Wednesday 9 February 2022

टाटा एमडीचे अपग्रेडेड ओमीश्युअर नवीन बीए.२सह सर्व ओमायक्रॉन व्हेरियंट्सचा तपास लावू शकते

आयसीएमआरच्या म्हणण्यानुसारकोविडसाठीची अपग्रेडेड ओमीश्युअर आरटी-पीसीआर टेस्ट करून सध्या भारतात आढळून येत असलेल्या ओमायक्रॉनच्या सर्व उपप्रकारांचा तपास लावला जाऊ शकतो. ~ 

राष्ट्रीय9 फेब्रुवारी 2022: टाटा मेडिकल अँड डायग्नॉस्टिक्स लिमिटेडने (टाटा एमडी) त्यांची ओमीश्युअर आरटी-पीसीआर टेस्ट अपग्रेड केली असून त्यामुळे आता या टेस्टद्वारे नवीन बीए.२ या ओमायक्रॉनच्या उप-प्रकारांचा देखील तपास लावला जाऊ शकत असल्याची घोषणा केली आहे.  आयसीएमआर आणि मुंबईच्या संसर्गजन्य रोगांसाठीच्या कस्तुरबा रुग्णालयाच्या विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेने केलेल्या एका मूल्यमापनामध्ये अपग्रेडेड ओमीश्युअरने ओमायक्रॉनचे उप-प्रकार बीए.१बीए.१.१ आणि बीए.२ यांचा यशस्वीपणे तपास लावला. यामुळे आता ओमीश्युअर आरटी-पीसीआर टेस्ट किट हे सध्या भारतात आढळून येत असलेल्या ओमायक्रॉनच्या सर्व उप-प्रकारांचा तपास लावण्यासाठी सक्षम आहे.

टाटा एमडी ओमीश्युअर आरटी-पीसीआर टेस्ट ही आयसीएमआरच्या सहयोगाने विकसित करण्यात आली असून आयसीएमआरच्या अहवालानुसार या टेस्टद्वारे १००% एकरूपतेसह ओमायक्रॉनचा तपास लावला गेला.

टाटा मेडिकल अँड डायग्नॉस्टिक्स लिमिटेडच्या संशोधन व विकास विभागाचे प्रमुख डॉ. व्ही रवी यांनी सांगितले"आमचा अभिनव टेस्टिंग प्लॅटफॉर्म विषाणूंच्या उत्क्रांतीइतक्या वेगाने कार्यरत आहे.  महामारी विज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या नवनवीन विषाणू प्रकारांचा तपास लावला जाण्यासाठी वेगाने प्रतिसाद देण्याची पुरेपूर क्षमता आमच्या टेस्टिंग प्लॅटफॉर्ममध्ये आहे.  विषाणूंच्या वेगवेगळ्या प्रकारांचा सातत्याने मागोवा घेण्यात आम्ही अतिशय सक्रिय असून त्यातून असे दिसून आले की बीए.२ चे भारतात आणखी उत्परिवर्तन होत आहे.  आम्ही हे सुनिश्चित केले आहे की अपग्रेडेड ओमीश्युअरने ओमायक्रॉनच्या बीए.२ उप-प्रकारामध्ये नवीन उत्परिवर्तनांचा तपास लावला जाऊ शकतो."    

टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक्सचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक श्री गिरीश कृष्णमूर्ती म्हणालेआम्हाला हे घोषित करताना आनंद होतो आहे की ओमीश्युअरने नवीन बीए.१बीए.२ सह ओमायक्रॉनच्या सर्व उप-प्रकारांना अचूकपणे शोधले जाऊ शकते आणि आयसीएमआरने या गोष्टीची पुष्टी केली आहे. आम्ही केवळ एका आठवड्याभरात ओमीश्युअरला यशस्वीपणे अपग्रेड केले आणि त्यामुळे ओमीश्युअरला प्राप्त झालेली ही क्षमता आमचे सामर्थ्य दर्शवते.  सध्याच्या परिस्थितीत जे गरजेचे आहे त्याची पूर्तता करण्यासाठी ओमीश्युअर हा सर्वात किफायतशीर व्हेरियंट टेस्टिंग प्लॅटफॉर्म आहे.”

ओमीश्युअर आरटी-पीसीआर टेस्ट या सिक्वेन्सिंगवरील भार कमी करतेआरोग्यसेवा अधिकाऱ्यांना नवीन व्हेरियंट्सचे मूल्यांकन करून त्यांच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य वेळेत कार्यवाही करण्यासाठी सक्षम बनवते. त्याबरोबरीनेच ओमीश्युअर टेस्टमध्ये ओमायक्रॉनसाठी निगेटिव्ह असलेल्या सॅम्पल्सना सिक्वेन्सिंगमध्ये प्राधान्य दिले जाऊ शकते कारण या नमुन्यांमध्ये इतर प्रकार आणि नवीन उत्परिवर्तन शोधले जाण्याची शक्यता जास्त असते.

No comments:

Post a Comment