'स्टोरीटेलच्या रसिकांसाठी 'जग बदलणारे ग्रंथ' मधील पन्नास ग्रंथपरिचयाची दर आठवड्याला लेखमालिका!
'स्टोरीटेल मराठी' सदैव अनमोल दुर्मिळ साहित्य संपदा आपल्या ऑडिओबुक्स'च्या माध्यमातून प्रकाशित करीत असते. प्रख्यात लेखिका दीपा देशमुख यांचा 'जग बदलणारे ग्रंथ' हा अत्यंत वेगळा ग्रंथ ‘स्टोरीटेल मराठी’वर प्रकाशित होत आहे. या ग्रंथांमधील दर आठवड्याला एक लेख याप्रमाणे ते वर्षभर रसिकांना ऐकायला मिळणार आहेत. लेखिका दीपा देशमुख यांनी सुचविलेले मूळ ५० निवडक ग्रंथ प्रत्येकाने अखंड ऐकावेत असे असले तरी ज्यांना तितका वेळ नाही ते पंधरा ते वीस मिनिटे ऐकून मूळ ग्रंथाची ओळख थोडक्यात करून घेऊ शकतात. जानेवारी महिन्यात यातील ६ ग्रंथावरील लेखमाला रसिकांना ऐकायला मिळणार असून लेखिका दीपा देशमुख, अमोघ चंदन, सचिन सुरेश, अस्मिता दाभोळे यांच्या आवाजात पहिल्या ६ ग्रंथांचा रंजक परिचय ऐकता येणार आहे.
माणसाची प्रगती होण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या. चाकाचा शोध लागला आणि त्याच्या जगण्याला गती मिळाली. विज्ञान आणि शोधांनी माणसाला डोळस बनवलं. कलेनं त्याचं आयुष्य सुंदर केलं. औद्योगिक क्रांती झाली आणि त्याच्या आयुष्यानं वेगळी वाट पकडली. तंत्रज्ञानानं त्याच्या आयुष्यात खूप मोठी जागा व्यापली आणि त्याचं आयुष्य सुखकर केलं. माणसाच्या वाटचालीत स्त्रीवर लादलेलं दुय्यमत्व झुगारण्यासाठी तिनं संघर्ष केला आणि आपल्या स्वतंत्र अस्तित्वासाठी ठाम भूमिका घेतली. सृष्टीच्या या अफाट पसाऱ्यात माणसाची मग एक एक गोष्ट नीट समजून घेण्याची धडपड सुरू झाली, कधी त्यानं विज्ञानाची साथ घेतली, तर कधी तंत्रज्ञानाची मदत घेतली. कधी त्यानं स्वत:ला समजून घेण्यासाठी मानसशास्त्राची शाखा निर्माण केली. कधी त्यानं व्यवहार सुरळीत चालण्यासाठी अर्थशास्त्राची सोबत घेतली. कधी त्यानं आपली मूल्यं विकसित करताना त्यांना तत्त्वज्ञानाची जोड दिली. या सगळ्या गोष्टींचा दस्तावेज 'ग्रंथ' रुपात जतन करण्याची प्रक्रिया त्यानं सुरू ठेवली. त्यामुळेच जगभरात आज धर्म, कला, विज्ञान, तंत्रज्ञान, मानसशास्त्र अनुवंशशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, चरित्र अशा अनेक शाखांमधलं लिखाण ग्रंथांच्या रुपानं निर्माण झालं. यातल्या अनेक ग्रंथांनी जगावर प्रभाव टाकला. यातले निवडक ५० ग्रंथ घेऊन त्यांची ओळख व त्यावर केलेलं भाष्य 'जग बदलणारे ग्रंथ' मध्ये करण्यात आले आहे. कुतूहल, ज्ञानाची आस असणाऱ्या प्रत्येकानं आपलं जगणं अर्थपूर्ण आणि समृद्ध करण्यासाठी दीपा देशमुख लिखित 'जग बदलणारे ग्रंथ'ची स्टोरीटेलवर दर आठवड्याला वर्षभर प्रकाशित होणारी संपूर्ण मालिका ऐकायलाच हवी.
