांगताना दिसणार आहे, मी कितीवेळा म्हणाले तिकडे एकेकाने बोला, ट्राय करा, प्र्त्येकाशी मुद्देसूद बोला. जे विकासने केलं. सगळे मुद्दे बरोबर नाही बोला तो पण त्याने... तुला माहिती आहे ना तो बोलण्यामध्ये उतरवतो समोरच्याला बाटलीमध्ये तसं तो करत होता. सोनालीचे म्हणणे पडले, माझं काय मत आहे माहिती आहे त्याचं बाटलीमध्ये उतरवण आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतं, पण आपण बाटलीमध्ये त्याच्या उतरायचे नाही ही तर गोष्ट खरी आहे. काल बोलता बोलता तू बोलीस तू त्याचा जो प्लस पॉइंट आहे तो आपण आपल्यासाठी कसा प्लस करू शकतो वेळ आल्यावर आपल्यासाठी मायनस कसा होऊ शकतो.........”

आणि दोघींच्या गप्पा अशाच सुरू राहिल्या बघूया अजून पुढे काय काय त्यांनी मते मांडली. तेव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

No comments:

Post a Comment