Monday, 15 November 2021

निर्मळ मनाच्या नि धाडसी वृत्तीच्या ‘बोक्या सातबंडे’ला ऐका स्टोरीटेल मराठीच्या ऑडिओबुकमध्ये!

अमरत्वासोबतच लोकप्रियतेचा वरदान घेऊन जन्मला आलेल्या 'बोक्या सातबंडेअर्थात लोकप्रिय अभिनेते - लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या मानस पुत्राची ख्याति दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पुस्तकमालिकाचित्रपटबालनाट्य अश्या सर्वच माध्यमातून प्रवास करणाऱ्या 'बोक्या सातबंडेचा नवा प्रवास स्टोरीटेल मराठीवर सुरु झाला आहे. दस्तुरखुद्द दिलीप प्रभावळकर यांच्याच आवाजात प्रत्येक रविवारी 'संडे विथ बोक्या सातबंडे'द्वारे दहा भागांच्या ऑडिओबुक मालिकेतून बालदोस्तांचे मनोरंजन करणार आहे. साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार पटकावणाऱ्या आपल्या लाडक्या 'बोक्या सातबंडे'चे हे सारे पराक्रम त्यांना स्टोरीटेल मराठीवर ऐकाता येणार आहेत.

बोक्या सातबंडे हा दिलीप प्रभावळकर यांचा मानसपुत्र. तो आहे निर्मळ मनाचा नि धाडसी वृत्तीचा. व्रात्य पण वांड नाही आणि खोडकर पण खोडसाळ नाही. गरजूला मदत करायला आणि ढोंगी माणसाच्या वर्मावर बोट ठेवायला त्याला आवडतं. तर असा हा खट्याळ बोक्या सातबंडे प्रत्येक संकटातून नि अग्निदिव्यातून मात्र सहीसलामत सुटतो. कसाते या गोष्टीतून तुम्हाला कळेलच. पण या तुमच्या लाडक्या दोस्ताचं खरं नाव मात्र बोक्या सातबंडे नाही! मग त्याचं खरं नाव काय आहेत्याला बोक्या सातबंडे हे नाव कसं पडलं आणि त्याच्या खोड्या हे सगळं एंजॉय करण्यासाठी स्टोरीटेल मराठीवर ऐकादिलीप प्रभावळकरांनी लिहिलेलं आणि साक्षात त्यांच्याच आवाजातलं बोक्या सातबंडे.

प्रख्यात अभिनेते आणि लेखक  दिलीप प्रभावळकर यांना अभिनयाच्या व साहित्याच्याही क्षेत्रातील योगदानाबद्दल संगीत नाटक अकादमी पुरस्कारसाहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कारराष्ट्रीय पारितोषिकपु.ल. बहुरुपी सन्मानविष्णुदास भावे गौरव पुरस्कारबालगंधर्व पुरस्कारचिंतामणराव कोल्हटकर स्मृती पुरस्कारकित्येक महाराष्ट्र राज्य पुरस्कार व नाट्यदर्पण मानचिन्हेमटा सन्मानसह अगणित मानाचे पुरस्कार - सन्मान - किताब मिळवून सुध्दा आजही नवनव्या भूमिका पूर्वी इतक्याच जोमाने करताना व त्यातील नवनवीन बारकावे तितक्याच उत्साहाने शोधताना आढळतात.

'संडे विथ बोक्या सातबंडेऐकण्यासाठी स्टोरीटेल सिलेक्टची दरमहा वर्गणी रू. १४९/- तर वार्षिक वर्गणी सवलतीत रू.९९९/- आहे. पण आता नव्याने वार्षिक वर्गणी भरणा-यांसाठी स्टोरीटेलने अधिक सवलत जाहिर केली आहे आणि फक्त रू.३९९/-  वर्गणी  भरून कोणत्याही भारतीय भाषेतील हजारो ऑडिओबुक्स सभासद वर्षभर ऐकू शकतात. स्टोरीटेलवर ११ प्रादेशिक भाषांमधील अमर्यादित ऑडिओबुक्सच्या माध्यमातून 'साहित्यश्रवणानंदघेता येईल.

ऐकण्यासाठी लिंक 

https://storytel.com/books/bokya-satbande-part-1-1359564...

आणि प्रोमो पहाण्यासाठी लिंक 

https://www.youtube.com/watch?v=f6vh4bFuBMk

No comments:

Post a Comment