जग बदलणारे ग्रंथ - दीपा देशमुख
ग्रंथ कधी माणसाचं रूप घेतात तर कधी निसर्ग बनून दर्शन देतात. कधी हेच ग्रंथ परिस्थिती बनून समोर येतात आणि आपल्याला सशक्त, सजग आणि सुजाण बनवतात. चांगली पुस्तके एकाच वाचनात संपत नाहीत असे स्टीफन किंग म्हणतो. म.जोतिबा फुले यांनी ग्रंथाचे महत्व विशद केलं, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तक आणि भाकरी यांपैकी एकाची निवड करायची वेळ आली तर मी भाकरीऐवजी पुस्तकाची निवड करेन असं सांगितलं. खरं तर आपल्याकडून कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा न करणारे, आपला राग, लोभ, मत्सर न करणारे, तरीही भरभरून देणारे ग्रंथ आपले जिवलग मित्र आहेत, असं मला वाटतं. म्हणूनच आपलं जगणं अर्थपूर्ण आणि समृध्द करण्यासाठी या ग्रंथांशी दोस्ती करायलाच हवी. जरूर ऐका ' जग बदलणारे' ग्रंथ !
भगवद्गीता - महर्षी व्यास
'व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्' म्हणजेच व्यासांनी जगातलं सगळं ज्ञान उष्टं करून सोडलं आहे. (म्हणजे, जगात असा कोणताही विषय नसेल, ज्याला महर्षी व्यासांनी त्यांच्या लेखनात स्पर्श केला नाही) असा समज सर्वत्र आहे. कारण, भगवदगीतेमध्ये किंवा महाभारतामध्ये मानवी जीवनातल्या नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र आणि मानसशास्त्र या विषयांचं सखोल विवेचन केलं आहे. अनेक धर्मातल्या तत्वज्ञांनी, विचारवंतांनी आणि शास्त्रज्ञांनी भगवद्गीतेची प्रशंसा केली आहे. महात्मा गांधींपासून ते अल्बर्ट आईन्स्टाईनपर्यंत अनेक थोरांना भगवद्गीतेने प्रभावित केले आहे.
त्रिपिटक - गौतम बुद्ध
त्रिपिटक या ग्रंथामध्ये आयुष्य चांगल्या रितीने कसं जगावं या विषयी सांगितलं आहे. दुःख, समुदय, निरोध आणि मार्ग अशी चार आर्यसत्यं बुध्दाने सांगितली आहेत. त्रिपिटक ग्रंथ अभ्यासला, तर मानवी जीवनाच्या सर्व अंगांचा केलेला अभ्यास यात सापडतो. ' आळस आपल्याला आपल्या उद्दीष्टांपर्यंत पोहोचू देत नसल्यानं तो टाळा. कोणी निंदा केली तर वाईट वाटून घेऊ नका, कारण स्वतःचा शोध घेण्याची ती एक चांगली संधी आहे,' असं बुध्दाने म्हटलं आहे.
बायबल - येशू ख्रिस्त
बायबल हा परमेश्वाराच्या प्रेरणेतून निर्माण झालेला ग्रंथ समजला जातो. हा ग्रंथ ख्रिश्चन धर्माला प्रेरित करणारा, धर्माची मूलतत्वं काय आहेत आणि परमेश्वर हा तारणकर्ता कसा आहे हे सांगणारा आहे. परमेश्वराचं अस्तित्व, त्याचं प्रकटीकरण कधी आणि कसं झालं याबद्दल या ग्रंथात विवेचन केलं आहे. जगभरात या ग्रंथाची सर्वाधिक विक्री झालेली आहे. लिओनार्दो दा व्हिंचीचं ' द लास्ट सपर' आणि मायकल अँजेलोचं ' क्रिएशन ऑफ ॲडम' ही चित्रं बायबलवरच आधारित होती.
