मुंबई ९ फेब्रुवारी, २०२२ : आई आणि आईचं प्रेम हे काही वेगळ्या शब्दांमध्ये मांडायला नको. सगळं जग एकीकडे आणि आईची माया एकीकडे. आपल्या लेकारावर जर कोणी निस्वार्थपणे माया करत असेल तर ती आईचं. पण, आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला हे प्रेम कळत नाही किंवा कळून देखील आपण न कळल्याचा आव आणत असतो. कारण, आपल्याला आपलं स्वातंत्र्य त्यापुढे अधिक महत्वाचं वाटत असतं. लेकरू कुठे वाट चुकलो तर पुन्हा एकदा मार्गावर आणणारी ही आपलीच आईच असते हे आपण विसरतो. असंच काहीसं आपल्या सुहानीसोबत घडताना दिसतं आहे. जन्मदात्या आईवर विश्वास न ठेवता सुहानीला बाहेरच जग प्रिय होतं. या वयात आपल्याकडून चुका होतातचं. पण आता सुहानीच्या नकळतच तिच्यावर ओढवलेल्या संकटातून तिला बाहेर काढण्यासाठी आईचा मात्र कस लागतो आहे. वाट चुकलेल्या मुलीला परत सुखरूप घरी आणण्यासाठी मीनाक्षी जीवाचं रान करते आहे. अनेक पुरावे हाती लागून सुध्दा सुहानी मिळत नाहीये. बर्याचदा जवळचा माणूसच संशयित म्हणून समोर येतात त्याक्षणी देखील मीनाक्षी धीर न सोडता त्याला सामोरी जाताना दिसतं आहे. आता मात्र मालिकेला नवं वळण मिळणार आहे कारण सुहानीला गायब करणारा खरा सूत्रधार सापडणार आहे. बेपत्ता असलेल्या सुहानीच्या शोधात असताना तिला सुशांत विरोधात देखील पुरावा सापडणार आहे. आता पुरावा काय असेल ? चांदेकर यामागे असून सुहानी त्याच्या जाळ्यात पुर्णपणे अडकली आहे. या कटामध्ये नक्की चांदेकरचा हात आहे या सत्यापर्यंत ती कशी पोहचणार. कसा असेल मीनाक्षीचा पुढचा प्रवास जाणून घेण्यासाठी बघत राहा आई मायेचं कवच दररोज रात्री १० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
आता मीनाक्षी त्याच्यापर्यंत कशी पोहचेल ? चांदेकर या सगळ्यामागे हे मीनाक्षीला कधी समजेल ? लोखंडे आणि मीनाक्षी मिळून सुहानीला कसे सोडवणार ? सुहानीपर्यंत पोहोचण्याचा मीनाक्षीला मार्ग सापडणार ? असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये आहेत या सगळ्याची उत्तरं हळूहळू आपल्याला मिळणार आहेत.
No comments:
Post a Comment