कामसूत्र – वात्स्यायन
असं म्हणतात की आजपासून २४०० वर्षांपूर्वी भारतात एका अजरामर अशा ग्रंथाची निर्मिती झाली. जो ग्रंथ पृथ्वीच्या अंतापर्यंत मानवजातीला आवश्यक असणार होता. या ग्रंथाचे नाव कामसूत्र! हा ग्रंथ प्रत्येक भाषेत पुढे अनुवादीत केला गेला. जगभरात सर्वाधिक विक्रीचा ग्रंथ म्हणूनही हा ओळखला जातो. सुरूवातीची काही वर्षे तर अनेक देशांमध्ये या ग्रंथावर बंदी घातली गेली होती. मात्र पुढे ब्रिटीश सैनिक असलेला सर रिचर्ड बर्टन याने मूळ संस्कृत असलेल्या या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर केले तेव्हा त्याने म्हटले की कामसूत्र या भारतीय ग्रंथाने प्रेम कसे करावे याची शिकवण देऊन जगावर उपकारच केले आहेत.
अर्थशास्त्र – कौटिल्य
'माणूस हा जन्माने नाही, तर कर्माने श्रेष्ठ असतो' असे सांगतानाच चाणक्याने शिक्षण हे माणसासाठी किती महत्वाचे आहे हे पदोपदी सांगितले. चाणक्याने लिहिलेल्या ग्रंथात शिस्त, अधिका-यांची कर्तव्ये, कायदा, उद्योग, राष्ट्राची आचारसंहिता, कार्यालयीन हिशोब आणि कामकाज, व्यापार, जकात आणि उत्पादन शुल्क, मालमत्ता. ठेवी, कर्जवसूली, परराष्ट्रधोरण आणि अर्थशास्त्राविषयी चर्चा केली आहे. कामगारांचे हक्क, संरक्षण, मजूरी आणि कामाचे स्वरूप याविषयी त्यानं विस्ताराने लिहून ठेवलं आहे. त्यानं संबंधित अधिका-यांच्या हलगर्जी पणासाठी त्यांना कठोर दंड करावा असही म्हटलं आहे. हा ग्रंथ अर्थशास्त्र आणि राजनिती यांच्यावर लिहिलेला मानवी इतिहासातला पहिला ग्रंथ म्हणून ओळखला जातो.
'स्टोरीटेलवर 'जग बदलणाऱ्या ५० ग्रंथांचं वैशिष्ट्य' ऐकण्यासाठी स्टोरीटेल सिलेक्टची दरमहा वर्गणी रू. १४९/- तर वार्षिक वर्गणी सवलतीत रू.९९९/- आहे. पण आता नव्याने वार्षिक वर्गणी भरणा-यांसाठी स्टोरीटेलने अधिक सवलत जाहिर केली आहे आणि फक्त रू.३९९/- वार्षिक वर्गणी भरून कोणत्याही भारतीय भाषेतील हजारो ऑडिओबुक्स सभासद वर्षभर ऐकू शकतात. स्टोरीटेलवर ११ प्रादेशिक भाषांमधील अमर्यादित ऑडिओबुक्सच्या माध्यमातून 'साहित्यश्रवणानंद' घेता येईल.
'जग बदलणारे ग्रंथ' मधील पन्नास ग्रंथपरिचयाची दर आठवड्याला लेखमालिका ऐकण्यासाठील लिंक
https://www.storytel.com/in/
Dr. Ansy D’Souza is a Senior Physician at the Dr. Saji D’Souza’s KSAC Hospital. She received an M.B.B.S degree before getting a Diploma in Family Medicine (London).
ReplyDeletehttps://ksachospitals.com/